AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CJP Protest News Live : सोनम वांगचूक यांनी 26 दिवसांपासून सुरु असलेलं उपोषण सोडलं, जे पी नड्डा यांनी पाजला ज्यूस

| Updated on: Jul 24, 2026 | 6:30 AM
Share

CJP Delhi Protest News Live : राजधानी दिल्लीत सुरु असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनालाचा आज चौथा दिवस आहे. त्याचवेळी महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. रेड, यलो अलर्ट वेगवेगळ्या ठिकाणी देण्यात आले आहेत.

CJP Protest News Live : सोनम वांगचूक यांनी  26 दिवसांपासून सुरु असलेलं उपोषण सोडलं, जे पी नड्डा यांनी पाजला ज्यूस
cjp delhi protest live updatesImage Credit source: tv9 marathi

LIVE NEWS & UPDATES

  • 24 Jul 2026 06:30 AM (IST)

    सोनम वांगचूक यांनी 26 दिवसांपासून सुरु असलेलं उपोषण सोडलं, जे पी नड्डा यांनी पाजला ज्यूस

    मागच्या 26 दिवसांपासून सुरु असलेलं उपोषण अखेर सोनम वांगचूक यांनी सोडलं आहे. जेपी नड्डी यांनी त्यांना ज्यूस पाजला, त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलं

  • 23 Jul 2026 08:17 PM (IST)

    हक्क मागणाऱ्या विद्यार्थ्यांना मारलं जातंय, प्रियंका गांधी यांचा हल्लाबोल!

    आज आपण आपल्याच देशात आपल्या मुलांना मारत आहोत. जे जवान देशाचे संरक्षण करत आहेत, त्यांच्याच मुलांना मारले जात आहे. अधिकार मागणाऱ्या मुलांना मारलं जातंय, अशी घणाघाती टीका खासदार प्रियंका गांधी यांनी केली आहे.

  • 23 Jul 2026 08:08 PM (IST)

    राहुल गांधी, इंडिया आघाडीचे खासदार महात्मा गांधी यांच्या स्मृतीस्थळी

    राहुल गांधी तसेच इंडिया आघाडीचे खासदार हे महात्मा गांधी यांच्या स्मृतीस्थळी पोहोचले आहेत. खासदारांकडू महात्मा गांधी यांना अभिवादन केले जात आहे. यावेळी प्रियंका गांधी तसेच इतर खासदार उपस्थित आहेत.

  • 23 Jul 2026 07:52 PM (IST)

    राहुल गांधी, इंडिया आघाडीचे खासदार गांधी स्मृती भवनात दाखल, प्रचंड गर्दी!

    सध्या दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला काँग्रेस तसेच इंडिया आघाडीने पाठिंबा दिला आहे. नीट पेपर लीकमुळे जीव गमावलेल्या विद्यार्थ्यांप्रती भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही गांधी स्मृती भवनाकडे निघालो आहोत, असे राहुल गांधी यांनी सांगितले आहे. आता राहुल गांधी इंडिया आघाडीतील खासदारांसह गांधी स्मृती भवनात दाखल झाले आहेत.

  • 23 Jul 2026 07:33 PM (IST)

    इंडिया आघाडीचे खासदार गांधी स्मृती भवनाकडे रवाना

    इंडिया आघाडीचे खासदार आता बसमध्ये बसून गांधी स्मृती भवनाकडे रवाना झाले आहेत. नीट पेपरफुटीमुळे अनेक विद्यार्थ्यांनी आपला जीव गमावला आहे. या विद्यार्थ्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आम्ही गांधी भवनाकडे जात आहोत, असं राहुल गांधी म्हणाले आहेत.

  • 23 Jul 2026 07:00 PM (IST)

    राहुल गांधी लवकरच राजघाटावर जाणार

    लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे लवकरच राजघाटावर जाणार आहेत. एकीकडे त्यांच्या घराभोवती सुरक्षा व्यवस्था वाढवलेली आहे. दुसरीकडे जंतर- मंतरवरही गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

  • 23 Jul 2026 06:52 PM (IST)

    जंतर-मंतरवर पुन्हा गोंधळ, मोठा पोलीस बंदोबस्त; घडामोडी वाढल्या!

    जंतर मंतरवर पुन्हा एकदा गोंधळ झाला आहे. पोलिसांनी या भागात मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला आहे. त्यामुळे आता जंतर-मंतरवर पुन्हा एकदा तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

  • 23 Jul 2026 06:37 PM (IST)

    राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची बैठक सुरू, महत्त्वाचे नेते उपस्थित!

    लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत. सध्याच्या सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा होणार आहे.

  • 23 Jul 2026 06:25 PM (IST)

    सरकारकडून आम्हाला कोणतेही पत्र आलेले नाही: सीजेपी

    सीजेपी प्रवक्ते सौरभ दास म्हणाले, “केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की आपण कुठेही बोलू शकतो. त्यामुळे आम्ही आमचा प्रस्ताव ठेवला आहे. जंतर मंतर किंवा कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियासारख्या तटस्थ ठिकाणी या. आपण तिथे भेटू. आम्हाला सरकारकडून अद्याप कोणताही संदेश आलेला नाही. त्यांनी आमच्याशी थेट संपर्क साधून कुठे, केव्हा आणि चर्चा किती वेळ चालेल यावर चर्चा केली पाहिजे.”

