AI ने दाखवलं दिल्लीचं भविष्य! धक्कादायक फोटो

फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की लोक कसे स्मोक मास्क घालून आहेत आणि सगळीकडे फक्त धूर दिसत आहे. लहान मुलांनीही स्मोक मास्क घातले आहेत.

AI ने दाखवलं दिल्लीचं भविष्य! धक्कादायक फोटो
AI generates scary images of delhi
Image Credit source: Social Media
| Updated on: Jan 15, 2023 | 5:37 PM

राजधानी दिल्लीची हवा हळूहळू प्रदूषित होत आहे. अशा हवेमुळे अनेक गंभीर आजारांना जन्म मिळतो. मात्र, असे असूनही दिल्लीच्या जनतेला त्या विषारी हवेत सतत श्वास घ्यावा लागतोय. तसे काही वेळा प्रदूषणाची पातळी कमी होते, पण थोड्याच वेळात ती पुन्हा वाढते. भविष्यात परिस्थिती आणखी बिकट होईल आणि एक वेळ अशी येईल जेव्हा दिल्लीकरांना नेहमी स्मोक मास्क घालण्याची गरज भासेल. यासंबंधीचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत,ज्यामुळे भविष्यात दिल्लीचं काय होऊ शकतं याचा अंदाज लावला जाऊ शकतो.

खरं तर एका कलाकाराने आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) मदतीने काही चित्रे बनवली आहेत, ज्यात दिल्लीतील प्रदूषण भयंकर परिस्थितीत पोहोचल्यावर लोकांची काय अवस्था होईल, ते कसे जगतील हे दाखवण्यात आले आहे.

फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की लोक कसे स्मोक मास्क घालून आहेत आणि सगळीकडे फक्त धूर दिसत आहे. लहान मुलांनीही स्मोक मास्क घातले आहेत. भाजीपाला खरेदीसाठीही लोक बाजारात जात आहेत, त्यामुळे ते स्मोक मास्क आणि सूटशिवाय जात नाहीत.

असे वाटते की जणू लोक पृथ्वीवर नव्हे तर दुसऱ्या ग्रहावर राहत आहेत, जिथे प्रकाश नाही तर सर्वत्र फक्त धूर आहे. हे फोटो असे आहेत की ते पाहून कोणालाही आश्चर्य वाटणार नाही. का? कारण दिल्लीचं सातत्याने वाढणारं प्रदूषण.

दिल्लीच्या भीषण प्रदूषणात धुराचे मास्क घालून फिरतानाचे हे फोटो माधव कोहली नावाच्या व्यक्तीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर केले आहेत. तो दिल्लीचा कलाकार आहे. या छायाचित्रांच्या माध्यमातून त्यांनी भविष्यात दिल्लीत प्रचंड प्रदूषणात लोक कसे राहतील हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.