या डोळ्यांच्या तेजापुढे जगातील सर्व संपत्ती फिकी… गौतम अदानी यांनी शेअर केला हा फोटो

Billionaire industrialist Gautam Adani: ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सच्या यादीत गौतम अदानी 13 व्या स्थानी आहे. त्यांच्या आधी रिलायन्स समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी आहे. मुकेश अंबानी 11 व्या क्रमांकावर आहे. त्यांच्या 113 अब्ज डॉलरची संपत्ती आहे.

या डोळ्यांच्या तेजापुढे जगातील सर्व संपत्ती फिकी... गौतम अदानी यांनी शेअर केला हा फोटो
Gautam Adani Image Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Apr 02, 2024 | 3:28 PM

भारतातील श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी नेहमी चर्चेत असतात. आपल्या उद्योगात ते खूपच व्यस्त असतात. परंतु त्यानंतर कुटुंबासाठी आपला वेळ राखीव ठेवत असतात. गौतम अदानी यांची नुकतीच लंडनमध्ये एक मुलाखत घेण्यात आली होती. त्यात त्यांनी कुटुंबाचे महत्व अधोरिखित केले. घरी आल्यावर नातवासोबत खेळल्यानंतर आपला तणाव नाहीसा होत असल्याचे अदानी यांनी म्हटले. माझ्यासाठी काम आणि कुटुंब या दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत. कुटुंब ही आपली सर्वात मोठी शक्ती असल्याचे त्यांनी त्या मुलाखतीत म्हटले.

गौतम अदानीसोबत त्यांची नात

गौतम अदानी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी आपल्या व्यक्तीमत्वाचा दुसरा पैलू दाखवला आहे. आपल्या 14 महिन्यांच्या नाती ते खेळवत असताना या फोटोमध्ये दिसत आहेत. हा फोटो शेअर करत अदानी यांनी म्हटले आहे की, ‘जगातील कोणतीही संपत्ती या डोळ्यांपुढे फिकी आहे.’ या एका ओळीत त्यांनी सर्व काही सांगितले आहे. या फोटोमध्ये गौतम अदानी यांची लहान नाती कावेरी आहे. ती करण अदानी आणि परिधी यांची तिसरी मुलगी आहे. लंडनमधील सायन्स म्यूझियमध्ये 21 मार्च हा फोटो घेतला गेला आहे.

हे सुद्धा वाचा

युजर्सकडून कौतूक

गौतम अदानी यांच्या पोस्टला युजर्सकडून भरभरून प्रतिसाद देण्यात आला आहे. आजच्या दिवसातील हा सर्वात चांगला फोटो असल्याचे एका युजर्सने म्हटले आहे. दुसरा युजर्स म्हणतो, आपण खूप महत्वाचे वाक्य लिहिले आहे. आणखी एक जण म्हणतो, मुद्दलपेक्षा व्याज महत्वाचे आहे.

गौतम अदानी यांच्याकडे किती संपत्ती

गौतम अदानी यांची संपत्ती 102 अब्ज डॉलर आहे. ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सच्या यादीत गौतम अदानी 13 व्या स्थानी आहे. त्यांच्या आधी रिलायन्स समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी आहे. मुकेश अंबानी 11 व्या क्रमांकावर आहे. त्यांच्या 113 अब्ज डॉलरची संपत्ती आहे.

Non Stop LIVE Update
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.