Login उशीरा केलं म्हणून सरांना पाठवलं ‘गोपी बहू’चं मीम, बॉसच्या प्रत्युत्तरावर नेटीझन्स फिदा

ऑफीसचे काम करण्यासाठी उशीर झाल्याने एका एम्प्लॉयीने त्याच्या बॉसला गोपी बहूचे मीम पाठवले. मात्र त्याच्या बॉसने जे भन्नाट उत्तर दिले ते वाचून सर्वजण अवाक् झाले.

Login उशीरा केलं म्हणून सरांना पाठवलं गोपी बहूचं मीम, बॉसच्या प्रत्युत्तरावर नेटीझन्स फिदा
Image Credit source: social media
| Updated on: May 26, 2023 | 1:12 PM

सकाळी उशीरा उठणाऱ्या लोकांना ऑफीसला वेळेवर पोहोचण्यासाठी किती धावपळ करावी लागते हे माहीत असलेच. बऱ्याच जणांसाठी ते कठीण असते. काहीजण बऱ्याच वेळेस ५-१० मिनिटे उशीरा पंच (late punch) करतात आणि त्याचं कारण म्हणजे आळस. उशीर झाल्यामुळे तुम्हीही कधी सुपर इनोव्हेटिव्ह कारण दिले आहे का? ट्रॅफिकमध्ये अडकणे किंवा कॅब चालक वेळेवर न येणे, अशा कारणांमुळे आता फारसा फरक पडत नाही. त्यामुळे बरेच जण डोकं चालवत विविध कल्पनांचा विचार करत असतात.

अशाच एका इसमाचे ट्विट सध्या व्हायरल होत आहे. उज्ज्वल अथर्व नावाच्या एका ट्विटर युजरने एक पोस्ट शेअर केली आहे. बॉसशी झालेल्या संभाषणाचा एक भाग त्यात आहे. कामाला उशीर झाल्यामुळे त्याने काय कारण दिले, हे त्याने शेअर केले. या पोस्टमध्ये दिसते की त्याच्या बॉसने त्याला उशीरा लॉगइन का केले याचे कारण विचारले. तेव्हा त्याने लोकप्रिय मालिकेतील गोपी बहूचे मीम (Gopi Bahu meme)शेअर करत उत्तर दिले, ज्यामध्ये ती लॅपटॉप धुताना दिसत आहे. हे मीम साथ निभाना साथिया या टीव्ही मालिकेतील असून मध्यंतरी ते खूप लोकप्रिय झाले होते.

त्याच्या या उत्तरावर बॉसनेही भन्नाट प्रत्युत्तर दिले. ‘ तुझ्या हाईकच्या (पगारवाढ) स्वप्नांवर मीदेखील असेच पाणी फिरवीन ‘ असा मजेशीर रिप्लाय बॉएसने दिला.

 

आता, हे संभाषण खरे आहे की नाही याबद्दल काही पुष्टी झालेली नाही, कारण एवढा कूल बॉस शोधणे कठीण आहे. पण ते खूप मनोरंजक आहे हे नक्कीच.

ही पोस्ट 22 मे रोजी शेअर करण्यात आली होती आणि 32.2K पेक्षा जास्त व्ह्यूज, 104 रिट्विट्स, 1,213 लाईक्स मिळाले आहेत. लोकांना ही पोस्ट खूप आनंदी वाटली. उज्वलचा बॉस कसा मस्त होता यावर अनेकांनी कमेंट केल्या.

“खूप मजेदार बॉस,” अशी कमेंट एका ट्विटर युजरने केली तर दुसऱ्यानेही त्याला दुजोरा देत तुमचा बॉस खूप मजेदार आहे,अशीच कमेंट केली. तर काही लोकांनी यावर हसण्याच्या इमोजींची कमेंट केली आहे.