AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : कर्जवसुली करणाऱ्यांचा आता करेक्ट कार्यक्रम, शेतकऱ्यांसाठी शिंदेंचा सर्वात मोठा निर्णय; कोणी वसुली करायला आल्यास…

कोणीही कर्जाची वसुली करायला आला तर तत्काळ अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. कोणी कर्जाची वसुली करायला आले तर शेतकऱ्यांनी तुम्ही सरकारकडे जा, सरकारकडून पैसे घ्या, असे कर्जवसुली करणाऱ्यांना सांगायचे, असे शिंदे यांनी शेतकऱ्यांना सांगितले आहे.

Eknath Shinde : कर्जवसुली करणाऱ्यांचा आता करेक्ट कार्यक्रम, शेतकऱ्यांसाठी शिंदेंचा सर्वात मोठा निर्णय; कोणी वसुली करायला आल्यास...
maharashtra cabinet meeting decision todayImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 27, 2026 | 3:10 PM
Share

Cabinet Meeting Decision Today : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. शेतकऱ्यांना दिवाळीआधी 5000 रुपयांची अग्रीम मदत देण्यासाठी निधीला आज मंजुरी देण्यात आली. सोबतच दुष्काळावरही विशेष चर्चा झाली. ही बैठक संपल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी सरकार नेमकं काय करणार, तसेच कोणी कर्जाची वसुली करायला आले तर शेतकऱ्यांनी काय करावे, याबाबत सांगितले आहे.

बळीराजाला नुकसानभरपाई मिळणार आहे. शिक्षणामध्ये सवलत दिली जाईल. चारा, पाणी यासाठीही मदत केली जाईल. कर्जवसुली, कर्जाचे पुनर्गठन या सर्व बाबतीत शेतकऱ्यांना लाभ दिला जाईल. आम्ही शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, असे आम्ही सांगितले होते. सरकारने त्याची पूर्तता केली आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत साडे सात हजार कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिलीय. अग्रीम आणि तातडीची मदत म्हणून शेतकऱ्यांना 5000 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ताबडतोब पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे, अशी महत्त्वाची माहिती शिंदे यांनी यावेळी दिली.

तसेच,  फायनान्स, मायक्रो फायनान्स यांनी शेतकऱ्यांनी सक्तीची वसुली करू नये. सरकारचा तसा निर्णय आहे. जो कोणी सरकारचा निर्णय डावलेल त्यावर कठोर करावाई केली जाईल. नांदेडमध्ये जी घटना घडली त्या प्रकरणात कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोणीही जबरदस्ती कर्जाची वसुली करण्याचा प्रयत्न केला तर त्यावर कठोर कारवाई केली जाईल. तसा सरकारने ठामपणे निर्णय घेतला आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा झालीय. मुख्य सचिवांनाही तसे निर्देश देण्यात आले आहेत, असेही शिंदे यांनी सांगितले.

कोणीही कर्जाची वसुली करायला आला तर तत्काळ अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. कोणी कर्जाची वसुली करायला आले तर शेतकऱ्यांनी तुम्ही सरकारकडे जा, सरकारकडून पैसे घ्या, असे कर्जवसुली करणाऱ्यांना सांगायचे. शेतकऱ्याला जो नडेल त्याला सोडले जाणार नाही, असा गंभीर इशारा शिंदेंनी दिला. कर्जाची वसुली करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल. मदतीपासून कोणीही शेतकरी वंचित राहणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले. एकूण दीड कोटी शेतकऱ्यांना फायदा होईल. तातडीची मदत म्हणून 5000 रुपये देण्यात आले आहेत. दुष्काळाचे इतर फायदे शेतकऱ्यांना होणारच आहेत, असे यावेळी त्यांनी सांगितले.

Follow Us
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! 391 कोटींचा निधी मंजूर, ST महामंडळ...
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! 391 कोटींचा निधी मंजूर, एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची पहिल्यांदाच चौकशी, ठाणे...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची पहिल्यांदाच चौकशी, ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकासमोर...
एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनाआधीच राम पूर्णेकर ताब्यात....
Pradeep Purnekar Case : एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनाआधीच राम पूर्णेकर ताब्यात; ठाण्यात खळबळ
राज्यात दुष्काळ मात्र मंत्रालयात पाण्याची टाकी ओव्हरफ्लो! पाण्याच्या..
राज्यात दुष्काळ मात्र मंत्रालयात पाण्याची टाकी ओव्हरफ्लो! पाण्याच्या नासाडीचा व्हिडिओ व्हायरल
अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात; शिंदे गटातील
Breaking Updates : अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात; शिंदे गटातील किरण सरनाईक आघाडीवर
मराठवाडा पदवीधर मतमोजणीबाबत मोठी अपडेट; 1 लाख 91 हजार मतपत्रिका....
Marathwada MLC Election Result 2026 : मराठवाडा पदवीधर मतमोजणीबाबत मोठी अपडेट; 1 लाख 91 हजार मतपत्रिका, गठ्ठे तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात
राहुल गांधींना मोठा धक्का! गर्भवती पत्रकाराला धक्काबुक्की प्रकरणी...
राहुल गांधींना मोठा धक्का! गर्भवती पत्रकाराला धक्काबुक्की प्रकरणी कोर्टाची थेट कारवाई
84 टेबलवर 84 हजार मतांची मोजणी, भाजप-काँग्रेसमध्ये चुरस
Nagpur MLC Election Result : नागपूर पदवीधर मतमोजणी सुरू; 84 टेबलवर 84 हजार मतांची मोजणी, भाजप-काँग्रेसमध्ये चुरस
शिक्षक-पदवीधर मतदारसंघांमधील मतमोजणीवरून भाजप नेत्याचं मोठं विधान
MLC Election 2026 Result Updates : शिक्षक-पदवीधर मतदारसंघांमधील मतमोजणी प्रक्रियेवरून भाजप नेत्याचं मोठं विधान, थेट म्हणाले...
प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच... अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या.
Amravati MLC Election 2026 Result: प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच... अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणी प्रक्रियेत काय घडतंय?