Video | मालकाने ‘ही’ गोष्ट केली नाही तर मांजर जेवतच नाही, पाहा सोशल मीडियावर व्हायरल झालेला क्युट व्हिडीओ

जर हा खूप गोड प्राणी आहे. सोशल मीडियावर मांजराचे खूप व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. काही व्हिडीओ इतके गोड असातात की लोक ते व्हिडीओ सतत पाहतात. सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Video | मालकाने 'ही' गोष्ट केली नाही तर मांजर जेवतच नाही, पाहा सोशल मीडियावर व्हायरल झालेला क्युट व्हिडीओ
cat

मुंबई : मांजर हा खूप गोड प्राणी आहे. सोशल मीडियावर मांजराचे खूप व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. काही व्हिडीओ इतके गोड असातात की लोक ते व्हिडीओ सतत पाहतात. सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मांजर तीच्या कृतीमुळे सर्वाचेच मन जिंकत आहे. तुम्ही हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला ही या मांजरीची कृती नक्की आवडेल.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर ही क्लिप व्हायरल होताना दिसत आहे. Uchigram.tokyo नावाच्या यूजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. इंस्टाग्रामवरील पेज 9Gag वर शेअर केल्यावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ शेअर करत यूजरने ”जो पर्यत तुम्ही तीच्या हातात जेवण ठेवत नाही, तो पर्यत ती जेवत नाहीच” असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वांना खूप आवडत आहे. अनेकांनी या व्हिडीओवर भरभरुन प्रतिसाद देत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by 9GAG: Go Fun The World (@9gag)

नक्की काय आहे व्हिडीओमध्ये ?

तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता की एक मांजर त्याच्या मालकाजवळ बसली आहे आणि तिचा मालक तिला वाटीमध्ये असलेले अन्न खाण्यास सांगतो, पण ती मांजर मागे हटते. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो ती मांजर खूप भुकेली आहे पण तिला नेहमी खाल्ल्याप्रमाणे तिचे अन्न खायचे आहे. व्हिडिओच्या शेवटी आपण पाहू शकतो की मांजरीचा मालक हातात अन्न ठेवतो आणि मग मांजर आनंदी होते आणि अन्न खातो.

1 मिलीयनपेक्षा अधिक वेळा पाहीला गेला हा व्हिडिओ

हा व्हिडिओ सुमारे 11 तासांपूर्वी शेअर करण्यात आला आहे. पोस्ट शेअर केल्यापासून, ती 1 मिलीयनपेक्षा अधिक वेळा पाहिली गेली आहे आणि संख्या वेगाने वाढत आहे. लोकांनी व्हिडिओबद्दल आपल्या प्रतिक्रिया देखील शेअर केल्या आहेत. एका यूजरने लिहिले आहे की , ‘सर्वात सुंदर गोष्ट,’ तर यूजरने लिहिले आहे की, ‘हे आश्चर्यकारक आहे … माझी मांजर माझ्याबरोबर काहीही करू इच्छित नाही’ याशिवाय, अनेक लोकांना मांजर आणि इतर हॅपी इमोजी शेअर केले आहेत.

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI