AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Baba Vanga Prediction : ती भविष्यवाणी पहलगाम हल्ल्याविषयी तर नाही? बाबा वेंगाच्या त्या भाकि‍ताची जोरदार चर्चा, काय होता दावा?

Baba Vanga Prediction : पाकिस्तान पुरस्कृत पहलगाम हल्ल्याचा जगभरातून तीव्र निषेध व्यक्त होत आहे. 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे निरपराध पर्यटकांवर बेछूट गोळीबार करण्यात आला. त्यात 26 जणांना प्राण गमवावे लागेल. आता बाबा वेंगाची ती भविष्यवाणी पहलगामविषयी असल्याचा दावा करण्यात येत आहे.

Baba Vanga Prediction : ती भविष्यवाणी पहलगाम हल्ल्याविषयी तर नाही? बाबा वेंगाच्या त्या भाकि‍ताची जोरदार चर्चा, काय होता दावा?
पहलगाम हल्ला, ते भाकीत काय?Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Apr 26, 2025 | 4:09 PM
Share

Baba Vanga Predictions on Pahalgam Terror Attack : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाम हल्ला केला. त्यात देशातील विविध भागातील 26 निरपराध पर्यटकांचा जीव गेला. ही मंडळी त्या कुटुंबाचा आधार होती. या हल्ल्यातून हिंदूंना टार्गेट करण्यात आले. तर जे स्थानिक मुस्लिम मदतीला धावले, त्यांच्यावर सुद्धा गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानविरोधात देशभरात संतापाची लाट आहे. दरम्यान बल्गेरियाची भविष्यवेत्ता बाबा वेंगा हिच्या त्या भाकि‍ताची सध्या चर्चा होत आहे. हे भाकीत पहलगाम हल्ल्याशी संबंधित असल्याचा दावा करण्यात येत आहे. बाबा वेंगाने भाकीत केले आहे की मुस्लिम दहशतवादी संघटना जगात दहशत पसरवतील. ते निरपराध लोकांना मारतील.

काही भविष्यवाण्या खऱ्या ठरल्याचा दावा

बाबा वेंगा हिचा जन्म 1911 साली बल्गेरियात झाला होता. ती जन्मत:च अंध होती. ती एक मनोवैज्ञानिक आणि भविष्यवेत्ती म्हणून प्रसिद्ध होती. तिचे अनेक अनुयायी होते. ती भविष्यातील गोष्टी, घटना या गूढ काव्यात सांगायची आणि तिचे शिष्य ते शब्द रुपात नोंदवायचे. त्यावेळी त्या घटनांवर कुणाला विश्वास बसला नाही. पण तिने वर्तवलेले भाष्य आणि घटना जुळल्यानंतर तिच्या गूढ काव्याकडे अनेकांचे लक्ष वेधल्या गेले. बाबा वेंगा हिचा मृत्यू 1996 साली झाला.

डेली मेल नुसार, तिने अमेरिकेवरील 9/11 चा हल्ला, राजकुमारी डायनाचा मृत्यू , चीनचा जागतिक शक्ती म्हणून उदय यासारख्या अनेक भविष्यवाण्या केल्या आहेत. तिने पाकिस्तानमधील काही विध्वंसक शक्ती डोके वर काढतील. लोकांना मारतील. त्यानंतर भारत पाकिस्तानवर हल्ला करेल असे भाकीत गूढ काव्यात केल्याचा दावा करण्यात येतो. तिने वर्ष 2043 पर्यंत जगातील अनेक देशात इस्लामी शासन येईल असा दावा केला आहे. तिने युरोपातील जनतेवर मुस्लिम शासक राज्य करतील. त्यांचा धर्म थोपवण्याचा प्रयत्न करतील असे भाकीत केले आहे.

डिस्क्लेमर : बाबा वेंगा यांच्या भविष्यवाण्या साधारणतः अस्पष्ट आणि विविध अर्थांनी सांगण्यात येतात. हा लेख केवळ माहितीपर आणि चर्चेच्या हेतूने देण्यात आला आहे. या दाव्याची टीव्ही ९ मराठी पुष्टी करत नाही.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.