  • 23 Jul 2026 06:00 PM (IST)

    दिल्लीतील लाठीचार्जविरोधात शिवसेना उबाठा आक्रमक, कल्याणमध्ये जोरदार घोषणाबाजी

    दिल्ली जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जविरोधात शिवसेना उबाठा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. कल्याणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या फोटोला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी करत चक्का जाम करण्यात आला. मंत्री प्रधान यांचा पुतळाही जाळण्यात आला. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी उबाठाचे जिल्हाप्रमुख अल्पेश भोईर, उपनेते विजय साळवी यांच्यासह पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं.

  • 23 Jul 2026 05:56 PM (IST)

    नवी मुबंईत वंचितकडून मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी

    नवी मुबंईत वंचितकडून मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.  दिल्ली येथील घटनेच्या निषेधार्थ नवी मुबंईतील तुर्भे याठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे जोरदार निदर्शनं करण्यात आली. यावेळी वंचितच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

  • 23 Jul 2026 05:52 PM (IST)

    अत्याचाराविरोधात आवाज उठवणं गरजेचं होतं- रिया अहीर

    मी साडे चार वाजता माझ्या मित्रांची वाट पाहात होते. मला लांबून नारे ऐकायला येत होते. आपल्याला स्वातंत्र्य मिळून खूप दिवस झालं. पण विद्यार्थ्यांसोबत होणाऱ्या अत्याचाराविरोधात आवाज उठवणं गरजेचं होतं, असं रिया अहिर म्हणाली.

  • 23 Jul 2026 04:57 PM (IST)

    CJP ची दिल्लीतून मोठी घोषणा, आता देशव्यापी आंदोलनाची हाक!

    BJP Protest New Announcement : सीजेपीने जंतर-मंतरवरून आता मोठी घोषणा केली आहे. सीजेपीतर्फे आता देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. देशभरात सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा मिळत असतानाच आता सीजेपीने ही नवी घोषणा केली आहे. त्यामुळे उद्याच्या आंदोलनाचे नियोजन नेमके कसे असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

  • 23 Jul 2026 04:54 PM (IST)

    मुलांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे – विजया रहाटकर

    राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी म्हटले की, ‘दिल्लीतील जंतर मंतर येथे मुलांचे आंदोलन सुरु आहे ही बाब अतिशय संवेदनशील आहे, मुलांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे हे माझं मत आहे. योगायोगाने संसदेचे अधिवेशन सुरु असल्याने त्यांना न्याय मिळेल असं मला वाटतं.’

  • 23 Jul 2026 04:41 PM (IST)

    मुंबई पालिकेत गोंधळ, विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना सभागृहात कोंडलं!

    मुंबईच्या महापालिकेत सत्ताधारी आणि विरोधक हे आमनेसामने आले आहेत. दोन्ही गटात मोठा वाद झाल्याचे पाहायला मिळाले. दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलात केलेल्या लाटीचार्जच्या निषेधार्थ विरोधकांनी घोषणाबाजी केली.

  • 23 Jul 2026 04:40 PM (IST)

    चर्चेच्या प्रस्तावाला आंदोलक विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद नाही – नड्डा

    केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी दिल्लीतील आंदोलनाबाबत म्हटले की, आम्ही विद्यार्थ्यांना माझ्या निवासस्थानी किंवा मंत्रालयात चर्चा करण्याचा प्रस्ताव दिला होता, मात्र त्यावर विद्यार्थ्यांकडून कोणतेही उत्तर आलेले नाही.

  • 23 Jul 2026 04:25 PM (IST)

    नागपूर : संविधान चौकातील आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

    नागपूर मधील संविधान चौकात दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आंदोलन सुरु आहे. अशात आज सायंकाळी या आंदोलकांना पोलिसांना ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर आली आहे.

  • 23 Jul 2026 04:15 PM (IST)

    CJP Protest : दिल्लीतील कनॉट प्लेस 6 वाजता बंद करण्याचे आदेश

    राजधानी दिल्लीत सीजेपीचे आंदोनल सुरू आहे. काल रात्री दिल्लीच्या विविध भागात तणावाचे वातावरण आहे, अशातच आता दिल्लीतील कनॉट प्लेस या भागातील दुकाने 6.30 वाजता बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

  • 23 Jul 2026 03:58 PM (IST)

    पालघर जिल्ह्यातील तानसा नदीला पूर, गावांना सतर्कतेचा इशारा

    पालघर जिल्ह्यातील तानसा नदीला पूर आला असून, आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदीचे पात्र तुडुंब भरून वाहत आसून, आजूबाजूचा पूर्ण परिसर पाण्याखाली गेला आहे. तानसा नदीचा खाणीवाडे बंदरा, पांढरतारा पूल पाण्याखाली गेला आहे

  • 23 Jul 2026 03:52 PM (IST)

    काँग्रेसच्या खासदारांची संध्याकाळी 6 वाजता बैठक

    काँग्रेसच्या खासदारांची संध्याकाळी सहा वाजता बैठक होणार आहे. सध्या दिल्लीमध्ये सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व आले आहे.

