फ्लॉवर नाही, फायर निघाली वधू ! लग्नाच्या स्टेजवर मुलाला जमीनीवर आपटले, वर पाहातच राहिला..!

लग्नाच्या स्टेजवर वधू आणि वराच्या डोक्यावर अक्षता पडण्यापूर्वी वधूने आपले कला कौशल्य दाखवल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात आत्मसंरक्षणाचे धडे देत वधू यावेळी तिच्यासमोरील एका मुलाला धाडकन जमीनीवर पायात पाय टाकून आपटताना दिसत आहे.

फ्लॉवर नाही, फायर निघाली वधू ! लग्नाच्या स्टेजवर मुलाला जमीनीवर आपटले, वर पाहातच राहिला..!
| Updated on: Sep 23, 2025 | 8:54 PM

आजकाल लग्नात रिल्स बनवण्याचा प्रघात आहे. या रिल्समुळे अनेकदा वधू आणि वराच्या लग्नसोहळ्यातील गमतीजमती तुफान व्हायरल होत असतात. लोक काही तरी चमत्कारीक वागून रिल्समधून प्रसिद्धीला येत असतात. कधी वराचे मित्र निळा ड्रमचा आहेर घेऊन येतात.तर कधी वधू किंवा वराला हार घालताना दोघांकडून काही खोड्या काढल्या जातात. तर कधी करवल्या भाव खाऊन जातात. अशाच एका लग्नातील व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात रिल्सच्या नावाखाली वधू आपले ज्युडो कराटेचे प्रात्यक्षिक दाखवताना दिसत असून एका फटक्यात ती एका मुलाला चारीमुंड्या चित करताना दिसत आहे. या वरुन वधू फ्लॉवर नाही तर फायर आहे हे आपल्याला आणि वरालाही लक्षात येते.

इंस्टाग्राम अकाऊंट @cinematographer_mubu वर अलिकडे एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओ कुठला आहे या संदर्भात काही माहिती दिलेली नाही. परंतू व्हिडीओ पोस्ट करताना मल्याळी भाषेत कॅप्शन लिहिण्यात आल्या आहेत. त्यामुळे हा व्हिडीओ केरळातील असावा असे वाटते.

वधूने मुलाला आपटले

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की वधू स्टेजवर आहे. आणि तिचा कोणी मित्र किंवा भाऊ तिच्या समोर येतो आणि रिल्स बनवण्यासाठी तिला मस्करीत धक्का मारु लागतो. त्यानंतर वधू त्याला गुडघ्याने मारण्याचे नाटक करते आणि त्याच्या पायात आपला पाय अडकवून त्याला जमीनीवर पाडते. वधूच्या स्टेप्स पाहून समजते की ती ट्रेंड मार्शल आर्ट्सची खेळाडू आहे. या दरम्यान वर हाताची घडी घालून एका कोपऱ्यात हसताना दिसत आहे. स्टेजच्या खाली वधू आणि वराचे दोस्त मंडळी हा नजारा पाहून हसताना दिसत आहे.

येथे पाहा व्हिडीओ –

व्हिडीओ होत आहे व्हायरल

या व्हिडीओला २ कोटीहून अधिक लोकांनी पाहिले आहे. तर अनेक लोकांनी प्रतिक्रीया दिल्या आहेत. एकाने म्हटलेय की वधू सासरच्या मंडळींना सावध करत हिंट देत आहे. एकाने लिहीलंय की पुढचा टार्गेट पती असणार आहे. तर अन्य एका युजरने लिहिलेय की सासरच्या मंडळींना सावध राहाण्याची गरज आहे. एका युजरने प्रतिक्रीया लिहीली आहे की पतीच्या डोक्यात या क्षणी अखेर काय विचार सुरु असतील. एका युजरने लिहिलेय की वराला अधिकच सावधान राहण्याची गरज आहे. एकाने लिहीलंय वधून सर्वांना समजण्यासाठी असे केलेय.एकाने लिहिलंय की वराच्या चेहऱ्यावर भीतीचे सावट दिसत आहे.