
उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तेथे एका मुलाला साप चावल्यानंतर तो बरा झाला. पण 8 तासांनंतर पुन्हा त्याच्या शरीरात विष पसरू लागले. यानंतर, त्याला पुन्हा व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवावं लागलं आणि इंजेक्शन्सने उपचार करावे लागले, त्यानंतरच त्यांचे प्राण वाचले. एम्सच्या डॉक्टरांचा हा केस रिपोर्ट इंडियन जर्नल ऑफ पेडियाट्रिक्समध्ये प्रकाशित झाला आहे.तज्ज्ञांच्या मते, ही एक दुर्मिळ घटना आहे ज्यामध्ये सापाच्या विषाचा परिणाम पुन्हा होतो.
खरंतर ही घटना नोव्हेंबर 2024 सालची आहे. त्यावेळी एका 7 वर्षाच्या निष्पाप मुलाला त्याच्या डाव्या पायाला को्ब्राने दंश केला होता, ते पाहून घरचे घाबरले.त्यांनी तातडीने त्याला एम्समध्ये नेले. मात्र तो मुलगा बेशुद्ध पडला होता. त्याचा श्वास जवळजवळ थांबला होता. त्या मुलाची प्रकृती गंभीर होत असल्याचे पाहून डॉक्टरांनी त्याला ताबडतोब व्हेंटिलेटरवर हलवले. त्यानंतर, त्याला ॲट्रोपिन आणि निओस्टिग्माइनसह अँटी-व्हेनमच्या 10 वॉयलचे इंजेक्शन देण्यात आले.
सुमारे 4 तासांनंतर, रक्तातील विषाचा प्रभाव कमी झाला आणि सुमारे 12 वाजता तो मुलगा बोलू लागला.
दुर्मिळ प्रकरणात वाचवले डॉक्टरांनी मुलाचे प्राण
मात्र 8 तासांनंतर, विष पुन्हा मुलाच्या शरीरात पसरू लागले. दोन तास बरे झाल्यानंतर, मुलाची तब्येत पुन्हा बिघडू लागली. त्यानंतर त्याला व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवावे लागले. उपचारानंतर, मुलाला वाचवता आले. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, दुसऱ्यांदा विषाचा परिणाम अधिक घातक होता.
जगातील काही मोजक्या घटनांपैकी ही एक घटना आहे जिथे एखाद्या मुलाला पुन्हा सर्पदंश झाला आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं. एम्समधील ही पहिलीच घटना होती. तीन दिवसांच्या उपचारानंतर, मुलगा पूर्णपणे बरा झाला, त्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला. कार्यकारी संचालकांनी मुलावरील यशस्वी उपचारांबद्दल डॉक्टरांचे अभिनंदन केले.