  • 23 Jul 2026 03:51 PM (IST)

    काँग्रेसच्या खासदारांची संध्याकाळी सहा वाजता बैठक होणार

    काँग्रेसच्या खासदारांची संध्याकाळी सहा वाजता बैठक होणार आहे. सध्या दिल्लीमध्ये सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व आले आहे.

  • 23 Jul 2026 03:30 PM (IST)

    तळोजा येथे सहाय्यक अभियंता 50 हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

    नवी मुंबई अँटी करप्शन ब्युरोचे पोलिस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी सापळा कारवाई करण्यात आली. या कारवाईत एमएसडीसीएल, तळोजा येथील सहाय्यक अभियंता रोहित मोरे याला पी.एन. इलेक्ट्रिकल कंपनीच्या कामाचा फिजिबिलिटी रिपोर्ट देण्यासाठी 50 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर त्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

  • 23 Jul 2026 03:20 PM (IST)

    राजीनाम्याने प्रश्न सुटणार नाही, विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर केसरकरांची प्रतिक्रिया

    पेपरफुटीच्या मुद्द्यावर चर्चा झाली पाहिजे, पेपर मधल्या काही लिंक करता येईल तर त्याच्यासाठी प्रयत्न केला जात आहे. एखाद्या राजीनाम्याने हा प्रश्न सुटणार नाही स्वतः पंतप्रधान महोदय यामध्ये लक्ष घालत आहेत.  फास्टट्रॅक कोर्टच्या निर्मितीचे त्या ठिकाणी घोषणा केलेली आहे. सर्वांनी एकत्र आले पाहिजे आणि विशेष विद्यार्थ्यांचे संघटना चर्चेमध्ये सहभागी होऊन एक चांगलं असा निर्णय सरकारकडून घेतला पाहिजे असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.

  • 23 Jul 2026 03:12 PM (IST)

    विद्यार्थ्यांवरील अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ पनवेलमध्ये आंदोलन

    दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, पनवेल यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, पनवेल येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, पनवेल यांनी केले असून पनवेल परिसरातील विविध महाविद्यालयांतील मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी या आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

  • 23 Jul 2026 03:00 PM (IST)

    जंतर-मंतर लाठीचार्जच्या निषेधार्थ कल्याणच्या टिटवाळा मोहनेत बंद! वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रस्त्यावर

    जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ कल्याणजवळील मोहने परिसरात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनानंतर कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. मोहने, आंबिवली आणि टिटवाळा परिसरातील अनेक व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी केली.

  • 23 Jul 2026 02:50 PM (IST)

    दिल्लीतील नीट परीक्षा गोंधळावर महाराष्ट्र भाजप बॅकफुटवर

    दिल्लीतील नीट परीक्षा वरून सुरू असलेल्या गोंधळावर महाराष्ट्रात विरोधक आक्रमक होत असताना धाराशिवमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिल्ली गोंधळावरून पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर चुप्पी साधत कार्यक्रमातून काढता पाय घेतला. लातूर येथील कार्यक्रमापूर्वी धाराशिव इथ कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी रविंद्र चव्हाण आले होते.

  • 23 Jul 2026 02:40 PM (IST)

    बांगलादेश, कर्नाटक, आणि मुबंई या ठिकाणच्या लोकांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आल्याचा ग्रामस्थांचा आरोप

    धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील कवठा ग्रामपंचायतीत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून 55 ते 60 बनावट विवाह नोंदणी प्रमाणपत्रे देण्यात आल्याचा गंभीर आरोप कवठा गावातील ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणातील लोकांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी गावातील प्राध्यापक सत्यशील सावंत यांनी यांनी अमरण उपोषण सुरू केले आहे.तसेच ग्रामपंचायतीचा आयडी कोड वापरून मजूर नसलेल्या व्यक्तींनाही मजूर प्रमाणपत्रे देण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळालेल्यांमध्ये बांगलादेश, कर्नाटक आणि मुंबईतील व्यक्तींचाही समावेश असल्याचा दावा करण्यात आला आहे.या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी प्रा. सत्यशील सावंत यांचे गेली तीन दिवसापासून आमरण उपोषण तिसऱ्या दिवशी सुरू असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी होत आहे.

  • 23 Jul 2026 02:30 PM (IST)

    दिल्ली विद्यार्थी लाठी हल्ला व शिक्षण मंत्री राजीनामासाठी काँग्रेसचे धरणे आंदोलन

    दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ सांगलीमध्ये काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आला आहे काँग्रेस भवन समोर माजी आमदार व जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत व शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले.जंतर-मंतरवरील नेट पेपर फुटी प्रकरणी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा आणि सोनम वांगचूक, राहुल गांधी आणि विद्यार्थी यांच्यावर करण्यात हल्ल्याच्या निषेध म्हणून आंदोलन करण्यात आले.यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा,अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा काँग्रेसकडून देण्यात आला आहे.

