VIDEO : फॉर्मल्सवर वायूवेगाने दोरीउड्या, फिटनेस फ्रीक गिरीशभाऊ कार्यकर्त्याच्या जीममध्ये

| Updated on: Sep 03, 2021 | 12:15 PM

Girish Mahajan | गिरीश महाजन यांचा व्यायाम करतानाचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जामनेरमध्ये गिरीश महाजन यांच्या कार्यकर्त्याने गीताई फिटनेस ही जीम सुरु केली आहे.

VIDEO :  फॉर्मल्सवर वायूवेगाने दोरीउड्या, फिटनेस फ्रीक गिरीशभाऊ कार्यकर्त्याच्या जीममध्ये
गिरीश महाजन
Follow us on

नाशिक: सातत्याने चर्चेत राहणाऱ्या महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची यादी करायची झाली तर गिरीश महाजन यांचा वरचा नंबर लागेल. विजयी मिरवणूक किंवा एखाद्या समारंभात कार्यकर्त्यांसोबत नाचणे असो किंवा स्वत:ची पिस्तुल घेऊन वनाधिकाऱ्यांसोबत बिबट्याच्या माग काढण्याच्या मोहीमेत सहभागी होणे असो, या ना त्या कारणामुळे गिरीश महाजन राजकारणापलीकडेही चर्चेत असतात. आतादेखील ते अशाच एका कारणामुळे प्रकाशझोतात आले आहेत. (BJP leader Girish Mahajan Video goes viral on Social Media)

गिरीश महाजन यांचा व्यायाम करतानाचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जामनेरमध्ये गिरीश महाजन यांच्या कार्यकर्त्याने गीताई फिटनेस ही जीम सुरु केली आहे. हे फिटनेस सेंटर पाहण्यासाठी गिरीश महाजन याठिकाणी आले होते. त्यावेळी जीममधील साहित्य पाहून गिरीश महाजन यांना व्यायाम करायचा मोह आवरला नाही. मग गिरीश महाजन यांनी थोडाही वेळ न दडवता दोरीवरच्या उड्या मारायला सुरुवात केली.

विशेष म्हणजे यावेळी गिरीश महाजन नेहमीप्रमाणे शर्ट-पँट अशा फॉर्मल अटायरमध्ये आले होते. तरीही गिरीश महाजन अत्यंत सफाईने दोरीवरच्या उड्या मारताना दिसत होते. ते एकदाही अडखळताना किंवा चाचपडताना दिसले नाहीत. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गिरीश महाजन हे एरवीदेखील फिटनेस फ्रिक म्हणून ओळखले जातात. प्रत्येकाने आरोग्य चांगले ठेवण्यासाठी रोज व्यायाम केलाच पाहिजे, असा संदेश यावेळी गिरीश महाजन यांनी दिला.

जामनेरमध्ये गिरीशभाऊंचा दांडगा जनसंपर्क

गिरीश महाजन हे जामनेरमध्ये प्रसिद्ध होण्यामागे आणखी एक कारण आहे. ते म्हणजे त्यांचा जनसंपर्क. कुणाचा अपघात झाला असेल तर धावून जाणे, कुणाच मृत्यू झाला असेल तर आधी त्या ठिकाणी पोहोचणे, जामनेरमध्ये मोटारसायकलवरून फिरणे असो, चहाच्या टपरीवर चहा घेता घेता लोकांशी गप्पा मारणे, कट्ट्यावर बसून तरुणांशी गप्पा मारणे, जयंती, धार्मिक उत्सवाच्या कार्यक्रमात सहभागी होणे, तरुणांबरोबर सार्वजनिक कार्यक्रमात ठेका धरणे आदी कारणांमुळे ते जामनेरमध्ये अधिक प्रसिद्ध आहेत.

संबंधित बातम्या:

VIDEO | गिरीश महाजन पुन्हा ‘संकटमोचक’, जळगावात सापाला पकडून जीवदान, थरार कॅमेरात कैद