Baba Vanga Prediction : पाकिस्तानचा विनाश अटळ? बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचे ते सत्य…

Baba Vanga Prediction India-Pakistan : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने करारा जबाब देण्याचा इशारा दिल्याने पाकिस्तानच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यातच आता बाबा वेंगाच्या या भविष्यवाणीने त्यांची झोप उडवली आहे. काय आहे ते भाकीत?

Baba Vanga Prediction : पाकिस्तानचा विनाश अटळ? बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचे ते सत्य...
बाबा वेंगा भाकीत
Image Credit source: गुगल
| Updated on: Apr 29, 2025 | 8:58 PM

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने जशाच तसे उत्तर देण्याचा इशारा दिला आहे. या हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तानच्या पोटात गोळा आला आहे. अगोदर पोकळ धमक्या देणार्‍या पाकिस्तानी मंत्र्यांचा सूर मावळला आहे. भारताने सर्व प्रकारे पाकिस्तानीच दमकोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. तर भारत केव्हापण आक्रमण करेल या भीतीने पाकड्यांचा थरकाप उडाला आहे. भारताने सिंधू पाणी करार रद्द करत थेट संदेश दिला आहे. त्यामुळे आता पाकिस्तानचा विनाश अटळ असल्याचा दावा तज्ज्ञ करत आहेत. अशीच काहीशी भविष्यवाणी बाबा वेंगाने केली आहे. वर्ष 2025 मध्ये हे भाकीत खरं ठरेल का?

Baba Vanga चे खरे नाव वेंजोलिया पांडेवा गुश्टेरोवा असे होते. बाबा वेंगा ही अनेक भाकि‍तांसाठी प्रसिद्ध आहे. तिच्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्याचा दावा अनेकदा करण्यात येतो. तिने यापूर्वी दुसरे महायुद्ध, सोव्हिएत संघाचे तुकडे, 11 सप्टेंबर 2001 मधील हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान युद्धात पाकिस्तान नेस्तनाबूत होण्याची शक्यता तिने वर्तवली आहे. तिने एकदम अचूक आणि स्पष्ट भविष्य सांगितले नसले तरी पाकिस्तान बरबाद होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आल्याचे सांगण्यात येते.

बाबा वेंगाच्या भाकि‍ताचे सत्य काय?

समाज माध्यमावर बाबा वेंगाची ही भविष्यवाणी प्रसिद्ध झाली आहे. भारत आणि पाकिस्तान दरम्यान युद्ध होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. काही समाज माध्यमावर त्याविषयीचे भाकीत करण्यात येत आहे. त्यानुसार यावर्षी दोन्ही देशात युद्ध होईल. त्यात पाकिस्तानमधील लष्करातील अनेक जण युद्धापूर्वीच माघारी फिरतील. काही जण लढतील, तर काही जण शरणागती पत्करतील. पाकिस्तानला हे युद्ध महागात पडेल असा दावा करण्यात येत आहे.

पाकिस्तानने यापूर्वी खाल्ली माती

कुरापतीखोर पाकिस्तानने यापूर्वी अनेकदा भारतासमोर नांग्या टाकल्या आहेत. भारत पाकिस्तान दरम्यान 1947, 1965, 1971 आणि 1999 (कारगिल ) युद्ध झाले आहे. या प्रत्येक युद्धात पाकिस्तानने माती खाल्ली आहे. त्याची जगभर नाचक्की झाली आहे. आताही पाकिस्तानला युद्धाची खुमखुमी चढली आहे. दहशतवाद्यांच्या आडून तो भारताला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे.

डिस्क्लेमर : बाबा वेंगा यांच्या भविष्यवाण्या साधारणतः अस्पष्ट आणि विविध अर्थांनी सांगण्यात येतात. हा लेख केवळ माहितीपर आणि चर्चेच्या हेतूने देण्यात आला आहे. या दाव्याची टीव्ही ९ मराठी पुष्टी करत नाही.