  • 23 Jul 2026 02:20 PM (IST)

    खड्डयामुळे वाहतूकधारकांना मोठा त्रास

    नवी मुबंईतील ठाणे बेलापूर हायवेवर खड्यांचं साम्राज्य पाहायला मिळत आहेत. अनके खड्डे ठाणे बेलापूर हायवेवर तुर्भे याठिकाणी पडले आहेत. या खड्डयामुळे वाहतूकधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतं आहे. आता तरी नवी मुबंईमहानगरपालिका हे खड्डे बुजवणार कां हे पाहणं महत्वाचे आहे.

  • 23 Jul 2026 02:10 PM (IST)

    चर्चेपासून दूर का पळता?- देवेंद्र फडणवीस

    हिंमत असेल तर राहुल गांधींनी संसदेत चर्चा करावी हे माझे आव्हान आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. राहुल गांधी चर्चेपासून का पळत आहेत, असा सवाल त्यांनी केला. पळपुटेपणा सोडा असे आवाहन त्यांनी केले. कर्नाटक, पंजाबमध्ये सुद्धा पेपर फुटले. काँग्रेस सरकारच्या काळात शैक्षणिक बजेट कमी होते असा आरोप फडणवीस यांनी केला.

  • 23 Jul 2026 02:00 PM (IST)

    लासलगावात नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ मोर्चा

    लासलगावात नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला. जंतर-मंतरवरील लाठीचार्जविरोधात आंदोलनकर्ते आक्रमक झाले. एसटी आगार ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. दोषींवर कठोर कारवाई व शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. लासलगाव पोलिसांना मागण्यांचे निवेदन सादर केले.

  • 23 Jul 2026 01:57 PM (IST)

    मनसेकडून मुंबईत ‘एक सही पाठिंब्याची’ मोहिम

    मनसेकडून मुंबईत ‘एक सही पाठिंब्याची’ मोहिम राबवली जात आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनसेची मोहिम सुरु आहे. आज संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये ही मोहिम राबवली जाणार आहे. नागरिकांनी मोहिमेमध्ये भाग घ्यावा असे आवाहन संदीप देशपांडे यांनी केले आहे.

  • 23 Jul 2026 01:53 PM (IST)

    पुण्यात वंचित बहुजन आघाडीकडून आंदोलन

    पुण्यात वंचित बहुजन आघाडीकडून आंदोलनाला सुरु आहे. भाजप आमदार सुनील कांबळेच्या कार्यलयाबाहेर आंदोलकांचा गोंधळ पाहायला मिळत आहे. शिवाजी रोड परिसरात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत

  • 23 Jul 2026 01:45 PM (IST)

    भुसावळ येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने राहुल गांधी यांच्या कथित वक्तव्याचा निषेध

    भुसावळ येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने राहुल गांधी यांच्या कथित वक्तव्याचा निषेध. राहुल गांधी यांचा पुतळा जाळला. पंतप्रधान यांच्या बाबत केलेल्या वक्तव्याचा व पंतप्रधान यांच्या यांच्या निवासस्थानी केलेल्या आंदोलनाचा हा निषेध नोंदवण्यात आला. राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांचा वापर करून देशातील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला.

  • 23 Jul 2026 01:40 PM (IST)

    उपमहापौर विलास शिंदे यांनी महापालिकेच्या कंट्रोल रूम मधून घेतला शहरातील परिस्थितीचा आढावा

    उपमहापौर विलास शिंदे यांनी महापालिकेच्या कंट्रोल रूम मधून घेतला शहरातील परिस्थितीचा आढावा.  शहरातील अनेक भागात पाणी साचल्याच्या तक्रारी. पाऊस कायम राहिल्यास गंगापूर धरणातून आणखी पाण्याचा विसर्ग होणार. नागरिकांनी सतर्क राहण्याचे महापालिका प्रशासनाचे आवाहन

  • 23 Jul 2026 01:35 PM (IST)

    दिल्ली विद्यार्थी लाठी हल्ला व शिक्षण मंत्री राजीनामासाठी काँग्रेसचे धरणे आंदोलन

    दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ सांगलीमध्ये काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आला आहे काँग्रेस भवन समोर माजी आमदार व जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत व शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले.जंतर-मंतरवरील नेट पेपर फुटी प्रकरणी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा आणि सोनम वांगचूक, राहुल गांधी आणि विद्यार्थी यांच्यावर करण्यात हल्ल्याच्या निषेध म्हणून आंदोलन करण्यात आले.यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा,अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा काँग्रेसकडून देण्यात आला आहे. या निषेध आदोलना बाबत कॉग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत आणि राजेश नाईक – शहर जिल्हाध्यक्ष, काँग्रेस याच्याशी बातचीत केली आहे आमचे सांगली जिल्हा प्रतिनिधी शंकर देवकुळे

  • 23 Jul 2026 01:27 PM (IST)

    वंचितचे प्रदेश अध्यक्ष चेतन अहिरे विक्रोळी पोलिसांच्या ताब्यात

    वंचितकडून भिंगार बंदची हाक, बंदला उत्स्फूर्त पाठिंबा. येरमळा- कळंब रोडवर वंचितचं चक्काजाम आंदोलन. वंचितच्या महाराष्ट्र बंदला डाव्या आघाडीचा पाठिंबा, वंचितचे प्रदेश अध्यक्ष चेतन अहिरे विक्रोळी पोलिसांच्या ताब्यात

  • 23 Jul 2026 01:18 PM (IST)

    सुजात आंबेडकरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं

    मुंबईत आंदोलनादरम्यान सुजात आंबेडकरांना ताब्यात घेतलं आहे. वंचितकडून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. वंचितकडून कार्यकर्ते ठिकठिकाणी दुकाने बंद करण्याची आव्हान करत होते. त्यामुळे सध्या आता सुजात आंबेडकरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर आंदोलकही पोलिसांच्या ताब्यात आहेत.

