
एखाद्या देशाचं चलन किती कमजोर आहे, हे तिथल्या बँकेच्या नोटांवरून कळतं. ज्यांच्या नोटांचं मूल्य लाखांमध्ये असतं तिथलं चलन अत्यंत कमजोर असल्याचं स्पष्ट होतं. म्हणजेच तिथले लोक अधिक मूल्य असलेल्या नोटा सामान्य खर्चासाठीही वापरतात. जगातील अनेक देशांबरोबरच आशियातील अनेक देशातही अधिक मूल्य असलेल्या नोटा चलनात आहेत. या देशांचे चलन डॉलर किंवा भारताच्या रुपयाच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. त्यामुळेच स्थानिक लोक त्याला मोठी रक्कम मानत नाहीत. नेहमीच्या वापरातील नोटांसारखाच या नोटांचा वापर करतात. ज्या देशांमध्ये एक लाखाची नोट रोज वापरली जाते, म्हणजेच ज्या देशांमध्ये एक लाखाची नोट चलनात आहे, अशा देशांची माहिती जाणून घेऊया.
आर्मेनिया हा एक छोटासा देश आहे. पण या देशात जगातील सर्वात मोठी बँक नोट चलनात आहे. आर्मेनियात एक लाख ड्रमची (ड्रम म्हणजे चलन) नोट चलनात आहे. आर्मेनियाचे ड्रम अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत अत्यंत कमकुवत आहे. त्यामुळेच ड्रमची किंमत लाखोंमध्ये आहे. आर्मेनियाच्या एक लाखाच्या ड्रमच्या नोटवर तिथल्या सरकारचा फोटो छापलेला आहे.
इराणमध्येही एक लाख रियालची नोट चलनात आहे. इराणची ही नोट 2010मध्ये चलनात आली. यापूर्वी इराणमध्ये 50 हजाराची रियालची नोट चलनात होती. इराणमधील ही सर्वात मोठी नोट होती. आता एक लाख रियालची नोट या देशात व्यवहारात आली आहे. इराणच्या मुद्रेत एवढी मोठी संख्या असल्याने त्याचा दैनंदिन कामकाजावरही परिणाम होतोच. याशिवाय या देशात महागाई एवढी वाढलीय की रिलायची किमतही त्याच्या पुढे कमी झालीय.
इंडोनेशियात सर्वात मोठी नोट एक लाखाची आहे. इंडोनेशियाची मुद्राही अत्यंत कमजोर मानल्या जाते. भारतीय रुपयाच्या तुलनेत इंडोनेशियाची मुद्रा अत्यंत कमजोर आहे. त्यामुळेच तिथली सर्वात मोठी नोटही रोजच्या व्यवहाराचा एक भाग झाली आहे. इंडोनेशियातील या एक लाखाच्या नोटेवर इंडोनेशियाच्या पहिल्या राष्ट्रपतींचा फोटो छापलेला आहे.
व्हिएतनाममध्ये एक लाख डोंगची नोट आहे. 2004मध्ये ही नोट चलनात आली असून आजही चलनात आहे. ही हिरव्या रंगाची नोट पॉलिमरने बनलेली आहे. त्यामुळे व्हिएतनामची एक लाख डोंगची नोट लवकर खराब होत नाही. या नोटोवर व्हिएतनामच्या नेत्याचा फोटो आहे. नोटेच्या मागच्या बाजूला टेम्पल ऑफ लिटरेचर म्हणजे ज्ञानाचं मंदिर छापलेलं आहे.