Video Viral : खडींमध्ये हरवलेला इअरबड 5 मिनिटांत ChatGPT ने दिला शोधून ; AI ची कमाल पाहून नेटकरीही थक्क

उज्जैनच्या मंदिरात हरवलेली चप्पल शोधल्यानंतर, आता ChatGPT च्या माध्यमातून एका व्यक्तीने खडींमध्ये हरवलेला पांढरा इयरबड शोधून दिला आहे. अवघ्या ५ मिनिटांत मिळालेल्या या यशामुळे नेटकरी थक्क झाले असून, "आता घरातील चाव्या आणि टीव्हीचा रिमोट शोधायलाही एआयचाच वापर करावा लागेल," अशा भन्नाट प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.

Video Viral : खडींमध्ये हरवलेला इअरबड 5 मिनिटांत ChatGPT ने दिला शोधून ; AI ची कमाल पाहून नेटकरीही थक्क
chatgpt found earbud
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 27, 2026 | 3:17 PM

उज्जैन महाकालच्या मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या एका मुलाची हरवलेली चप्पल CHATGPT ने शोधून दाखवली होती, ही बातमी तुम्ही ऐकलीच असेलच, पण आता त्यात भर म्हणून याच CHATGPT ने आपल्या टेक्नोलॉजीचा वापर करून एक बारीकसा इअरबर्डही शोधून काढलाय.आहे की नाही नवलं! बांधकामाच्या इथे बारीक खड्यांमध्ये एक इअरबर्ड हरवला. तर या पठ्ठ्याने थेट त्याला शोधण्यासाठी CHATGPT ला कामाला लावले. शेवटी इअरबर्ड मिळाला, पण CHATGPT चा हा अवतार पाहून अनेक जण आश्चर्यचकित झाले आहे.

नेमकं झालं असं की, हा माणूस आपल्या मुलासोबत पार्कमध्ये गेला होता. तिथून परत येताना तो मुलाच्या मागे धावत होता. याच गडबडीत त्याच्या हुडीच्या खिशातून इयरबडची केस खाली पडली आणि त्यातून डाव्या कानाचा इयरबड बाहेर येऊन खडीमध्ये पडला. आता खडीमध्ये पडलेली छोटीशी पांढरी वस्तू शोधायची म्हणजे काही सोपं काम नाही. त्याने बराच वेळ शोधाशोध केली,पण इयरबड काही दिसेना. त्यात संध्याकाळ झाली असल्याने अंधारही होत जात होता. मग या पठ्ठ्याच्या डोक्यात एक आयडियाची कल्पना आली. त्याने खडी पसरलेल्या जागेचे फोटो काढले आणि CHATGPT ला पाठवले. यानंतर CHATGPT ने त्याला जवळून झूम करून फोटो पाठवण्यास सांगितले. तीन फोटो पाठवले आणि तिसऱ्या फोटोत लाल झुडुपाजवळ पडलेला पांढरा इयरबड शोधून दाखवला. एवधढंच नाही तर लाल गोलही करून दिले.

Loading...

या व्यक्तीने आपला अनुभव, CHATGPT ला दिलेल्या कमांड रेडिटवर शेअर केल्या आहेत.CHATGPT च्या माध्यमातून शोधताना त्याला 5 मिनिटांपेक्षा पण कमी वेळ लागला. पण हेच आधी जवळपास 10 मिनिटे शोधाशोध करत होता.

ChatGPT found my lost earbud
by
u/Just_a_fungi893 in
ChatGPT

नेटकऱ्यांनीही दिल्या भन्नाट प्रतिक्रिया

या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी मिश्किलपणे CHATGPT चे आभार मानले आहेत. एका युजरने म्हटलंय की आता घरात हरवलेल्या चाव्या, टिव्हिचा रिमोट आणि सॉक्स शोधण्यासाठी एआयची मदत घ्यावी लागणार बहुतेक असं म्हटलंय. दुसऱ्या  युजरने तर मिश्किलपणे म्हटलं की, “आता घरात हरवलेल्या चाव्या, टीव्हीचा रिमोट आणि मोजे शोधण्यासाठीसुद्धा एआयची मदत घ्यावी लागणार!” तर तिसऱ्याने म्हटलंय की ‘गुप्तहेरांच्या चित्रपटांमध्ये दिसणारे डिक्टेव्हिवसुद्धा एआयच्या नजरेसमोर फिके पडतील.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us