Video | कुत्रा निघाला बाजाराला, बास्केट घेऊन केली फळांची खरेदी, खास व्हिडीओ पाहाच

सध्या अशाच एका कुशाग्र कुत्र्याचा मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक कुत्रा चक्क बाजारात फळभाज्या खरेदी करत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.

Video | कुत्रा निघाला बाजाराला, बास्केट घेऊन केली फळांची खरेदी, खास व्हिडीओ पाहाच
DOG VIRAL VIDEO


मुंबई : सोशल मीडियावर प्राण्यांशी निगडित अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. प्राण्यांच्या वेगवेगळ्या करामती पाहून लोक खळखळून हसतात. याच कारणामुळे प्राणी आणि पक्ष्यांचे अनेक व्हिडीओ आवडीने पाहिले जातात. सध्या अशाच एका कुशाग्र कुत्र्याचा मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक कुत्रा चक्क बाजारात फळं खरेदी करत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. (clever dog purchasing fruits in market video went viral on social media)

कुत्रा बाजारात फळं खरेदी करायला गेला

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक कुत्रा दिसत आहे. हा कुत्रा लोकांची गजबज असलेल्या बाजारपेठेत तोंडात बास्केट पकडून दिलखुलासपणे फिरत आहे. सुरुवातीला हा कुत्रा फळाच्या दुकानाजवळ थांबल्याचे आपल्याला दिसतेय.

महिला कुत्र्याला पैसे परत करतेय

एवढेच नाही तर हा कुत्रा स्वत: चांगले फळं निवडून आपल्या बास्केटमध्ये टाकत आहे. त्याचे हे कौशल्य पाहून नेटकरी भारावले आहेत. फळं विकणारी महिला व्हिडीओतील कुत्र्याशी पैशांचा व्यवहारसुद्धा करत आहे. कुत्र्याने फळं खरेदी केल्यानंतर महिला त्याला पैसे परत करताना दिसत आहे. शेवटी कुत्रा त्याला हवे असलेले चांगले फळं घेऊन बास्केट तोंडामध्ये पकडून निघून घेला आहे. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आलाय.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडीओ कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, या व्हिडीओला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहे. काही लोकांनी हा व्हिडीओ पाहून मजेदार कमेंट्स केल्या आहेत. व्हिडीओतील कुत्र्याची हुशारी पाहून नेटकरी भारावले आहेत.

इतर बातम्या :

सिद्धार्थच्या निधनानंतर चाहत्यांवर शोककळा, #sidnazz हॅशटॅगखाली शहनाजसोबतचे व्हिडीओ व्हायरल

Video | सिद्धार्थचा जुना व्हिडीओ व्हायरल, म्हणतो “आयुष्य खूप मोठं आहे, पुन्हा भेटू”, चाहते भावूक

अबब! 2000 रुपयांचा वडापाव; सोन्याचा वर्ख, चीज स्टफिंग, सारा थाटच न्यारा

(clever dog purchasing fruits in market video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI