जपानमध्ये हाय अलर्ट! पूर, भूस्खलनाचा धोका, मुसळधार पावसाने हाहा:कार, बाबा वेगांची भविष्यवाणी खरी ठरणार?

Floods, landslides, heavy rains in Japan : जपानची बाबा वेंगा म्हणून जगाला ओळख झालेली रिओ तात्सुकीचे भाकीत खरं ठरणार की काय अशी परिस्थिती या देशात उद्भवली आहे. मुसळधार पाऊस, महापूर, भूस्खलनाने जपान हादरला आहे.

जपानमध्ये हाय अलर्ट! पूर, भूस्खलनाचा धोका, मुसळधार पावसाने हाहा:कार, बाबा वेगांची भविष्यवाणी खरी ठरणार?
जपानमध्ये पावसाचे थैमान
Image Credit source: गुगल
| Updated on: Jul 11, 2025 | 1:55 PM

Rio Satsuki Predictions : जपानमध्ये तुफान पाऊस पडला आहे. टोकियोला पुराचा धोका निर्माण झाला आहे. जपानमधील अनेक भागांना पावसाने तुफान झोडपले आहे. जपानमध्ये पावसामुळे आपत्कालीन स्थिती घोषित करण्यात आली आहे. प्रशासनाने नागरिकांना अलर्ट राहण्याचा इशारा दिला आहे. नागरिकांनी या काळात घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्यामुळे जपानमध्ये हाहा:कार उडाला आहे. जपानची बाबा वेंगा म्हणून ओळखली जाणारी बाबा वेंगा रिओ सात्सुकी हिने जपानमध्ये मोठे संकट कोसळण्याचे भाकीत वर्तवले होते. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती.

जपानमध्ये पावसाचा हाहा:कार

जपानची राजधानी टोकियो शहराला पावसाने झोडपले आहे. टोकियोला पुराचा फटका बसला आहे. मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यावर पाण्याचे पाट वाहत आहेत. अनेक भागात जलकोंडी झाली आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेकांच्या छत्र्या उडाल्या. तर नागरिकांना चालणे पण असह्य झाले होते. काही इमारती आणि मॉलमध्ये छतातून पाणी पडत असल्याचे चित्र दिसले. तर मॅनहोलची झाकणं उडताना व्हिडिओत दिसली. जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली. तर काही भागात भूस्खलन झाल्याची माहिती समोर येत आहे.

रिओ तात्सुकीचे भाकीत खरं ठरणार?

जपानची मंगा कलाकार रिओ तात्सुकी (Ryo Tatsuki) हिने जपानमध्ये प्रलय येण्याचे भाकीत अगोदरच वर्तवले आहे. 5 जुलै ही तारीख त्यादृष्टीने महत्त्वाची मानण्यात येत होती. पण त्यादिवशी काही घडले नाही. पण जपान शेजारील बेटांना भूकंपाचे तीव्र झटके बसले तर टोकियोला पावसाने झोडपून काढले आहे. अनेक जण त्याचा संबंध आगामी महासंकटाशी लावत आहेत.

रिओ तात्सुकी या लेखिका आणि चित्रकार आहेत. “The Future I Saw” (2021 मधील सुधारीत आवृत्ती) या पुस्तकात तिने जुलै 2025 मध्ये जपान आणि इतर काही देशांना नैसर्गिक संकटाचा मोठा सामना करावा लागेल, असे भाकीत केले आहे. या काळात समुद्रात गगनचुंबी लाटा उसळतील. 2011 मधील तोहोकू भूकंपापेक्षा अधिक विनाशकारी त्सुनामी येईल असे भाकीत तिने वर्तवले होते. जपान, तैवान, इंडोनेशिया, उत्तरी मारियाना बेट समूह, व्हिएतनामसह अनेक देशांच्या किनारपट्यांना त्याचा फटका बसेल असे भविष्य तिने वर्तवलेले आहे. पण या 5 जुलै रोजी तिच्या भाकीतानुसार काहीच घडले नाही. पण अनेक जण जुलै अथवा ऑगस्ट महिन्यात अशा घटना घडणार असल्याचा दावा करत आहेत.