  • 23 Jul 2026 01:12 PM (IST)

    विद्यार्थ्यांना कारवाईची धमकी देणाऱ्या पोलिसाचं निलंबन

    एका पोलिस अधिकाऱ्यांची आंदोलक विद्यार्थ्यां धमकी देण्यात आली होती. तुझ्या बॅगेत ड्रग्स पावडर टाकेन आणि तुझ्यावर कारवाई करेन असं पोलिसाने आंदोलक विद्यार्थ्यांला म्हटले होते. याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्य प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर आता या पोलिसावर कारवाई करण्यात आली आहे. या पोलिसाला आता गृहविभागाचा दणका बसला आहे. या पोलिसाचे नाव पवन सांगळे असून त्याला आता निलंबित करण्यात आले आहे.

  • 23 Jul 2026 12:53 PM (IST)

    दुपारी चार वाजेपर्यंत एसटी बस सेवा बंद, नांदेड बंदच्या पार्श्वभूमीवर नांदेड आगाराचा निर्णय

    दिल्ली येथे झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. नांदेडमध्येही सकाळपासून कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. या बंददरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी एसटी बस सेवा बंद ठेवण्यात आली आहे. दुपारी चार वाजेपर्यंत एसटी बस सेवा बंद राहणार आहे.

  • 23 Jul 2026 12:45 PM (IST)

    भारतीय जनता पार्टी आहे की ब्रिटीश जनता पार्टी?- आदित्य ठाकरे

    “भारतीय जनता पार्टी आहे की ब्रिटीश जनता पार्टी? सिद्धिविनायक मंदिराच्या चौकातून देशाला संदेश दिला जाईल. 26 जुलै रोजी शिवाजी पार्क इथून तिरंगा रॅली निघणार आहे. या रॅलीत कुठल्याही पक्षाचे झेंडे नसतील,” असं आदित्य ठाकरे म्हणाले.

  • 23 Jul 2026 12:40 PM (IST)

    CJP आंदोलनाच्या समर्थनार्थ करमाळ्यात कडकडीत बंद

    सीजेपी आंदोलनाच्या समर्थनार्थ सोलापूरच्या करमाळयातील बाजारपेठेत कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. वंचितच्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत हा बंद पाळण्यात येत आहे. दिल्लीतल्या जंतर-मंतर मैदानावर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देत आणि NEET पेपरफुटी प्रकरणातील विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी आज करमाळा शहरात आणि तालुक्यात सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या जेऊर, केम भागात बंद पाळण्यात आला आहे.

  • 23 Jul 2026 12:32 PM (IST)

    दिल्लीसारखं इथं करण्याचा प्रयत्न केला तर आमची लोकं सोडणार नाहीत- राज ठाकरे

    26 जुलै रोजी मोर्चात असं कोणी घुसवण्याचा प्रयत्न केला तर फटकावून काढू. शांततेनं हा मोर्चा होईल. कोणताही गोंधळ नसेल. इथे दिल्लीत केल्यासारखं प्रयत्न झाला तर आमची लोकं सोडणार नाहीत, असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे. या मोर्चात फक्त तिरंगा असेल, कोणत्याच पक्षाचा झेंडा नसेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

  • 23 Jul 2026 12:25 PM (IST)

    आंदोलन घराघरात पोहोचलंय, सरकार आता बॅकफूटवर गेलंय- राज ठाकरे

    आंदोलन घराघरात पोहोचलंय. सरकार आता बॅकफूटवर गेलंय. प्रश्न सोडवायचा की चिघळवायचा हे सरकारने ठरवावं. आंदोलन अंगलट आलंय, हे सरकारच्या लक्षात आलंय. आंदोलन अंगलट आल्याने सरकारकडून सारवासारव सुरू आहे, अशा शब्दांत राज ठाकरेंनी सुनावलं आहे.

  • 23 Jul 2026 12:23 PM (IST)

    विद्यार्थ्यांना हे सरकार नकोसं झालंय- उद्धव ठाकरे

    ‘विद्यार्थ्यांना हे सरकार नकोसं झालं आहे. याच विद्यार्थ्यांनी सरकारला निवडून दिलं आहे. पंतप्रधानांनी ट्विट केलं. त्यांनी बोलायला हवं होतं. कमीपणा बाळगण्याची गरज नव्हती. आपलीच मुलं आहेत. चर्चा करायला हवी होती. पहिल्याच दिवशी या मुलांशी बोलायला हवं होतं. लोकांना राग व्यक्त करायचा आहे. इतक्या दिवसाचा राग उफाळून आला आहे. त्याला वाट मोकळी करून देण्याचं काम करत आहेत,” असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं आहे.

