
प्रसिद्ध कथावाचक अनिरुद्धाचार्य जी ( aniruddhacharya ji maharaj ) महाराज यांच्या दरबारात एका महिलेने आपल्या पतीच्या आणि सासरच्या मंडळींचा पाढा वाचला. या महिलेने आपली आपबिती सांगत गुरुजींना आधी आपल्याला गुरुमंत्र देण्याची मागणी केली आहे. त्यानंतर महाराजाना ती म्हणाली की गुरूजी माझा संसार असा चालला आहे की ते लोक मला नांदवायला तयार नाहीत, ज्यावर महाराज त्या महिलेला म्हणाले की असे ते का करत आहेत…
या महिलेने माईकवर सांगितले की माझे लग्न तर लावले परंतू माझे पती आता माझे तोंड देखील पाहात नाही.त्याने म्हटले की तू माहेरी राहा. शिलाई मशीनचे काम कर आणि मी तुला दुकान उघडून देतो. महिन्यातून एकदा येईन, सासू म्हणते की तू येथे येते तेव्हा भांडणं होतात. महिला पुढे म्हणाली की माझे पती आणि दीर दारु पितो. लग्नाच्या चार वर्षानंतरही मला मुल झालेले नाही. सासू मला म्हणते की ती मला सोडणार आहे.आणि माझ्या पतीचे दुसरे लग्न लावून देणार अशी म्हणत आहे.
गुरुजी, माझे नातेवाईक म्हणतात की माझ्या पतीने माझ्यासाठी दिल्लीत घर घेतले आहे. आणि दुसऱ्या महिलेसोबत राहत आहे. सासू मला घरात घुसू देत नाही. अनिरुद्धाचार्य जी यांनी या महिलेचे ऐकून घेतल्यानंतर संतापले. त्यानंतर त्यांनी तिला एक सल्ला दिला, अरे तू सासूच्या उरावर बस आणि तेथेच राहा, सासूच्या उरावर मिऱ्या वाट…
येथे व्हिडीओ पाहा –
गुरुजी पुढे म्हणाले की ही पण माहीती काढ तूझ्या पतीचे बाहेर कुठे लफडे तर नाही ना. तु दुर्गा हो आणि काली आणि महाकाली बन. पतीला वाचवू नको. त्याला वाटतेय की तू दूर व्हावी म्हणजे त्याला तेथे लफडी करायला तो मोकळा होईल.सासरलाच राहा आणि पतीची सेवा कर, सासूची सेवा कर, आणि पतीशी कोणी संबंध ठेवत असेल तिचे दात पाड. म्हातारी जर तुला पती सोबत राहूच देत नाही तर मुलं कशी होणार ? महिला पुढे म्हणाले की गुरुजी मी तर जाईल सासुरवाडीला पण त्यांनी मला घुसूच दिले नाही तर ? यावर अनिरुद्धाचार्यजी म्हणाले की का नाही घुसू देणार ? तू हातोडी घेऊन जा, दार तोड आणि घरात घुसून जा…