
Viral Video: गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर गौतमी पाटीलच्या डान्सची जोरदार चर्चा सुरु आहे. तिच्या डान्सचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून गौतमी पाटील तिच्या हटके डान्स आणि तिच्या हटके स्टेपमुळे चर्चेत आहे.
गौतमी पाटीलच्या डान्सने सोशल मीडियावर तर धुमाकूळ घातलाच आहे. पण अशातच आता तिला टक्कर देणारी आणखी एक डान्सर सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली आहे. तिचं नाव ऐश्वर्या जाधव आहे. तिच्या डान्स आणि हटके स्टेप सध्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. ऐश्वर्याचा डान्ससोबत तिच्या सौंदर्याची देखील चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे.
ऐश्वर्याचा डान्स तुफान चर्चेत
सोशल मीडियावर ऐश्वर्या जाधवच्या डान्स व्हिडीओसोबत तिच्या सौंदर्याची देखील चर्चा होत आहे. ज्यामधील ऐश्वर्याच्या अदा आणि हावभाव पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे. तर काहींनी तिच्या या व्हायरल होणार्या व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट्स देखील केल्या आहेत. या व्हिडीओमधील ऐश्वर्याची प्रत्येक स्टेप चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. काही चाहत्यांनी तिला क्रश म्हटलं आहे. तर दुसऱ्या एकाने तिच्या या व्हिडीओवर ऐश्वर्या बोलते.. सबको कोलते, लयच खतरनाक दणका हाय बाबा….!!, ऐश्वर्या नाद खुळा, डोक कस तड तड… अशा कमेंट्स केल्या आहेत.
तिच्या या व्हिडीओला गौतमी पाटीलशी देखील जोडलं जात आहे. तिचा काय दणका ये तो गाण्यावरचा डान्स पाहून अनेकांनी गौतमीला टक्कर असं म्हटलं आहे. या व्हिडीओमध्ये तिच्यामागे देखील काही मुली डान्स करताना दिसत आहे.
कोण आहे ही ऐश्वर्या जाधव?
मागील वर्षी झालेल्या मालेगाव लावणी स्पर्धेत ऐश्वर्याने सहभाग घेतला. याच स्पर्धेत सादर केलेल्या “मुळीच नव्हत रे कान्हा माझ्या मनात” या गवळणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. याच क्षणापासून ऐश्वर्याच्या आयुष्याला नवे वळण मिळाले. या व्हिडिओनंतर तिने इन्स्टाग्रामवर अधिक सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या कलेला डिजिटल व्यासपीठ मिळाले.
आज ऐश्वर्याला प्रेक्षकांकडून मिळणारे प्रेम पाहून तिला आपल्या निर्णयाचा अभिमान वाटतो. DJ लावणीकडे वळण्याचा निर्णय योग्य ठरल्याची भावना ती व्यक्त करते. मात्र, आधुनिकतेसोबतच ऐश्वर्या आपल्या मुळांनाही विसरलेली नाही. आजही तिच्या प्रत्येक DJ शोमध्ये किमान एक पारंपरिक लावणी आवर्जून सादर केली जाते.