जनावरांना देखील स्वप्नं पडतात! जाणून घ्या, त्यांची स्वप्नं कशी असतात

आपण स्वप्नं पाहत असतो, पण कधी तुम्ही विचार केला आहे का की आपल्या पाळीव प्राण्यांनाही स्वप्नं पडतात? तर याचे ऊत्तर आहे हो...कुत्रं, मांजर, आणि इतर काही जनावरांनाही स्वप्नं पडतात. परंतु त्यांना स्वप्न कसे पडतात आणि ते चांगले असतात की व्हाईट चला जाणून घेऊ.

जनावरांना देखील स्वप्नं पडतात! जाणून घ्या, त्यांची स्वप्नं कशी असतात
प्राण्यांना पण पडतात स्वप्न
| Edited By: | Updated on: Apr 16, 2025 | 3:56 PM

आपण झोपेत स्वप्नं पाहतो, काही वेगळी, काही भयानक. पण कधी तुम्ही विचार केला आहे का, की आपल्या घरातील कुत्रा किंवा मांजर देखील स्वप्न पाहू शकतात? हो, हे सत्य आहे! वैज्ञानिक संशोधनांमधून हे समोर आले आहे की, माणसांप्रमाणेच काही जनावरांना देखील स्वप्नं पडतात. विशेषतः पाळीव प्राण्यांसारख्या कुत्र्यांना आणि मांजरांना हे जास्त दिसून येते. चला, जाणून घेऊया या विषयाविषयी अधिक.

जनावरांना स्वप्नं का पडतात?

वैज्ञानिकांच्या मते, झोपेत असताना शरीराच्या मेंदूचा एक भाग सक्रिय असतो, ज्यामुळे शरीराच्या मानसिक प्रक्रिया आणि स्वप्नांचे अनुभव चालू राहतात. 1950 मध्ये वैज्ञानिकांनी ‘रॅपिड आय मूव्हमेंट’ (REM) झोपेचा शोध लावला. हा झोपेचा एक प्रकार असतो, जो स्वप्नं पाहण्याशी संबंधित असतो. या वेळेस, माणसांसोबतच, कुत्रं आणि मांजर देखील स्वप्न पाहतात. REM झोपेची अवस्था माणसांप्रमाणेच अन्य सस्तन प्राणी, पक्षी आणि काही सरपटणारे प्राणी देखील अनुभवतात.

झोपेत जनावरांचे वर्तन कसे असते?

कधी आपल्या घरातील कुत्रं किंवा मांजर झोपेत दचकून उठतात किंवा अचानक पाय हलवतात? हे सर्व स्वप्नं पाहण्याचं लक्षण आहे. जर कुत्रं झोपेत भुंकत असेल किंवा पाय हलवत असेल, तर ते स्वप्नात एखाद्या प्राण्याचा पाठलाग करत असू शकतात. त्याचप्रमाणे, मांजर झोपेत ‘म्याऊ’ करत असेल, तर ते देखील काही चांगले किंवा भयानक स्वप्न पाहत असू शकते.

जनावरांची स्वप्नं कशी असतात?

वैज्ञानिकांचा असा विश्वास आहे की, जनावरांना देखील चांगली आणि वाईट स्वप्नं पडतात. चांगली स्वप्नं म्हणजे, ते कदाचित आपल्या आवडत्या खेळण्याशी खेळत असू शकतात, किंवा मजा करत असू शकतात. पण जर त्यांना भयानक स्वप्न पडले, तर ते घाबरतात आणि झोपेत विचित्र हालचाली करतात. उदाहरणार्थ, जर कुत्र्याला स्वप्नात त्याचं आवडतं खेळणं दिसलं, तर तो पाय हलवेल, किंवा मांजराला स्वप्नात एखाद्या उंदराबद्दल मजा दिसली, तर ती पंजा हलवेल.

स्वप्नांचा मानसिक आणि शारीरिक परिणाम

प्रत्येक प्राणी आपल्या मानसिक आणि शारीरिक अनुभवाच्या आधारावर स्वप्नं पाहतो. कुत्रं किंवा मांजर जर भयानक स्वप्न पाहत असतील, तर ते दचकून उठतात किंवा विचित्र हालचाली करतात. यामुळे त्यांच्या शरीराची ऊर्जा आणि मानसिक स्थिती प्रभावित होऊ शकते. तथापि, हे लक्षात घेण्यासारखं आहे की, स्वप्नं हा एक नैसर्गिक शारीरिक प्रक्रियांचा भाग आहे आणि यामुळे कोणत्याही प्रकारचा धोका नाही.

तुम्ही घरी असलेल्या पाळीव प्राण्यांच्या स्वप्नांचा अनुभव घेत असाल, तर पुढच्या वेळेस त्यांच्या झोपेत दचकणं किंवा हलणं पाहून त्यांचा अनुभव अधिक समजून घेऊ शकता. खरंतर, हे सर्व त्यांच्या मानसिक स्थितीचे आणि शारीरिक प्रक्रियेचे लक्षण असू शकतात.