Video : महाकाय मगरीचा रस्त्यावर मुक्त संचार, पाहता-पाहता गायब झाली, पाहा नेमकं काय घडलं?

अवघ्या काही सेकंदांचा हा व्हीडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे. मगरीचं हे असं अचानक गायब होणं, अनेकांना आश्चर्याचा धक्का देणारं आहे. हा व्हीडिओ helicopter_yatra_ या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.

Video : महाकाय मगरीचा रस्त्यावर मुक्त संचार, पाहता-पाहता गायब झाली, पाहा नेमकं काय घडलं?
| Edited By: | Updated on: May 23, 2022 | 11:21 AM

मुंबई : सध्या सोशल मीडियावर (social media) विविध व्हीडिओ व्हायरल होत आहेत. यात प्राण्यांचे व्हीडिओही पाहायला मिळतात. त्याला चांगली पसंतीही मिळताना दिसते. सध्या मगरीचा एक व्हीडिओ पाहायला मिळतोय. यात मगर रस्त्यावर निर्भीडपणे फिरताना दिसतेय. रस्त्यावर फिरत असताना अचानकपणे गायब होते. व्हायरल व्हीडीओमध्ये (viral video) एक मगर शिकार करण्यासाठी पाण्यातून बाहेर पडते. ती पाण्याचा प्रवाह सोडून थेट रस्त्यावर येते. कच्च्या रस्त्यावर गाडी उभी असल्याचं दिसतंय. भक्षाच्या शोधात मगर अचानक नदीतून बाहेर आली. पण तिला तिची शिकार सापडत नाही. मग ती पुन्हा पाण्यात निघून जाते.

व्हायरल व्हीडिओ

सध्या मगरीचा एक व्हीडिओ पाहायला मिळतोय. यात मगर रस्त्यावर निर्भीडपणे फिरताना दिसतेय. रस्त्यावर फिरत असताना अचानकपणे गायब होते. व्हायरल व्हीडीओमध्ये एक मगर शिकार करण्यासाठी पाण्यातून बाहेर पडते. ती पाण्याचा प्रवाह सोडून थेट रस्त्यावर येते. कच्च्या रस्त्यावर गाडी उभी असल्याचं दिसतंय. भक्षाच्या शोधात मगर अचानक नदीतून बाहेर आली. पण तिला तिची शिकार सापडत नाही. मग ती पुन्हा पाण्यात निघून जाते आणि ती दिसेनाशी होते.

अवघ्या काही सेकंदांचा हा व्हीडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे. मगरीचं हे असं अचानक गायब होणं, अनेकांना आश्चर्याचा धक्का देणारं आहे. हा व्हीडिओ helicopter_yatra_ या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. याला 30 लाखांहून अधिक लोकांनी पाहिलंय. तर 129k लाईक्स मिळाले आहेत.

सध्या सोशल मीडियावर आणखी एक व्हीडिओ व्हायरल होतोय. यात अॅनाकोंडा साप रस्ता ओलांडताना दिसतोय. हा अॅनाकोंडा इतका मोठा आहे की त्याला पाहून लोकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. या सापामुळे रस्त्यावरची वाहतूक ठप्प झाल्याचं दिसतंय. पण या सापाला याचं ताही सोयरं सुतक नाही. तो आरामात रस्ता ओलांडतोय. अॅनाकोंडा पाहण्यासाठी आणि त्याचा व्हीडिओ बनवण्यासाठी आपल्या कारमधून उतरल्याचं पाहायला मिळत आहे.