Cold Moon | सरत्या वर्षाचा शेवटचा ‘फूल मून’ पाहण्याच्या संधी, जाणून घ्या का म्हटले जाते ‘कोल्ड मून’

| Updated on: Dec 29, 2020 | 2:50 PM

सरत्या वर्षात चंद्राचे पूर्ण रूप अर्थात ‘फूल मून’ पाहण्याची शेवटची संधी 29 आणि 30 डिसेंबर रोजी मिळणार आहे.

Cold Moon | सरत्या वर्षाचा शेवटचा ‘फूल मून’ पाहण्याच्या संधी, जाणून घ्या का म्हटले जाते ‘कोल्ड मून’
Follow us on

मुंबई : सरत्या वर्षात चंद्राचे पूर्ण रूप अर्थात ‘फूल मून’ पाहण्याची शेवटची संधी 29 आणि 30 डिसेंबर रोजी मिळणार आहे. या खगोलशास्त्रीय घटनेवर संपूर्ण जगाची नजर आहे. मंगळवारची ही पौर्णिमा वर्षातील 13वी पौर्णिमा आहे. ज्या महिन्यात दोनवेळा चंद्राची पूर्णाकृती पाहायला मिळते, अर्थात दोन वेळा पैर्णिमा येते, त्यावेळेस चंद्राला ‘ब्लू मून’ म्हटले जाते (Cold Moon To Occur Today And Tomorrow).

प्राचीन काळी लोक निसर्गाच्या ऋतुंमध्ये होणाऱ्या बदलांविषयी माहिती मिळवण्यासाठी पौर्णिमा म्हणजेच पूर्ण चंद्राचा उपयोग करत असत. त्यामुळे त्यांनी प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेच्या चंद्राला एक वेगळे नाव दिले होते. या नावांनुसार डिसेंबरमध्ये येणाऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला ‘कोल्ड मून’ असे म्हणतात. उत्तर अमेरिकेत याला ‘लाँग नाईट्स मून’ देखील म्हटले जाते. तर, ख्रिसमसच्या दिवसानंतर दिसणाऱ्या या चंद्राला युरोपमध्ये ‘मून आफ्टर युल’ असे म्हणतात. कोल्ड मूनचे दुसरे नाव ‘वुल्फ मून’ असेही आहे. यावर्षी, गुरु आणि शनीच्या उत्तम संयोजनानंतर पूर्ण चंद्र अर्थात पौर्णिमेचा योग आला आहे.

वर्षाखेरचा पूर्ण चंद्र भारतात कधी दिसणार?

खगोलशास्त्रज्ञांच्या मते, 30 डिसेंबर 2020 रोजी आंतरराष्ट्रीय वेळेनुसार रात्री 3.39 वाजता ‘फूल मून’ दिसू शकेल. भारतात हे मनमोहक दृश्य 30 डिसेंबर रोजी, सकाळी नऊ वाजता पहायला मिळेल. हा ‘कोल्ड मून’ बुधवारी आशिया, पॅसिफिक, युरोप आणि आफ्रिकेत दिसणार आहे. दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका आणि कॅनडा सारख्या पश्चिम गोलार्धातील देशांमध्ये तो 29 डिसेंबरच्या रात्री दिसेल (Cold Moon To Occur Today And Tomorrow).

2020 वर्षातील शेवटची पौर्णिमा

भारतात पूर्ण चंद्र दिसण्याच्या दिवसाला पौर्णिमा म्हणून ओळखले जातो. मार्गशीर्षानुसार, शुक्ल पौर्णिमा 29 डिसेंबर रोजी 07:54 वाजता सुरू होणार आहे आणि 30 डिसेंबर रोजी 08:57 वाजता संपणार आहे.

2020 खगोलशास्त्रीय घटनांनी परिपूर्ण होते. पण, 2021 देखील असेच असणार आहे. येत्या नव्या वर्षात म्हणजे 2021मध्ये सूर्य, पृथ्वी आणि चंद्राच्या हालचालींद्वारे चंद्रग्रहण आणि संपूर्ण सूर्यग्रहणासह चंद्रग्रहणाची चार रोमांचक दृश्ये जगभरातील खगोलप्रेमींना पाहायला मिळणार आहेत. तथापि, यापैकी केवळ दोन खगोलीय घटना भारतात दिसू शकणार आहेत.

(Cold Moon To Occur Today And Tomorrow)

हेही वाचा :