जिद्दीला सलाम! केमोथेरपीदरम्यान दिली मुलाखत, फोटो शेअर करत म्हणाला “मला नोकरी हवी, सहानुभूती नको!”

एका व्यक्तीचा हॉस्पिटलच्या बेडवर बसून मुलाखत देतानाचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. अर्श नंदन प्रसाद या व्यक्तीने आपल्या लिंकइनवर अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला. त्याला त्याने जे कॅप्शन दिलं आहे ते सकारात्मक आहे.

जिद्दीला सलाम! केमोथेरपीदरम्यान दिली मुलाखत, फोटो शेअर करत म्हणाला मला नोकरी हवी, सहानुभूती नको!
प्रेरणादायक कथा
| Updated on: Apr 28, 2022 | 11:26 AM

मुंबई : कॅन्सर (cancer) या आजाराची आजही जनमाणसात भिती आहे. हा आजार झाला की अनेकजण घाबरून जातात. पण काही लोक मात्र प्रचंड सकारात्मक असतात. एका कॅन्सर पेशंटने त्याच्या केमोथेरपीदरम्यान नोकरीसाठी मुलाखत दिल्याचं समोर आलं आहे. त्याच्या एका फोटोने अनेकांमध्ये सकारात्मकता पेरली आहे. लिंकइन या साईटवर #OpenToWork असं या कॅन्सरग्रस्त अर्श नंदन प्रसादने (Arsh Nadan Prasad) लिहिलं. या पुढचं त्याचं वाक्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतंय. त्याने पुढं लिहिलं की मला कॅन्सरमुळे नोकरी मिळवण्यात थोडी अडचण येत आहेत. पुढे त्याने म्हटलं की मला नोकरी हवी आहे, पण कुणाचीही सहानुभूतीची नको आहे. तर मला स्वत:ला सिद्ध करायचं आहे. त्याच्या या विधानामुळे तो सध्या चर्चेत आहे.

एका व्यक्तीचा हॉस्पिटलच्या बेडवर बसून मुलाखत देतानाचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. अर्श नंदन प्रसाद या व्यक्तीने आपल्या लिंकइनवर अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला. त्याला त्याने जे कॅप्शन दिलं आहे ते सकारात्मक आहे. अर्शने लिहिलंय की, “जेव्हा तुम्ही मुलाखतीत चांगली उत्तरं देता. स्वत: मधल्या क्षमता सांगता पण तरिही जर केवळ तुमच्या आयुष्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे निवडले जाता. त्यासाठी कंपनी तुमची निवड करते, हे मला मान्य नाही. मी कॅन्सरशी लढत आहे हे मुलाखत घेणाऱ्यांना समजताच त्यांच्या बोलण्यात बदल झालेला दिसला. मला तुमच्या सहानुभूतीची गरज नाही… मी स्वतःला सिद्ध करण्यासाठी ही मुलाखत देतो आहे. माझ्यात त्या क्षमता आहेत. म्हणून मी इथे आहे. त्याचसाठी माझी निवड करण्यात यावी.”

अर्शची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. लाखभर लोकांनी याला लाईक केलंय. तर साडे 3 हजारांहून अधिक लोकांनी यावर कमेंट केल्या आहेत. या सकारात्मकता सगळ्यांमध्ये येवो अश्या आशयाच्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत. एकाने म्हटलंय की, ‘हे फायटिंग स्पिरिट आहे. तुझ्या जिद्दीला सलाम!’ दुसर्‍याने लिहिलंय की, ‘मी प्रार्थना करत आहे की तुम्ही लवकर बरे व्हाल. मला तुमच्या जिद्दीचं कौतुक वाटतं’

अर्शची ही पोस्ट सध्या खूप व्हायरल होत आहे. ही पोस्टने अप्लाइड क्लाउड कॉम्प्युटिंगचे सीईओ निलेश सातपुते यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांनी अर्शला आपल्या कंपनीसोबत काम करण्याचा आवाहन केलं. त्याला नोकरीची ऑफर दिली. “अर्श, तुम्ही खरे योद्धा आहात. तुमच्यावर उपचारा सुरू आहेत. तोवर इंटरव्यूव देणं थांबवा. मी तुमची कागदपत्रं पाहिली आहेत. तुमच्यावरचे उपचार पूर्ण झाले की तुम्ही आमच्या कंपनीसोबत काम करू शकता, असं निलेश सातपुते म्हणाले आहेत.