Video: चोर पोलिसाचा खेळ, चोराने चक्क अरुंद खिडकीतून पळून दाखवलं, पाहा चोरट्याचं भन्नाट स्किल!

व्हिडिओमध्ये एका चोराला पोलिसांनी पकडून घरासमोर नेले आहे. त्या घराची खिडकी अगदी लहान आहे. जी पाहून कोणीही त्यातून पलिकडे जाऊ शकेल, अशी कल्पनाच कुणी करु शकत नाही.

Video: चोर पोलिसाचा खेळ, चोराने चक्क अरुंद खिडकीतून पळून दाखवलं, पाहा चोरट्याचं भन्नाट स्किल!
| Edited By: | Updated on: Dec 10, 2021 | 1:34 PM

पोलिस आणि चोर यांचे नातं अप्रतिम असतं, दोघांनाही एकमेकांची बलस्थानं आणि उणीवा चांगल्याच ठाऊक असतात. एकीकडे चोर कुठल्याही थराला जाऊ शकतात हे पोलिसांना चांगलंच माहीत असतं, तर पोलीसही त्यांच्यासोबत काय करू शकतात हेही चोरांनाही चांगलंच माहीत असतं. कधी कधी चोरटे कोणतंही अशक्य काम शक्य करून दाखवतात. सध्या अशाच एका चोराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो अगदी अरुंद खिडकीतून पळून जाताना दिसतो आहे.

व्हिडिओमध्ये एका चोराला पोलिसांनी पकडून घरासमोर नेले आहे. त्या घराची खिडकी अगदी लहान आहे. जी पाहून कोणीही त्यातून पलिकडे जाऊ शकेल, अशी कल्पनाच कुणी करु शकत नाही. पण, जेव्हा पोलिसांनी त्या चोराला या खिडकीतून जाण्यास सांगितलं, तेव्हा तो हे काम अगदी सहजतेने करताना दिसला.

खिडकीतून आत जाण्यासाठी चोर प्रथम त्याचे दोन्ही पाय खिडकीच्या आत घालतो. त्यानंतर त्याच्या शरीराचा खालचा भाग खिडकीच्या त्या बाजूला सरकवतो. मग हळू हळू तो प्रयत्न करत राहतो. पहिल्या नजरेत बघून हा माणूस खिडकीच्या आतही जाऊ शकतो हे त्याच्या लक्षात येत नाही, पण शेवटी तो एका छोट्या खिडकीतून त्याच्या संपूर्ण शरीरात बाहेर काढतो

हा व्हिडिओ पाहा:

चोरट्याचा हा कारनामा पाहून सोशल मीडिया युजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले, ‘भाऊ, चोरांकडे सर्व काही करण्याचे अप्रतिम तंत्र असतं.’ व्हिडिओवर कमेंट करताना दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘केवळ एक तज्ञच ही पद्धत वापरु शकतो. याशिवाय अनेक यूजर्सने या व्हिडिओवर कमेंट्सद्वारे त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

@DRGulati80 नावाच्या अकाऊंटद्वारे हा आश्चर्यकारक व्हिडिओ मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. ज्यासोबत त्याने कॅप्शन लिहिले, ‘पोलिसांना खात्री नव्हती की हा माणूस या खिडकीतून कसा बाहेर पडेल.. मग चोराने डेमो दाखवला. बातमी लिहेपर्यंत या व्हिडिओला हजारो व्ह्यूज आणि शेकडो लाईक्स मिळाले आहेत.

हेही पाहा:

Video: सारा अली खानच्या गाण्यावर एअर होस्टेसचा विमानातच ‘चका चक’ डान्स, व्हिडीओला हजारो लाईक्स

Bison VIDEO | गवा वसाहतीत शिरला, 10-12 कुत्र्यांनी घेरला, कोल्हापुरातील व्हिडीओची चर्चा