AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran Anti Hijab Video: नाचत, गात हिजाब जाळले, पारतंत्र्याचं ओझं डोक्यावरुन उतरवलं, इराणी महिलांचा एल्गार

हे चित्र इराणमधलं आहे, जिथं धर्माबद्दल ब्र काढणंही इथं मृत्यूदंडाला पात्र ठरतं. पण या तरुणींमधील मृत्यूबद्दलची भितीच संपलेली दिसते.

Iran Anti Hijab Video: नाचत, गात हिजाब जाळले, पारतंत्र्याचं ओझं डोक्यावरुन उतरवलं, इराणी महिलांचा एल्गार
इराणमध्ये हिजाबविरोध वाढताना दिसत आहे,
| Updated on: Sep 21, 2022 | 5:52 PM
Share

नवी दिल्ली: इराणमध्ये सध्या हिजाबविरोधात (Iran Anti Hijab Protest) चांगलंच वातावरण तापलं आहे.महिला रस्त्यावर उतरुन डोक्यावरील हिजाब (Iran Women) काढून फेकत आहेत. सार्वजनिक ठिकाणी आंदोलनं सुरु आहेत, जिथं या हिजाबची होळी ( Burning Hijab ) केली जात आहे. बुरखा आणि हिजाबविरोधातील या आंदोलनाची जगभर दखल घेतली जात आहे. नाचत-गात हिजाब जाळणाऱ्या महिलांचा असाच एक व्हिडीओ (Viral Video) आता व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये शेकडो महिला शहराच्या चौकामध्ये जमलेल्या दिसत आहेत. त्यात अनेक पुरुषही आहेत, हे सर्वजण टाळ्या वाजवत आहेत, मागे ड्रमचाही आवाज येत आहे. या गर्दीच्या मधोमध एक शेकोटी पेटवली आहे. या शेकोटीसमोर एक-एक करुन महिला, तरुणी येतात, तिथं नाचतात, आपला हिजाब उतरवतात आणि तो आगीत फेकून देतात.

हा व्हिडीओ कुठल्याही साध्या आंदोलनासारखा वाटत असला, तरी तो तसा नाही आहे. हे चित्र इराणमधलं आहे, जिथं धर्माबद्दल ब्र काढणंही इथं मृत्यूदंडाला पात्र ठरतं. पण या तरुणींमधील मृत्यूबद्दलची भितीच संपलेली दिसते. कारण, त्यांना या हिजाबमध्ये त्यांचं भविष्य अंधकारात गेल्याचं दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

इराणमध्ये हिजाबविरोधाची ठिणगी पडली ती एका तरुणीच्या मृत्यूनंतर. त्याचं झालं असं, इराणमध्ये हिजाबची सक्ती आहे, यासाठी कठोर नियमही आहेत. याच प्रकरणी पोलिसांनी 22 वर्षांच्या महसा अमिनी या तरुणीला ताब्यात घेतलं. मात्र, त्यावेळी तिला मारहाण झाली असा आरोप झाला. या मारहाणीनंतर ही तरुणी कोमात गेली आणि अखेर 3 दिवस कोमात राहिल्यानंतर तिचं निधन झालं.

या तरुणीच्या निधनानंतर सगळीकडे आंदोलनं सुरु झाली, इराणमधील अनेक शहरात सध्या ही आंदोलनं सुरु आहेत. या आंदोलनात तरुणींचा मोठा सहभाग आहे. विशेष म्हणजे, शेकडो तरुणही या मुलींना पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरत आहेत. थेट व्यवस्थेला आव्हान देणारं हे आंदोलन आवाक्यात आणणं सरकारला कठीण झालं आहे. विशेष म्हणजे, इराणच्या सत्तेत असलेल्या काही महिला खासदारांनीही आंदोलनाला खुला पाठिंबा दिला आहे.

इराणमध्ये महिलांवर अनेक बंधनं आहेत, ही सगळी बंधनं झुगारुन या महिला रस्त्यावर उतरत आहेत, पारतंत्र्याचं ओझं काढून फेकत आहेत, आणि समान अधिकारांसाठी भांडत आहेत.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.