
बाबा वेंगा ही तिच्या भविष्यवाण्यांसाठी ओळखली जाते. भविष्यात काय घडेल याची प्रत्येकाला उत्सुकता असते. पण अर्थात भविष्यातील घडामोडी कळतील असे कोणतेही तंत्रज्ञान विज्ञानाने अजून विकसीत केलेले नाही. पण काही लोक त्यांच्याकडे अद्भूत शक्ती असल्याचा दावा करत काही भाकीत करतात. जगात अनेक भविष्यवेत्ते आहेत. त्यात नास्त्रेदमस, बाबा वेंगा यांचे नाव अग्रक्रमाने घेतल्या जाते. त्यांच्या काही भविष्यवाण्या खऱ्या ठरल्याचा दावा करण्यात येतो. बाबा वेंगाच्या 9/11 अमेरिकन हल्ला, इसिसचा उदय, त्सुनामी ही भाकीतं खरी ठरल्याचा दावा करण्यात येतो. आता तिने अजून एक मोठे भाकीत केले आहे. त्यात एका सायलंट किलरचा उल्लेख गूढ काव्यातून करण्यात आला आहे. काय आहे ते भाकीत?
बाबा वेंगा हिचा जन्म 1911 मध्ये बुल्गारियामध्ये झाला होता. तर वयाच्या 86 व्या वर्षी 1996 मध्ये तिचे निधन झाले. 12 व्या वर्षी तिची नजर गेली. तिला अंधत्व आले. पण तिला अलौकिक शक्तीमुळे जगातील पुढील घटनांचा अभास होऊ लागला. त्या घटना तिला अंतर्मनाने दिसू लागल्या आणि ती त्या सांगू लागली. तिचे अनुयायी, मित्रांनी ते एका गूढ काव्यात टिपले.
कोणता आहे तो सायलंट किलर?
गॅझेट, मोबाईलचा सातत्याने वापर, स्पर्धा यामुळे मानव निराशाचे शिकार होईल, त्याचे मानसिक स्वास्थ्य हरवेल. तो सतत बैचेन दिसेल. तो अस्वस्थ असेल. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत लोक अस्वस्थ, चिडचिडे आणि काही तरी हरवल्यागत दिसतील, असे भाकीत बाबा वेंगा हिने केले आहे. अतिचंचलता, प्रसिद्धी, पैशासाठी तो हपापलेला असेल. त्यातूनच त्याचे मानसिक स्वास्थ्य हरवेल. हाच तो सायलंट किलर असल्याचा भाकीत बाबा वेंगाने केल्याचा दावा करण्यात येत आहे. सध्याचे चित्र याहून वेगळे आहे असे म्हणता येत नाही.
भारताच्या राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने (NCPCR) एक अहवाल तयार केला आहे. त्यानुसार, 24% लोक हे झोपण्यापूर्वी स्मार्टफोनचा वापर करतात. तर जवळपास 37% मुलं हे गरजेपेक्षा अधिक काळ स्क्रीन पाहतात. त्यामुळे त्यांचे अभ्यासावर लक्ष केंद्रित होत नाही. त्यांची चिडचिड वाढली आहे. तर फोनमुळे अनेकांना नैराश्य आले आहेत.
डिस्क्लेमर : बाबा वांगा यांच्या भविष्यवाण्या साधारणतः अस्पष्ट आणि विविध अर्थांनी सांगण्यात येतात. हा लेख केवळ माहितीपर आणि चर्चेच्या हेतूने देण्यात आला आहे. या दाव्याची टीव्ही ९ मराठी पुष्टी करत नाही.