Shraddha Kapoor : बॉक्स ऑफिस गाजवण्यासाठी श्रद्धा कपूर सज्ज ! ‘ईठा’चा ट्रेलर या दिवशी होणार रिलीज
श्रद्धा कपूरचा आगामी चित्रपट 'ईठा'ची सध्या बरीच चर्चा आहे. मेकर्सनी आज सोशल मीडियावर पोस्ट करून या चित्रपटाची ट्रेलरची रिलीज डेट कधी, याची घोषणा केली.

अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिच्या अपकमिंग ‘ईठा’ चित्रपटामुळे बरीच चर्चेत आहे. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकही खूपच उत्सुक आहेत. ‘स्त्री 2’ फिल्मला मिळालेल्या यशानंतर श्रद्धा कपूर पुन्हा एकदा बॉक्स ऑफीसवर धमाल करायला सज्ज आहे. याच चित्रपटाबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. मेकर्सनी आता ‘ईठा’ चित्रपटाची ट्रेलर डेटची घोषणा केली आहे. प्रेक्षक त्याची अतिशय उत्सुकतेने वाट बघत आहेत.
या दिवशी येणार ‘ईठा’चा ट्रेलर
श्रद्धा कपूरच्या ‘ईठा’ चित्रपटाबाबत मेकर्सनी मोठी अपडेट दिली आहे. निर्मात्यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये लोकांची मोठी गर्दी दिसत असून, सर्वजण ‘ईठा-ईठा’ असा जयघोष करताना ऐकू येत आहेत. त्यानंतर पार्श्वभूमीत एका महिलेचा आवाज ऐकू येतो. हा व्हिडीओ शेअर करत मेकर्सनी कॅप्शनमध्ये ‘या शुक्रवारी जलवा पाहायला मिळणार!’ असं लिहिलं आहे. तसेच, ‘ईठा’ चित्रपटाचा ट्रेलर याच शुक्रवारी प्रदर्शित होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. श्रद्धा कपूरनेही तिच्या वॉलवर एक पोस्ट केली असून त्यावर असंख्य लाइक्स आणि कमेंट्स आल्या आहेत.
सांगायचं झालं तर ‘ईठा’ हा चित्रपट प्रसिद्ध महाराष्ट्रीयन तमाशा आणि लावणी कलावंत विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित आहे. या बायोपिकमध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूर विठाबाई यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
View this post on Instagram
या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे. याआधी चित्रपटातील श्रद्धा कपूरचा फर्स्ट लूकही प्रदर्शित करण्यात आला होता. या लूकला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. ‘ईठा’चा टीझरही यापूर्वी प्रदर्शित झाला आहे. या टीझरमध्ये श्रद्धा कपूर गर्भवती विठाबाई नारायणगावकर यांच्या भूमिकेत मंचावर लावणी सादर करताना दिसली होती. त्यामुळे आता चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये श्रद्धाचा कोणता नवा अंदाज पाहायला मिळणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.
कधी रिलीज होणार चित्रपट ?
श्रद्धा कपूर व्यतिरिक्त या चित्रपटात रणदीप हुड्डा आणि मोहम्मद जीशान अय्यूब हे देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या आधी हा चित्रपट 28 ऑगस्ट 2026 ला थिएटरमध्ये रिलीज होणार होता, मात्र मेकर्सनी ही रिलीज डेट पुढे ढकली. तेव्हाच ‘टॉक्सिक’ चित्रपट थिएटरमध्ये येणार होता. दोघांचा क्लॅश टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं. आता हा चित्रपट वर्षाच्या शेवटच्या महिन्यात, 4 डिसेंबर रोजी मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे.