  • 23 Jul 2026 12:20 PM (IST)

    यांच्यामुळेच झुरळ सुरू झालं ना, जन्मदाते हेच ना, मग त्यांच्याकडे बघायला नको- राज ठाकरे

    “यांच्यामुळेच झुरळ सुरू झालं ना, जन्मदाते हेच ना, यांनी जन्म दिल्यानंतर त्यांच्याकडे बघायला नको. महाराष्ट्राचे पोलीस सहकार्य करत आहेत. माझ्याकडे व्हिडीओ आला. पोलीस आयुक्तांना पाठवतो. मुलं टॅक्सीने चालली होती. पोलीस म्हणतात ५० ग्रॅम पावडर टाकेन. हा पोलीस ड्रग्स सप्लायर आहे का? पोलिसांकडे पावडर मिळायला लागली का? हे काय चाललंय ते कळतंच नाही,” असा संताप राज ठाकरेंनी व्यक्त केला.

  • 23 Jul 2026 12:15 PM (IST)

    भाजपने पोलिसांच्या वेशात गुंड आणले- उद्धव ठाकरे

    “सिव्हिल ड्रेसमधील गुंडांच्या हातात पोलिसांच्या लाठ्या आल्या. पोलिसांची नावंही नाहीत. हे आंदोलन मोडायला पाकिस्तानमधून भाजपने गुंड आणले का?. हे गुंड निर्विकार पाहत आहेत, बेसुमार लाठीमार करत आहेत. ही गुंडागर्दी सुरू असताना कोणी गप्प बसू नये. राग व्यक्त करण्यासाठी आम्ही ताकद दाखवण्यासाठी मोर्चाचं आयोजन केलं आहे. सिद्धीविनायकाला सांगू की या सरकारला सुबुद्धी दे नाही तर या देशावर सरकारच्या नावाने आलेलं आरिष्ट दूर कर,” असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं.

  • 23 Jul 2026 12:12 PM (IST)

    न्यायालयाला कुत्रे, कबुतरे पाहण्यासाठी वेळ, पण कॉक्रोचसाठी वेळ नाही- उद्धव ठाकरे

    दिल्लीत मलासुद्धा काही मुली भेटल्या, त्या संतप्त होत्या. “आमचे कपडे फाडले, मारलं गेलं. लाठ्या काठ्यांना गंजलेले खिळे लावून मारले गेले, डोकी फोडली,” असं मुलींनी सांगितलं. काल एक मुलगी अस्वस्थ होती. अत्याचार वाढले आहेत. न्यायालयाला कुत्रे, कबुतरे पाहण्यासाठी वेळ आहे, पण कॉकरोचकडे पाहायला वेळ नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे.

  • 23 Jul 2026 12:10 PM (IST)

    गेल्या काही वर्षांमधला राग आता उफाळून आला- उद्धव ठाकरे

    गेल्या काही वर्षांमधला राग आता उफाळून आला आहे. सर्वोच्च न्यायालय विद्यार्थ्यांचं ऐकायला तयार नाही. न्यायालयाची अवस्था धृतराष्ट्रासारखी झाली आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे.

  • 23 Jul 2026 12:08 PM (IST)

    रविवारी 26 जुलै रोजी ठाकरे बंधूंचा मोर्चा

    26 जुलै रोजी आम्ही विद्यार्थ्यांना सोबत घेऊन मोर्चा काढणार आहोत. प्रत्येक घरातील पालकांना हे सर्व बघून खूप त्रास होतोय, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. येत्या रविवारी 26 जुलै रोजी ठाकरे बंधू मोर्चा काढणार आहेत.

  • 23 Jul 2026 12:06 PM (IST)

    कुणाचंच ऐकत नाहीत, हा माज कसला?- राज ठाकरे

    “शेतकऱ्यांचं आंदोलनही अशाच पद्धतीने मोडण्याचा प्रयत्न झाला होता. हा सत्तेचा उद्दामपणा कशासाठी? कुणाचंच ऐकत नाहीत, हा माज कसला? मुद्दा प्रधानांपर्यंत नाही तर पंतप्रधानांपर्यंत गेला आहे”, अशा शब्दांत राज ठाकरेंनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

  • 23 Jul 2026 12:03 PM (IST)

    पंतप्रधानांनी आज ट्विट केलं, पण त्याला काही अर्थच नाही- राज ठाकरे

    उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे संयुक्त पत्रकार परिषद घेत आहेत. यावेळी राज ठाकरे म्हणाले, “नीटचे पेपर तिसऱ्यांदा फुटले. विद्यार्थ्यांचं आंदोलन चिरडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पंतप्रधानांनी आज ट्विट केलं, पण त्याला काही अर्थच नाही. या आंदोलनाचे पडसाद देशभरात उमटत आहेत.”

