जीव तोंडात येईल असं ओव्हरटेकिंग, हिमालयात स्कॉर्पिओ आणि व्हॉल्वोची धडकी भरवणारी रेस, पाहा कोण जिंकलं!

| Updated on: Sep 22, 2022 | 3:44 PM

स्कॉर्पिओ लहान आणि दमदार आहे, तर व्हॉल्वो ही स्कॉर्पिओपेक्षा कित्येक पट मोठी आणि प्रवाशांसह आहे. त्यातच ही स्पर्धा हिमालयाच्या अत्यंत अवघड अशा रोडवर आहे.

जीव तोंडात येईल असं ओव्हरटेकिंग, हिमालयात स्कॉर्पिओ आणि व्हॉल्वोची धडकी भरवणारी रेस, पाहा कोण जिंकलं!
हिमालयाच्या रस्त्यांवर स्कॉर्पिओ आणि बसची रेस
Follow us on

मुंबई: भारतात रस्ते अपघातात (Road Accident India) दरवर्षी हजारो लोकांचे जीव जातात. यातील सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे वेग. वेगाच्या (Over Speeding) थरारापायी अनेकदा वाहनं कंट्रोलच्या बाहेर जातात, आणि अपघात होतात. मात्र, रस्त्यावर अनेक चालक असे असतात, ज्यांच्या स्किललाही तोड नसते. असाच एक व्हिडीओ (Viral Video) सध्या चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यात एका महिंद्रा स्कॉर्पिओला (Mahindra Scorpio) चक्क व्होल्वो बस (Volve Bus) ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत आहे.

स्कॉर्पिओ लहान आणि दमदार आहे, तर व्हॉल्वो ही स्कॉर्पिओपेक्षा कित्येक पट मोठी आणि प्रवाशांसह आहे. त्यातच ही स्पर्धा हिमालयाच्या अत्यंत अवघड अशा रोडवर आहे, जिथे रस्ता तर लहान आहे, आणि बाजूला दरी. थोडा तोल गेला तरी काम संपलं. तरी हा व्हॉल्वोचा ड्रायव्हर नागमोडी घाटात गाडी सुसाट चालवत आहे.

व्हॉल्वोमधून कुणीतरी प्रवाशाने हा सगळा थरार आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. यामध्ये बसच्या पुढे एक स्कॉर्पिओ सुसाट पळताना दिसते. तिचा वेगही जास्त आहे. हा बस ड्रायव्हरची तिचा तितक्याच चपळाईने पाठलाग करत आहे. स्कॉ्पिओ आणि व्हॉल्वोमध्ये लागलेली स्पर्धा इथे स्पष्टपणे जाणवते.

हे सुद्धा वाचा

रस्ता नागमोडी, दऱ्या-खोऱ्याचा आणि रहदारीचा आहे. त्यातही हा चालक एवढी मोठी व्हॉल्वो सहजतेने पळवत आहे. घाटात गिअर बदलत आहे, आणि पुन्हा वेग घेत आहे. स्कॉर्पिओची पाठ काही तो सोडायला तयार नाही. या व्हिडीओत रस्ता गावातूनही जाताना दिसतो, पण त्याचा चालकाला काहीही फरक पडत नाही.

अचानक बसचालक स्कॉर्पिओच्या मागोमाग चालू लागतो. स्कॉर्पिओ अगदी जवळ आली आहे. अचानक एका वळणावर बसचालक गाडीचा वेग वाढवतो आणि स्कॉर्पिओला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करु लागतो. एका वळणावरच हे सगळं घडतं, समोरुनही काही लोक चालत येताना दिसत आहे, त्यांना बसचालक आतूनच बाजूला होण्याचा इशारा करतो.

अचानक अंगावर आलेली बस पाहून रस्त्यावर चालणारे दोघेही बाजूला होतात, आणि हा बसचालक एक्सलेटवरचा पाय दाबतो, आणि वेगात स्कॉर्पिओला ओव्हरटेक करतो. हा क्षण तोंडात जीव आणणाराच आहे. अवघ्या 3 मिनिटांत हा बसचालक भरधाव स्कॉर्पिओला मागे टाकतो.

पाहा व्हिडीओ:

या व्हिडीओला फेसबूकवर तब्बल 40 लाखांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे, तर लाखो लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. हा 3 मिनिटांचा व्हिडीओ असला तरी, पूर्ण व्हिडीओ हा 19 मिनिटांचा आहे, जो तुम्हाला यूट्युबवर पाहायला मिळेल

वेगाचा थरार अनुभवायला चांगला वाटतो, पण तो तुमचाच नाही तर अनेकांचा जीव घेऊ शकतो. या व्हिडीओत हाच थरार, हीच भिती सारखी जाणवत राहते. कुठल्याही परिस्थितीत असा वेग मान्य नसावा, तेव्हा तर बिलकूल नसावा, जेव्हा तुमच्या बसमध्ये 40 हून अधिक प्रवासी प्रवास करत असतील. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेवरही विचार होणं गरजेचं आहे.