AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | पोलिसाने सुनसान रस्त्यावर थांबवलं, त्यानंतर जे घडलं त्यावर विश्वास बसणार नाही

तामिळनाडूमध्ये अशी एक घटना समोर आली आहे, जी वाचून तुम्हालाही भरुन येईल. पोलिसाच्या संवेदना बघून तुम्हीसुद्धा त्याला सॅल्यूट ठोकाल. (tamilnadu police medicine)

VIDEO | पोलिसाने सुनसान रस्त्यावर थांबवलं, त्यानंतर जे घडलं त्यावर विश्वास बसणार नाही
या पोलिसाने दुचाकीस्वाराला अडवून बसमधील महिलेला औषधी देण्यास सांगितले.
| Updated on: Mar 26, 2021 | 1:00 AM
Share

पुदुच्चेरी : तुम्ही एखाद्या सामसूम रस्याने जात आसाल आणि अचानक एका पोलिसाने तुम्हाला पकडलं तर तुमच्यामनात सुरुवातीला कोणते विचार येतील?. निश्चितच तुम्ही घाबरुन जाल. तुम्हाला वाटेल की हा पोलीस आता आपल्याकडे आपले ड्रायव्हिंग लायसन्स, गाडीचे कागदपत्रं आणि इतर गोष्टी मागेल. तामिळनाडूमध्ये अशी एक घटना समोर आली आहे, जी वाचून तुम्हालाही भरुन येईल. पोलिसाच्या संवेदना बघून तुम्हीसुद्धा त्याला सॅल्यूट ठोकाल.(Tamilnadu police stopped bike and asked biker to give the medicine of women who had dropped it on road)

नेमका प्रकार काय?

मिळालेल्या माहितीनुसार Tenkasi वरुन पुदुच्चेरी येथे एक बस जात होती. त्या बसच्या मागे काही अंतरावर एक दुचाकीस्वार जात होता. या दुचाकीस्वाराला रस्त्यावरील एका पोलिसाने अचानकपणे हात केला. या पोलिसाने दुचाकीस्वाराला आडवत त्याच्याकडे एक औषधाची बॉटल दिली. तसेच, ही बॉटल समोर गेलेल्या बसमधील एका महिलेची आहे, असेही या पोलिसाने त्या दुचकीस्वारास सांगितले. समोरच्या बसचा पाठलाग करून ही औषधाची बॉटल त्या महिलेला देण्याचीही विनंती त्या पोलिसाने दुचाकीस्वारास केली.

त्यानंतर दुचाकीस्वारानेसुद्धा औषधांची गरज ओळखून लगेचच पोलिसाकडून ते औषध घेतले. त्याने समोरच्या बसचा पाठलाग करुन सुनसान रस्त्यावर बसला अडवले. बसचालकानेसुद्धा वेळेचे महत्त्व समजून रस्त्यामध्ये बस थांबवली. त्यानंतर दुचाकीस्वाराने ज्या महिलेचे औषध पडले होते, ते तिला परत दिले.

पोलिसचालकाने दुचाकीस्वारास आडवून, त्याला महिलेला औषध सुपूर्त करण्यास सांगितले, पाहा व्हिडीओ :

समाजमाध्यमावर पोलीस, दुचाकीस्वार आणि बसचालकाचे कौतूक

दरम्यान, पडलेले औषध परत मिळाल्यानंतर महिलेच्या चेहऱ्यावर वेगळेच समाधान होते. Anny Arun नावच्या युट्यूबरने हा व्हिडीओ त्याच्या चॅनेलवर अपलोड केलेला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले आहे. हा व्हिडीओ यूट्यूब आणि इतर समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच या व्हिडीओला अनेकांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या असून दुचाकीस्वार, पोलीस आणि बसचालकाची प्रशंसा केली जात आहे.

इतर बातम्या :

सेक्सदरम्यान शेजाऱ्यांच्या आवाजानं महिला त्रस्त; चिठ्ठी लिहून दिला सल्ला अन् मिळालं मजेशीर उत्तर

Video | सोन्याची ‘अशी’ तस्करी कधी पाहिलीये का?, सोशल मीडियावर भन्नाट प्रतिक्रिया

VIDEO | चालत्या रेल्वेत चढत होता माणूस, पुढे जे झालं ते अतिशय हादरवणारं, पाहा व्हिडीओ

(Tamilnadu police stopped bike and asked biker to give the medicine of women who had dropped it on road)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली