GTA 6 Launch : बॉसही निघाला गेमप्रेमी! GTA 6 रिलीज होताच संपूर्ण ऑफिसला…

एखाद्या कंपनी व्हिडिओगेमप्रेमी आहे असं कधी तुम्ही ऐकलंय का? किंवा कर्मचाऱ्यांना गेम खेळण्यासाठी सुट्टी देणारी कंपनी तुम्हाला माहित आहे का? आहे अशी एक कंपनी या जगात, आपल्या भारतात आहे.

GTA 6 Launch : बॉसही निघाला गेमप्रेमी! GTA 6 रिलीज होताच संपूर्ण ऑफिसला...
GTA 6
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 19, 2026 | 6:50 PM

एखाद्या कंपनी व्हिडिओगेमप्रेमी आहे असं कधी तुम्ही ऐकलंय का? किंवा कर्मचाऱ्यांना गेम खेळण्यासाठी सुट्टी देणारी कंपनी तुम्हाला माहित आहे का? आहे अशी एक कंपनी या जगात, आपल्या भारतात आहे. चेन्नईने आपल्या गेमप्रेमी कर्मचाऱ्यांसाठी चक्क संपूर्ण ऑफिसला सुट्टी जाहीर केली आहे. निमित्त आहे जगभरात चर्चेत असलेल्या ‘ग्रँड थेफ्ट ऑटो 6’ म्हणजेच GTA 6 या व्हिडिओ गेमच्या रिलीजचं. तब्बल 13 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा गेम रिलीज होत असल्याने गेमप्रेमींचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. याच उत्साहात चेन्नईतील ‘Inde by ChairsCart’ या कंपनीने 19 नोव्हेंबर 2026 रोजी आपल्या कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला.

कर्मचारी, इंटर्न, आणि फ्रीलान्सर्सनाही सुट्टी

ही कंपनी चेन्नईमधील इंटरिअर डिझाइन क्षेत्रात काम करते. कंपनीचे CEO किशोर शनमुगम यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सुट्टीची घोषणा केली.विशेष म्हणजे ही सुट्टी केवळ नियमित कर्मचाऱ्यांपूरती मर्यादित नाही. कंपनीतील इंटर्न आणि फ्रिलान्सर्सनाही या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.

Loading...

 

 

कंपनीने पोस्टमध्ये सांगितले की, त्यांच्या टीममधील अनेक जण लहानपणापासून GTA या गेम मालिकेशी जोडलेले आहेत. GTA Vice City आणि GTA 5 खेळण्याच्या आठवणी, रात्री उशीरापर्यतं गेम खेळणे आणि वेगवेगळी मिशन्स पूर्ण करण्याचा अनुभव त्यांच्या टिमसाठी खास आहे. त्यामुळे इतक्या वर्षांच्या प्रतिक्षेनंतर GTA 6 रिलीज होत असताना तो दिवस नेहमीच्या कामाच्या दिवसासारखा घालवायचा नाही, असं कंपनीने म्हटलं आहे.

13 वर्षांनंतर नवीन गेमची प्रतीक्षा संपली

GTA ही जगातील लोकप्रिय ओपन – वर्ल्ड व्हिडिओ गेम मालिकांपैकी एक आहे. या गेममागे खेळाडूंना एका काल्पनिक शहरात फिरता येतं. मिशन्स पूर्ण करता येतात आणि स्वत:च्या पद्धतीने गेमचा अनुभव घेता येतो. या मालिकेतील GTA 5 सप्टेंबर 2013 रोजी रिलीज झाला होता. त्यानंतर पुढील मुख्य भागाची चाहत्यांना प्रतीक्षा होती. नवीन भाग 19 नोव्हेंबर 2026 रोजी रीलिज झाला.

एकीकडे GTA 6 च्या रिलीजची गेमप्रेमींमध्ये प्रचंड उत्सकता आहे. तर दुसरीकडे कंपन्याचे हे निर्णयही चर्चेचा विषय ठरत आहेत. कर्मचाऱ्यांच्या आवडीला महत्त्व देत कंपनीने दिलेली ही सुट्टी अनेक गेमप्रेमींनसाठी खास ठरली आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us