
या चित्रामुळे तुमचं नक्कीच डोकं दुखू शकतं. फोटोमध्ये एकूण दोन प्राणी आहेत, पण बहुतांश लोकांना फक्त हत्तीच दिसत आहे. जर तुमचे डोळे गरुडासारखे तीक्ष्ण असतील आणि तुम्ही गोष्टींकडे बारकाईने बघत असाल तर… या व्हायरल फोटोमध्ये तुम्ही दुसरा प्राणी शोधण्यात जास्त वेळ घालवणार नाही. पण आव्हान हे आहे की, या फोटोत जर तुम्हाला १० सेकंदात दुसरा प्राणी सापडला, तर आपण असे गृहीत धरू की तुमच्या नजरेपासून काहीही लपलेले नाही!
तुम्ही चित्राचा प्रत्येक कोपरा पाहिला आहे का? काहीच सापडले नाही. हे कोडं सोडवायचं असेल तर डोळ्यांचाच नव्हे, तर मेंदूचाही वापर करा.
हो, कोडं सोडवायचं असेल तर चित्राकडे फार काळजीपूर्वक पाहायला हवं. आपल्याला फोटोच्या प्रत्येक ठिकाणी पाहण्याची आवश्यकता आहे. जर तुम्हाला काही समजत नसेल तर हत्तीच्या सोंडेवर एक नजर टाका.
spot the other animal
कदाचित तुम्हाला काहीतरी सापडेल. काहीतरी अर्थ निघेल. आता आम्ही संपूर्ण चित्र स्पष्ट करणार नाही. तुम्ही हार मानली असेल तर तुमचं डिव्हाइस उलटं फिरवा, याचं उत्तर तुमच्यासमोर आहे.
चित्रात दुसरा प्राणी सापडला नसेल तर ताबडतोब तुमचा मोबाइल/लॅपटॉप उलटा फिरवा. चित्राकडे उलटे पाहताच तुम्हाला दुसऱ्या प्राण्याची प्रतिमा स्पष्ट दिसेल.
होय, दुसरा प्राणी एक सुंदर हंस आहे, जो त्याचे पंख अर्धवट पसरलेले दिसतात. खरे तर हत्तीचे कान हंसाचे पंख बनतात आणि सोंड त्याची चोच बनते.
हे चित्र मुळात जीपने त्याची जाहिरात म्हणून वापरले होते, जे प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय जाहिरात एजन्सी लिओ बर्नेटने तयार केले होते.