  • 23 Jul 2026 11:50 AM (IST)

    दिल्लीतील इंटरनेट सेवा बंद , आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

    राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीत इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे

  • 23 Jul 2026 11:44 AM (IST)

    CJP च्या आंदोलनाच्या समर्थनार्थ सोलापूरच्या माढ्यातील बाजारपेठ कडकडीत बंद

    CJP च्या आंदोलनाच्या समर्थनार्थ सोलापूरच्या माढ्यातील बाजारपेठ कडकडीत बंद. वंचितच्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देण्यात येत आहे. माढ्यातील शाळाही बंद केल्या . पंतप्रधान मोदीच्या विरोधात घोषणाबाजी -धर्मेद्र प्रधानाच्या राजिनाम्याची मागणी करीत माढ्यात जोरदार निदर्शने करण्यात आली. तसेच या आंदोलनात शाळकरी विद्यार्थी सहभागी झालेत.

  • 23 Jul 2026 11:31 AM (IST)

    लोकसभा, राज्यसभेचं कामकाज 12 पर्यंत स्थगित

    लोकसभा, राज्यसभेचं कामकाज 12 पर्यंत स्थगित करण्यात आलं आहे. सरकार चर्चेसाठी तयार आहे, मात्र शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सर्व विरोधक आक्रमक आहेत.  संसद भवनासमोर सर्व खासदारांची घोषणाबाजी सुरू आहे.  मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

  • 23 Jul 2026 11:22 AM (IST)

    नाशिककरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली

    नाशिककरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. नाशिककरांना पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण 90.71 टक्के भरले.  गंगापूर धरणातून सध्या 7413 क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू असून ही नाशिककरांसाठी दिलासादायक बातमी  आहे

  • 23 Jul 2026 11:10 AM (IST)

    मुख्यमंत्र्यांच्या महापूजेची तयारी पूर्ण; यंदा व्हीआयपींची संख्या कमी

    आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या शासकीय महापूजेची सर्व तयारी मंदिर प्रशासनाने पूर्ण केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणाऱ्या या महापूजेदरम्यान यंदा पूजेला बसणाऱ्या व्हीआयपींची संख्या कमी करण्यात आली आहे. भाविकांना कोणताही त्रास होऊ नये आणि पूजा शिस्तबद्ध पार पडावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

  • 23 Jul 2026 11:04 AM (IST)

    पालिका मुख्यालयातील उपहारगृहावर एफडीएचा छापा, 50 हजारांचा दंड

    बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील उपहारगृहामध्ये सातत्याने अस्वच्छतेच्या तक्रारी समोर येत होत्या. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने उपहारगृहावर छापा टाकून सखोल पाहणी केली.  काही दिवसांपूर्वी या कॅन्टीनमधील ताकात माशी आणि कांदा भजीमध्ये प्लास्टिकचा धागा आढळल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या.  तर दुसरीकडे अस्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पालिकेकडूनही उपहारगृह चालकाला 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे

  • 23 Jul 2026 10:56 AM (IST)

    पालघर जिल्ह्यात जोरदार पावसाचा कहर

    पालघर जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे सूर्या वैतरणा नद्यांची धोक्याची पातळी ओलांडली आहे. गावांमध्ये पाणी भरायला सुरुवात झाली आहे. तर जव्हारमधील झाप रस्ता दोन दिवसांपासून बंद झाला आहे.

  • 23 Jul 2026 10:30 AM (IST)

    वंचितचा महाराष्ट्र बंद, मुंबई, पुणे नाशिक पावसाचे अपडेट्स जाणून घ्या

    वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंद पुकारला आहे. त्यांनी पुकारलेल्या बंदला महाराष्ट्रातील विविध भागात प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अनेकांनी दुकाने बंद केली आहेत. तर राज्यातील मुंबई, पुणे, नाशिकमध्ये जोरदार पाऊस कोसळत आहे.

  • 23 Jul 2026 10:23 AM (IST)

    महाराष्ट्रातील विविध भागात बंदला प्रतिसाद

    वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला विविध भागात प्रतिसाद मिळत आहे. राज्यासहित मुंबईत बंदचे पडसाद उमटू लागले आहेत. अनेकांनी त्यांच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे दिसत आहे.

  • 23 Jul 2026 10:09 AM (IST)

    कोल्हापुरात मुसळधार पाऊस, पंचगंगा नदीला पूर

    कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यात जुलै महिन्यात दुसऱ्यांदा पंचगंगा नदी पात्राबाहेर गेल्याचे दिसून आलंय. सध्या पंचगंगा नदीची पाणीपातळी 31 फूट 6 इंच इतकीवर पोहोचली आहे.

  • 23 Jul 2026 09:50 AM (IST)

    मुसळधार पावसाने इगतपुरी तालुक्यातील पिंपरी सदो येथील पूल गेला पाण्याखाली

    पुलावरून वाहू लागले मोठ्या प्रमाणात पाणी. भावली, बोर्ली, पिंपरी, जामुंडा, गवांडा, धामाडकीवाडी या गावांचा इगतपुरी शहराशी संपर्क तुटला. पावसाचा जोर ओसरत नाही तोवर पुलावरून प्रवास न करण्याचे प्रशासनाचे आवाहन

  • 23 Jul 2026 09:40 AM (IST)

    नालासोपारा पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील रस्ते जलमय

    वसई विरार शहरात मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नालासोपारा पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील रस्ते जलमय झाले आहेत. रेल्वे स्थानकात जाण्यासाठी पाण्यातून मार्ग काडत प्रवाशांना स्थानक गाठावे लागत आहे. शहरात पावसाचा जोर कायम राहिला तर शहरातील जनजीवन विस्कळीत होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

  • 23 Jul 2026 09:30 AM (IST)

    निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर धरणातून 25 हजार 925 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू

    गोदावरी नदीपात्रातून जायकवाडीच्या दिशेने सातव प्रकार गेटच्या माध्यमातून पूर पाण्याचा विसर्ग… चांदोरी, सायखेडा, शिंगवे, करंजगाव या गावांना पूर पाण्याचा फटका बसू नये यासाठी खबरदारीच्या उपाययोजना…पावसाचा जोर कायम; नांदूर मधमेश्वर धरणातील विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता…गोदावरी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा….

