Smriti Mandhana : रडून-रडून बिचारी.. स्मृती मानधनाची ती अवस्था पाहून चाहत्यांना धक्का
Smriti Mandhana Post After Postponed Wedding : स्मृती मानधना हिचं संगीतकार पलाश मुच्छलशी ठरलेलं लगन पुढे ढकलण्यात आल्यावर बरीच चर्चा झाली. या सगळ्या प्रकरणानंतर जवळपास 10-12 दिवसांनी स्मृती मानधना हिने एक पोस्ट टाकली होती. बघता बघता सोशल मीडियावरचा तिचा व्हिडीओ व्हायरलही झाला, पण त्यामधील तिचा चेहरा पाहून आणि आवाज ऐकून चाहते चांगलेच काळजीत पडले.

भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार, नामवंत खेळडू स्मृती मानधना (smriti mandhana) हिच्या वैयक्तित आयुष्याबददल बरीच चर्चाल सुरू आहे. 23 नोव्हेंबरला सांगलीत स्मृती आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचा विवाह होणार होता. मात्र त्या दिवशीच सकाळी त्यांचं लग्न पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. स्मृतीच्या वडिलांना हार्टअटॅक आला, त्यांची तब्येत बिघडली लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र त्यानंतर काही अशा बातम्या समोर आल्या की पलाशने (Palash Muchhal) स्मृतील फसवलं, तिला चीट केलं, त्यामुळे लग्न टाळण्यात आला, असाही दावा केला गेला. या सर्व प्रकरणाला जवळपास 10-12 दिवस उलटून गेल्यानंतर काल (5 डिसेंबर) स्मृती हिने सोशल मीडियावर पहिली पोस्ट केली. मात्र त्यामध्ये तिचा चेहरा पाहून आणि विशेषत: तिचा आवाज ऐकून तिच्या चाहत्यांना, वेल-विशर्सना मोठा धक्का बसला आहे.
खरंतर काल स्मृतीने इंस्टाग्रामवर तिच्या अकाऊंटवर एका टूथपेस्ट ब्रँडची जाहिरात शेअर केली. त्यामध्ये ती तिचा अनुभव सांगताना दिसत होती. “विजयी क्षण, प्रामाणिक संभाषणं आणि खेळ पूर्णपणे बदलणारे विधी.” असं या व्हिडिओसोबत स्मृतीने कॅप्शनमध्ये लिहिलं होतं. या जाहिरातीमध्ये स्मृतीचा चेहरा पाहून, तिचा आवाज ऐकून अनेक चाहत्यांनी असा दावा केला की ती प्रचंड रडल्यामुळेच तिचा आवाज असा जड झाला आहे.
View this post on Instagram
रडून-रडून बिचारीचा आवाजच बदलला
स्मृतीने बऱ्याच दिवसांनी पोस्ट केल्यामुळे चाहकत्यांना दिलासा मिळाला. पण त्यांचा आनंद फार काळ टिकला नाही. कारण त्या व्हिडीओमध्ये तिचा आवज प्रचंड बदललेला होता. त्या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. ‘तुझ्या आवाजाा काय झालं, तब्येत ठीक आहे ना? लवकर बरी हो’ असं एकाने लिहीलं. तर ‘तुझ्या आवाजाल नक्की काय झालं?’ असाच प्रश्न दुसऱ्यानेही विचारला. ‘रडून रडून बिचारीचा आवाजच बदलून गेलाय’ अशी कमेंट आणखी एका युजरने केली. ‘तुझ्या आवजातूनच सगळं काही समजतंय. तू ठीक आहे, अशी आशा करतो’ असं म्हणत आणखी एका चाहत्याने स्मृतीबद्दल वाटणारी चिंता व्यक्त केली.

एंगेजमेंट रिंग कुठे गेली ?
या व्हिडीओत बऱ्याच जणांनी आणखी एक गोष्ट नोटीस केली ती म्हणजे, स्मृतीच्या हातात तिची एंगेटमेंट रिंग, साखरपुड्याची अंगठीच नव्हती. अनेकांनी त्याबद्दल प्रश्न उपस्थित केले. एका चाहत्याने म्हटलं, ‘ती एवढी दुःखी का दिसतेय? ती हसत आहे, पण तिचा आवाज आणि तिचे डोळे दुःखी दिसत आहेत. तिने तिच्या साखरपुड्याची अंगठी का घातली नाहीये?’ असा सवालही त्याने उपस्थित केला. मात्र अनेक चाहते स्मृतीला खंबीर राहण्याचा सल्ला देतानाही दिसत असून तिला सपोर्ट करत आहेत.
