
जगात चित्र विचित्र स्पर्धा होत असतात. काही स्पर्धा या रिस्की असतात. त्यात एखाद्याच्या प्राणावर देखील बेतू शकते. झुरळ म्हटले की अतिशय किळसवाणा किटक. परंतू या झुरळाला तेही जीवंत खायचे असेल तर तुमचे धाडस होईल काय ? अशीच एक स्पर्धात आयोजित करण्यात आली होती. त्यात जीवंत झुरळांना खायचे होते. जो जास्तीत जास्त जीवंत झुरळे खाईल तो विजेता ठरणार होता. परंतू या स्पर्धेत विपरित घडले….
ही जीवंत झुरळं खाण्याची अजिब स्पर्धा अमेरिकेत आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत जीवंत झुरळ खाण्यासाठी अनेक स्पर्धकांत चढाओढ दिसून आली. या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी फ्लोरिडा येथील वेस्ट पाम बिचवर राहणारे 32 वर्षीय एडवर्ड आर्कबोल्ड पोहचले होते. या स्पर्धेचे नाव “मिडनाईट मॅडनेस” ठेवण्यात आले होते. या स्पर्धेचे आयोजन डिअर फिल्ड बीच येथील Ben Siegel Reptile Store द्वारा एका प्रमोशनल इव्हेंटच्या रुपात केले होते. या स्पर्धेत जिंकणाऱ्यास एक जीवंत मादी पायथन अजगर भेट म्हणून दिला जाणार होता. एडवर्ड सुरुवातील जीवंत झुरळे पटापट खाऊ लागला होता. परंतू ही स्पर्धा त्याची अखेरची स्पर्धा ठरली.
एडवर्ड याची गर्लफ्रेंड नताशा प्रोफीट हिच्या मते त्याने आधी अशा प्रकारचे किडे -मकोडे खाण्याच्या स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेतही जिंकून हा अजगर तो त्याच्या एका मित्राला तो भेट देण्याचा मनोदय त्याने व्यक्त केला. फ्लोरिडा विद्यापीठाची एंटोमोलॉजीची स्टुडण्ट सारा बर्नार्ड देखील या स्पर्धेच्या वेळी हजर होती. तिने सांगितले की ही स्पर्धेचे अनेक राऊंड होते. प्रत्येक राऊंडमध्ये उमेदवारांना वेग-वेगळे किडे खायच होते.
अंतिम राऊंडमध्ये स्पर्धकांना ३ ते ४ इंच लांबीची जीवंत झुरळं खायची होती. ३० स्पर्धकांपैकी एडवर्ड यालाच गंभीर स्वरुपात अस्वस्थ वाटू लागली. स्पर्धा संपताच एडवर्ड उलटी करु लागला आणि अचानक तो कोसळला. आयोजकांनी डॉक्टरांच्या पथकाला बोलावले. परंतू तोपर्यंत उशीर झाला होता. तपासानंतर कळले की त्याच्या गळ्यात आणि श्वासनलिकेत झुरळाचे तुकडे अडकले होते. त्यामुळे त्याचा श्वास गुदमरला आणि त्याचा मृत्यू झाला. मिररच्या बातमीनुसार ही घटना साल २०१२ ची आहे. परंतू पुन्हा ती चर्चेत आली आहे.