Anant Chaturdashi 2023 | मुंबई पोलिसांच्या बॅण्डची गणपती बाप्पाला म्युझिकल सलामी, कोणते गाणे वाजवले पाहा

मुंबई पोलीसांच्या खाकी स्टुडीओ बँड पथकाने गणपती बाप्पाला अनोख्या संगीतमय पद्धतीने निरोप देत पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आवाहन केले आहे.

Anant Chaturdashi 2023 | मुंबई पोलिसांच्या बॅण्डची गणपती बाप्पाला म्युझिकल सलामी, कोणते गाणे वाजवले पाहा
khaki studio
Image Credit source: socialmedia
| Updated on: Sep 28, 2023 | 12:57 PM

मुंबई | 28 सप्टेंबर 2023 : मुंबई पोलिसांच्या ब्रँडचा एक अनोखा इतिहास आहे. सर्वत्र आज बाप्पाला निरोप दिला जात असून पुढच्या वर्षी नक्की येण्याचे लाडीक आवाहन केले जात आहे. मुंबई पोलिसांच्या खाकी स्टुडीओ बँण्ड पथकाने देखील बाप्पाला आपल्या संगीतातून अनोखी सलामी दिली आहे. बाप्पाच्या मिरवणूकीत हटकून वाजविले जाणाऱ्या गाण्याची धून वाजवून मुंबई पोलिसांनी बाप्पाच्या मिरवणूकीची रंगत वाढविली आहे. बरोबर तुम्ही योग्यप्रकारे ओळखले आहे. बाप्पाच्यासाठी मुंबई पोलिसांच्या बँण्ड पथकाने तुमचे आमचे सर्वांचे आवडते ‘ ‘देवा श्री गणेशा’ हे गाणे वाजविले आहे.

गणपती बाप्पा दहा दिवसांचा भक्तांचा पाहुणचार आटोपून आता विसर्जनासाठी सज्ज झाला आहे. अनंतचतुदर्शी 2023 ची मिरवणूकी सुरु झाल्या असून मोठमोठ्या सार्वजनिक गणेश मंडळाचे गणपती विसर्जनासाठी मुंबईतील चौपाट्याच्या वाजतगाजत मिरवणूकीने निघाले असताना मुंबई पोलिसांच्या खाकी स्टुडीओ बँण्ड बाप्पाला म्युझिकल ट्रीट दिली आहे. मुंबई पोलिसांनी अग्निपथ चित्रपटातील ‘देवा श्री गणेशा’ हे बाप्पाला वाहिलेले गीत सुरेख पद्धतीने वाजविले आहे. पोलिसांच्या बँण्ड पथकाने या गीताला इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. याला त्यांनी सुरेख कॅप्शन दिली आहे, ‘when music meets devotion.’ गणेशोत्सवात मुंबई पोलिसांनी शेअर केलेल्या या पोस्टला 90 हजाराहून अधिक लोकांनी पाहीले आहे आणि अनेकांनी कमेंट लिहील्या आहेत.

हाच खाकी स्टुडीओचा व्हिडीओ –

अनेक युजरनी या म्युझिकल व्हिडीओला कमेंट दिले आहेत. अनेकांनी हार्ट इमोजी देऊन या व्हिडीओचे कौतूक केले आहे. तर एका युजरने वॉव अशी कमेंट दिली आहे. तर एका युजरने मस्त गाणे वाजविले आहे असे म्हटले आहे. या सर्वांचे एकच आवाज घुमत आहे की, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या !