Anand Mahindra Tweet: आनंद महिंद्रा यांची ट्विटर पोस्ट, यूएन सेक्रेटरी अँटोनियो गुटेरेसला दिला सल्ला!

या सगळ्यात सुंदर गोष्ट काय असेल तर ती आहे या व्हिडीओचं कॅप्शन. यूएन सेक्रेटरी अँटोनियो गुटेरेस यांच्यासाठी या कॅप्शनमध्ये संदेश आहे जो लोकांना प्रचंड आवडलाय.

Anand Mahindra Tweet: आनंद महिंद्रा यांची ट्विटर पोस्ट, यूएन सेक्रेटरी अँटोनियो गुटेरेसला दिला सल्ला!
anand mahindra tweet antonio guterres
Image Credit source: Social Media
| Updated on: Sep 25, 2022 | 11:08 AM

“प्रेम खूप सोपं आहे” हे आपल्याला लहान मुलं दाखवून देतात. निरागस मुलांना फक्त एक गोष्ट माहित असते,”प्रेम”! आपल्याला अनेकदा प्रवासात लहान मुलं दिसतात. ती येता जाता आपल्याकडे बघून हसतात तेव्हा आपल्यालाही आनंद होतो. आपला मूड लगेच चेंज होतो. कितीही संकटात असलो आपण तरी आपण जरा वेळासाठी सगळंच विसरून जातो. असाच एक गोंडस व्हिडीओ शेअर केलाय आनंद महिंद्रा यांनी! उद्योगपती आनंद महिंद्रा हे फार प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहे. ट्विटरवर सक्रिय असणारे आनंद महिंद्रा कायम काहीतरी छान, इनोव्हेटिव्ह, आनंददायी शेअर करत असतात. यात नेहमी काही ना काही संदेश असतो. अशीच एक पोस्ट व्हायरल होतीये.

या व्हिडीओ मध्ये एक गोंडस चिमुरड्याचा समावेश आहे. हा व्हिडीओ बघताना नकळत तुमच्याही चेहऱ्यावर स्मित हास्य येतं.

महिंद्रा यांनी शेअर केलेल्या क्लिपमध्ये एक चिमुकला विमानातून जाताना दिसतोय. या संपूर्ण क्लिपमध्ये, जेव्हा चिमुरडा सीटवर बसलेल्या प्रवाशांना “हाय” करतो आणि हसतो, तेव्हा त्याच्याकडे पाहून प्रवासी सुद्धा हसत असतात.

छोटासा मुलगा खूप नम्रपणे हाय हॅलो करतोय. मुलाच्या नम्रतेने पूर्णपणे हैराण झालेले प्रवासी त्यालाही परत नमस्कार करतात.

या सगळ्यात सुंदर गोष्ट काय असेल तर ती आहे या व्हिडीओचं कॅप्शन. यूएन सेक्रेटरी अँटोनियो गुटेरेस यांच्यासाठी या कॅप्शनमध्ये संदेश आहे जो लोकांना प्रचंड आवडलाय.

आनंद महिंद्रा हा व्हिडीओ पोस्ट करताना लिहितात, “जग बऱ्याचदा संघर्षग्रस्त होताना दिसतं. रशिया सारखे देश या संघर्षात भर घालतात पण हे जग कसं असावं याची आठवण कशी करून द्यायची हे लहान मुलांना माहीत असतं. @antonioguterres यांनी या चिमुरड्याला यूएन चा शांती आणि सद्भावनेचा राजदूत बनवावे!”

यूएन सेक्रेटरी अँटोनियो गुटेरेस यांना उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी हा संदेश दिलाय. लोकांना हा संदेश पटलेला आहे. ही पोस्ट प्रचंड व्हायरल होतेय.