  • 23 Jul 2026 09:20 AM (IST)

    माझं मुख्यमंत्र्यांसोबत बोलणे झाले नाही- प्रकाश आंबेडकर

    माझं मुख्यमंत्र्यांसोबत बोलणे झाले नाही, असे मोठे विधान प्रकाश आंबेडकर यांनी केले. यादरम्यान त्यांनी काही गंभीर आरोपही केले.

  • 23 Jul 2026 09:13 AM (IST)

    वंचितच्या कार्यकर्त्यांना बंद शांतते पाळण्याचे आवाहन

    वंचितच्या कार्यकर्त्यांना बंद शांतते पाळण्याचे आवाहन प्रकाश आंबेडकर यांच्याकडून करण्यात आले. लोकांना लुटण्याचा अधिकार कोणालाही दिला नसल्याचे मोठे विधा प्रकाश आंबेडकर यांनी केले.

  • 23 Jul 2026 09:10 AM (IST)

    वंचित बहुजन आघाडीच्या साडेतीन हजार कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले- प्रकाश आंबेडकर

    आज राज्यात बहुजन आघाडीकडून आज राज्यात बंद जाहीर करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी गंभीर आरोप केले. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की, वंचित बहुजन आघाडीच्या साडेतीन हजार कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले.

  • 23 Jul 2026 08:51 AM (IST)

    अण्णा हजारे मौन आंदोलन करणार

    दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अण्णा हजारे मौन आंदोलन करणार. सकाळी 11 ते 1 या वेळेत वाडिया पार्क येथील गांधी स्मारकात आंदोलन करणार. विद्यार्थ्यांशी संवाद साधून प्रश्न सोडवावेत, अशी अण्णा हजारे यांची मागणी. लोकशाहीत दडपशाहीऐवजी संवादाचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन. आंदोलनस्थळाला प्रतिकात्मक स्वरूपात “नगरचे जंतर मंतर” नाव देणार.अण्णा हजारे यांच्या या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • 23 Jul 2026 08:35 AM (IST)

    दिल्ली पोलीस हाय अलर्टवर, धर्मेंद्र प्रधान यांच्या घराकडे जाणारे रस्ते बंद

    दिल्ली पोलीस हाय अलर्टवर असून धर्मेंद्र प्रधान यांच्या घराबाहेरचा सुरक्षा बंदोबस्त वाढवला आहे. त्यांच्या घराच्या दिशेने जाणारे रस्ते बंद केले आहेत.

  • 23 Jul 2026 08:29 AM (IST)

    नाशिकमध्ये पावसामुळे काय स्थिती

    रात्रीपासून पावसाची संततधार सुरू. नाशिकच्या रामकुंड परिसरात पाण्याची पातळी वाढली. रामकुंड परिसरात पूर सदृश्य परिस्थिती. दुतोंड्या मारुतीच्या कमरे पर्यंत आले पुराचे पाणी. गोदा घाट परिसरातील अनेक छोटी-मोठी मंदीरं पाण्याखाली. गोदाघाट परिसरातील टपऱ्या, दुकानं काढून घेण्याच्या सूचना.

  • 23 Jul 2026 08:20 AM (IST)

    वसई-विरार नालासोपाऱ्यात पावसाची संततधार

    वसई-विरार नालासोपाऱ्यात रात्र भर पावसाने आपली संततधार सुरूच ठेवली आहे. आज हवामान खात्याने पालघर जिल्ह्याला यलो अलर्ट दिला असल्याने वसई विरार सह जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी दिली आहे. सततच्या पावसामुळे काही सखल भागात साधारण पाणी साचले आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर कुठेही पाणी साचले नसल्याने वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू आहे. विरार चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकल सुरळीत सुरू आहेत. काही लोकल पाच ते दहा मिनिट उशीराने धावत आहेत. पूर्ण परिसरात आज दिवसभर पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 CJP Protest Live Updates : राजधानी दिल्लीत जंतर-मंतरवर सुरु असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. काल रात्री पोलीस आणि आंदोलकांमध्ये झडप झाली. यात काही पोलीस जखमी झाले. दुसरीकडे मुंबईत पावसाची संततधार सुरु आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. काही भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, यवतमाळ, अकोला, चंद्रपूर या जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. नाशिक घाटमाथा, रत्नागिरी, रायगड, पालघर आणि सातारा जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या सोसाट्याच्या वारासह मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालय तसेच अंगणवाड्यांना जिल्हा प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Published On - Jul 23,2026 8:09 AM

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच