विमान उड्डाण घेणारच होतं, तेवढ्यात केबिनमध्ये असं काही दिसलं… प्रवासी सीट सोडून पळायला लागले? असं काय घडलं?
अहमदाबाद विमान अपघातानंतर सर्वांनाच आता विमान प्रवासाची भीती वाटते. एका विमान प्रवासादरम्यान पुन्हा एकदा एक अशी गोष्ट घडली आहे. विमानातच लोक त्यांटे सीट सोडून चक्क सैरावैरा पळू लगाले. विमान उड्डाण करणारच होतं तोच मोठा गोंधळ निर्माण झाला.

अहमदाबाद विमान अपघातानंतर लोकांच्या मनात आता विमान प्रवासाची आता भीती निर्माण झाली आहे. गेल्या महिन्याभरात अशा अनेक घटना कानवर पडल्या की त्यामुळे लोकांना हवाई प्रवास आता सुरक्षित राहिलं आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आता विमानात बसताना देखील प्रवाशांच्या मनात एक भीती असते. किंवा काहीजरी गडबड आहे असं वाटलं तरी प्रवशांमध्ये गोंधळ निर्माण होतो.असंच काहीस घडलं आहे एका विमान प्रवासादरम्यान. विमान उड्डाण घेणारचं होतं, तोच एक गोंधळ सुरु झाला, प्रवासी आपले सीट सोडून एकडे तिकडे पळू लागले. ही घटना घडली आहे ऑस्ट्रेलियात.
संपूर्ण विमानात गोंधळ उडाला
ऑस्ट्रेलियामध्ये एका देशांतर्गत विमानात, सर्व प्रवासी विमानात बसले होते आणि ते विमान उड्डाण होण्याची वाट पाहत होते. दरम्यान, विमानात अंस काहीतरी दिसलं की, ज्यामुळे सर्व प्रवासी सैरावैरा धावू लागले.त्याचं झालं असं की, एक प्रवासी सामानाच्या केबिनमध्ये त्याचे सामान ठेवत होता. त्याचदरम्यान, त्याला तिथे काहीतरी विचित्र हालचाल होताना दिसली. त्याने जवळ जाऊन पाहिले अन् तो घाबरला आणि संपूर्ण विमानात गोंधळ उडाला.
सामानाच्या केबिनमध्ये आढळलं असं काही
मंगळवारी मेलबर्न विमानतळावर ही घटना घडली जेव्हा व्हर्जिन ऑस्ट्रेलियाचे ब्रिस्बेनला जाणारे विमान VA337 प्रवाशांना घेऊन उड्डाण करण्याच्या तयारीत होते. तेवढ्यात एका प्रवाशांना केबीनमध्ये सामान ठेवताना चक्क साप दिसला. आणि ते पाहून सर्व प्रवासी घाबरले. पण त्याचं दरम्यान साप पकडण्याचे तज्ज्ञ मार्क पेली यांना याची माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सांगितले की हा सुमारे दोन फूट लांबीचा हिरवा साप होता. तो विषारी नव्हता, परंतु जेव्हा त्यांनी पहिल्यांदा साप पाहिला तेव्हा अंधारामुळे त्यांना वाटले की तो विषारी असू शकतो.
विमान उड्डाणाला सुमारे दोन तास उशीर झाला
विमान कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, विमान उड्डाणाला सुमारे दोन तास उशीर झाला. ब्रिसबेन परिसरात असे साप आढळत असल्याने, पेले यांचा अंदाज आहे की तो प्रवाशांच्या सामानातून आला असावा. व्हर्जिन ऑस्ट्रेलियाने एका निवेदनात म्हटले आहे की, प्रवाशांची सुरक्षा ही त्यांची प्राथमिकता आहे आणि म्हणूनच त्यांनी साप सापडल्यानंतर लगेचच उड्डाण थांबवले आणि आवश्यक ती सर्व पावले उचलली. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल त्यांनी माफीही मागितली.
ऑस्ट्रेलियातील घरांमध्ये आणि अशाच प्रकारच्या विचित्र ठिकाणी साप आढळण्याच्या घटना नवीन नाहीत. ऑस्ट्रेलिया हे जगातील सर्वात विषारी सापांचे घर असल्याचे म्हटले जाते. यावेळी सापडलेला साप विषारी नसला तरी, विमानात साप सापडणे हे नक्कीच विचित्र वाटण्यासारखे आहे.
