Delhi Earthquake: पुन्हा एकदा भूकंप झाला, पुन्हा दिल्ली हादरली, पुन्हा मिम्स शेअर झाले!

नेपाळव्यतिरिक्त भारतातील अनेक शहरांमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के सुमारे 30 सेकंद जाणवले. मात्र कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही.

Delhi Earthquake: पुन्हा एकदा भूकंप झाला, पुन्हा दिल्ली हादरली, पुन्हा मिम्स शेअर झाले!
Delhi Earthquake
Image Credit source: Social Media
| Updated on: Jan 24, 2023 | 4:44 PM

नवी दिल्ली: दिल्लीत मंगळवारी दुपारी अडीच वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. हे धक्के इतके तीव्र होते की लोक भीतीपोटी घराबाहेर पडले. दिल्ली व्यतिरिक्त NCRच्या अनेक भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपानंतर लोक घाबरले आहेत. ट्विटरवर #earthquake हा हॅशटॅग सर्वाधिक ट्रेंड करत आहे. इथल्या जमिनीला पुन्हा पुन्हा हादरवणाऱ्या दिल्लीचं काय झालं, असा प्रश्न लोक विचारत आहेत. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.8 इतकी होती. याचे केंद्र नेपाळमधील कालिका येथे असून ते जमिनीच्या पृष्ठभागाच्या 10 किमी आत होते.

नेपाळव्यतिरिक्त भारतातील अनेक शहरांमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के सुमारे 30 सेकंद जाणवले. मात्र कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. दिल्लीत झालेल्या जोरदार भूकंपाच्या पार्श्वभूमीवर काही लोक सोशल मीडियावर मिम्स शेअर करत आहेत. मिम बाज ट्विटरवर ॲक्टिव्ह झाला आहे आणि सतत मजेदार मीम्स शेअर करण्याचा आनंद घेत आहे. चला तर मग पाहूया निवडक मीम्स.