आकाशात दिसले जळते गोळे, कोणा देशाच्या हल्ल्याची तयारी ? एक्सपर्ट्सने सांगितले कारण Video
राजधानी दिल्लीच्या आकाशातून काल रात्री चमकदार प्रकाशासह कोसळणारे गोळे पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे अनेकांना याचे गुढ वाटले. परंतू याबाबत तज्ज्ञांनी स्पष्टीकरण केले आहे.

दिल्ली, नोएडा आणि गुरुग्राम येथे काल रात्री आकाशात अनोखी घटना पाहायला मिळाली. अनेक लोकांना आकाशात जळते आणि चमकते गोळे उसळताना दिसले. यांचा प्रकाश इतका मोठा होता की अनेक लोक घाबरले. या घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ही घटना पाहून लोक हैराण झाले आहेत.
दिल्ली एनसीआरच्या आकाशात काल रात्री अचानक आकाशातून चमकते गोळे पडताना दिसल्याने घबराट पसरली आहे. या घटनेमुळे विविध तर्कवितर्क वर्तवले जात आहेत. या गोळ्याचा प्रकाश इतका तीव्र होता की लोकांना ते तुटलेल्या ताऱ्यांप्रमाणे भासले. या अनोख्या दृश्याला लोकांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्या चित्रबद्ध देखील केले आहे. ही चमकती वस्तू नेमकी काय असावी या विषयी तज्ज्ञांनी माहिती दिलेली आहे.
येथे पोस्ट पाहा –
Delhi Noida Gurgaon witnessed amazing show last night (saturday) around 1:20 AM This most probably was a Space Debris, not a meteor shower, comet or Starlink trail ☄️ pic.twitter.com/DmjKRp8DUm
— R2D2 ™ 🇮🇳 (@iR2D2i) September 20, 2025
तारे तुटताना दिसले ?
दिल्लीच्या आकाशातून दिसलेला हा प्रकार अनेकांना तुटलेले तारे किंवा उल्का वर्षावा सारखा वाटला. परंतू संशोधकांनी या दाव्यास नाकारले आहे. तारामंडळचे वरिष्ठ इंजिनिअर ओ.पी.गुप्ता यांनी सांगितले की आकाशात जो प्रकाश दिसला तो काही उल्का वर्षाव आणि अशनीचा नव्हता. ते सॅटलाईटचे तुटलेले भाग होते. जे पृथ्वीच्या वातावरणात शिरताना त्यांचे घर्षणाने ज्वलन झाले. अन्य तज्ज्ञांनी देखील या मताला दुजोरा दिलेला आहे.
सॅटेलाईट कोसळल्याने असे दिसले ?
अंतराळात अनेक जुने आणि निरुपयोगी सॅटेलाईट फिरत असतात. जे पृथ्वीचे प्रदक्षिणा मारत असतात. अनेकादा हे तुकडे त्यांच्या कक्षेतून दूर होऊन पृथ्वीच्या वातावरणात शिरतात. पृथ्वीच्या वातावरणात शिरताचे त्यांचे हवेशी प्रचंड घर्षण होते. (friction) त्यामुळे तापमान वाढल्याने ते पेटतात आणि मोठ्या प्रकाशासह पसरतात. त्यामुळे दिल्ली आणि त्याच्या आजूबाजूच्या शहरात हा अद्भूत नजारा पाहायला मिळाला.
