चाचा, वास्त केने हुई है… जेनजीच्या भाषेने पोलिसांचं डोकंच गरागरा फिरलं; जे बोलतात त्याच्या… Video पाहा

दिल्लीच्या जंतरमंतरवरील जेनजी आंदोलनाने पोलिसांना हैराण केले आहे. तरुणाईच्या 'वास्त केने हुई है' सारख्या अनोख्या कोड लँग्वेजमुळे पोलिसांना संवादात अडचणी येत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पोलिसांची झालेली पंचाईत आणि जेनजीचा चिकटपणा स्पष्ट दिसतो.

चाचा, वास्त केने हुई है... जेनजीच्या भाषेने पोलिसांचं डोकंच गरागरा फिरलं; जे बोलतात त्याच्या... Video पाहा
Gen Z protest
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 23, 2026 | 8:47 PM

दिल्लीच्या जंतरमंतरवर गेल्या चार दिवसांपासून तरुणाईने ठाण मांडलं आहे. पोलिसांनी लाठ्या मारल्या, डोकी फोडली, रक्त सांडलं, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, पण जेनजी काही हटले नाहीत. मैदान सोडलं नाही. रात्रभर गाणं म्हणत जागर घालत आहेत. जेनजींच्या या चिकटपणामुळे पोलीसही वैतागले आहेत. विशेष म्हणजे त्याहीपेक्षा जेनजीच्या कोड लँगवेजने पोलिसांना नुसतं वेड लावायचं बाकी ठेवलं आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ होत आहे. या व्हिडिओतील जेनजीच्या भाषेने पोलीस अवाक् झालेले पाहायला मिळत आहेत. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल.

सोशल मीडियात दोन व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. एका व्हिडिओत जेनजीची भाषा ऐकायला मिळत आहे. दुसऱ्या व्हिडिओत एक तरून जेनजीच्या भाषेची गंमत आणि पोलिसांची झालेली पंचाईत सांगत आहे. हे दोन्ही व्हिडिओ अत्यंत खुमासदार आहेत. हे व्हिडिओ पाहिल्यावर पोट धरून हसल्याशिवाय राहणार नाही. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. या दोन्ही व्हिडिओवर कमेंटचा पाऊस पडत आहे. तसेच लोक पोलिसांची फिरकी घेतानाही दिसत आहे.

पहिल्या व्हिडिओत काय?

पहिल्या व्हिडिओत दोन पोलीस दिसत आहे. बॅकग्राऊंडला जेनजीचा आवाज ऐकायला येत आहे. हे दोन्ही पोलीस बिहारकडचे असल्याचं दिसत आहे. एक पोलीस मध्यमवयीन आहे. तर दुसरा वृद्ध आहे. यावेळी जेनजी पोलिसांना म्हणतो, चाचा वास्त केने हुई है? यावर पोलीस आवाक होऊन पाहतात. हा तरुण दोनदा म्हणतो, चाचा वास्त केने हुई है? त्यावर वृद्ध पोलीस म्हणतो, यह भाषा नही आती. त्यावर पुन्हा तरुण म्हणतो, आय कॅन गेट अप हुई हैं? पोलीस पुन्हा बघतच राहतात. त्यावर हा तरुण चाचा वास्तकुने हुई है? आय कॅन गेट अप हुई हैं? असं विचारत सुटतो. या नव्या भाषेने भांबावलेले पोलीस पुन्हा आवाक होतात. त्यांच्या चेहऱ्यावरची माशीही हलताना दिसत नाही. हा मुलगा परग्रहावरून आलाय की काय? असे भाव त्याच्या चेहऱ्यावर असतात. त्यावर पोलीस म्हणतो, समज में नही आर रहा है, सर समझ में नही आ रहा है. नो सर.

 

हाताचे इशारे आणि…

दुसऱ्या व्हिडिओत एक तरुण जेनजीच्या या भाषेची गंमत सांगताना दिसतोय. जंतरमंतरवरच्या आंदोलनात पोलीस कसे या भाषेने गोत्यात आले. ते दिसून येत आहे. जेन जीचं आंदोलन दिल्ली पोलिसांना कळना झालं आणि पोलिसांच्याही आकलना पलिकडे गेलंय. त्यांच्यात आणि जेनजीमध्ये वयाचा फरक आहे. जेनजी हाताने इशारे करून जात आहेत. पोलिसांना आणि नेत्यांनाही कळत नाही. त्यांना माहीत नाही जेनजी उलट्या खोपडीचे आहेत. वास्तकुने हुईया असं बोलत आहेत. पोलिसांना काहीच कळत नाही, असं हा तरुण सांगतो.

भाषा डिकोड व्हावी

पोलीस शांत व्हा म्हणतात तेव्हा तेव्हा जेनजी मोठमोठ्याने आवाज करतात. जेव्हा पोलीस शांत होतात तेव्हा ते शांत होतात. पोलीस जे बोलतात त्याच्या उलट हे जेनजी करत आहेत. त्यामुळेच हे आंदोलन वेगळ्या लेव्हलवर गेलं आहे. आधी जेनजीची भाषा डिकोड केली पाहिजे. या आंदोलनात आधी सोनम वांगचुकसाठी लोक आले होते. आता लाठी खाणाऱ्या जेनजीसाठी लोक येत आहेत, असंही या तरुणाने सांगितलं.

 

Follow Us