VIDEO | रोलर कॉस्टर राइड सुरु असताना अचानक पक्षी आला आणि…

आपण एखाद्या अॅम्यूजमेंट पार्कमध्ये गेल्यानंतर कधी ना कधी रोलर कोस्टरची सवारी नक्कीच करतो. (Roller Coaster Ride Bird Slams Into Man Face)

VIDEO | रोलर कॉस्टर राइड सुरु असताना अचानक पक्षी आला आणि...
Roller Coaster Ride
| Updated on: Mar 27, 2021 | 1:17 PM

मुंबई : रोलर कोस्टर हे नाव जरी घेतलं तरी अनेकजण उत्साही होतात. आपण एखाद्या अॅम्यूजमेंट पार्कमध्ये गेल्यानंतर कधी ना कधी रोलर कोस्टरची सवारी नक्कीच करतो. लहान मुलांपासून ते अगदी वृद्ध रोलर कोस्टर अनुभव घेतात. नुकतंच सोशल मीडियावर अॅम्यूजमेंट पार्कमधील व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही पोट धरुन हसाल. (Bird Slams Into Man Face During Roller Coaster Ride Video Viral)

अम्यूजमेंट पार्कमधील रोलर कोस्टर राईड ही सर्वात मनोरंजक सवारी मानली जाते. सध्या असाच एका रोलर कोस्टर राईडचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत दोन तरुण मित्र रोलर कोस्टर राईडची मजा घेताना दिसत आहेत. त्यावेळी रोलर कोस्टर हवेमध्ये स्विंग होत असतानाच त्यातील एका व्यक्तीच्या गळ्याजवळ पक्षी अडकतो. यानंतर तो व्यक्ती त्या पक्ष्याला बाजूला काढतो. त्यादरम्यान तो फार विचित्र प्रतिक्रिया देतो.

हा व्हिडीओ Rex Chapman यांनी शेअर केला आहे. याला कॅप्शन देताना त्यांनी फक्त पक्षी एवढेच लिहिले आहे. हा व्हिडीओ नक्की कोणत्या ठिकाणचा आहे, याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक जण थक्क झाले आहेत. तर अनेकांना त्यांचे हसू आवरता येत नाही.

हा व्हिडीओ आतापर्यंत 8 लाख 87 हजार अधिक लोकांनी पाहिला आहे. तसेच 20 हजार लाईक्स मिळाले आहेत. तर 3400 हून अधिक लोकांनी हा व्हिडीओ रिट्वीट केला आहे.

(Bird Slams Into Man Face During Roller Coaster Ride Video Viral)

संबंधित बातम्या : 

VIDEO | विद्यार्थी UPSC ची तयारी कशी करतात?, IAS अधिकाऱ्याने शेअर केला मजेदार व्हिडीओ, तुम्हालाही येईल हसू

Nose Only Mask | फक्त नाकाला झाकणारा ‘हा’ मास्क ठऱतोय जगभरात चर्चेचा विषय, जाणून घ्या नेमके वैशिष्ट्य काय?

VIDEO | पोलिसाने सुनसान रस्त्यावर थांबवलं, त्यानंतर जे घडलं त्यावर विश्वास बसणार नाही