हा माणूस थेट बिपरजॉय चक्रीवादळाला भिडला! व्हिडीओ व्हायरल

केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी असाच एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात राजस्थानमधील एका गावात बिपरजॉय चक्रीवादळादरम्यान मुसळधार पावसात गॅस सिलिंडरचा पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्याची कौतुकास्पद कामगिरी दिसून येत आहे.

हा माणूस थेट बिपरजॉय चक्रीवादळाला भिडला! व्हिडीओ व्हायरल
Life saviour delievery boy
| Updated on: Jun 23, 2023 | 6:01 PM

मुंबई: जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे लोक भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी असाच एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात राजस्थानमधील एका गावात बिपरजॉय चक्रीवादळादरम्यान मुसळधार पावसात गॅस सिलिंडरचा पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्याची कौतुकास्पद कामगिरी दिसून येत आहे. मुसळधार पावसात रस्त्यावर पाणी वाहत आहे, हा गॅस डिलिव्हरी करणारा माणूस बाडमेरच्या ढोक गावात एका घरात गॅस सिलिंडर पोहोचवताना दिसत आहे.

केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी 17 जून रोजी ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “चूल्हा जलता रहेगा. देश बढ़ता रहेगा”. भारताच्या ऊर्जा क्षेत्रातील या निर्भीड सैनिकाने कर्तव्य निष्ठेने राजस्थानमधील बाडमेरमधील ढोक गावात एका ग्राहकाच्या घरी सिलेंडर पोहोचवून बिपरजॉयला सुद्धा टक्कर दिलीये. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आणखी एका युजरने लिहिले की, पेट्रोलियम क्षेत्रातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी ही अभिमानाची बाब आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून लाखो लोकांनी कमेंट बॉक्समध्ये गॅस डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीचे कौतुक केले आहे. एका युजरने गॅस डिलिव्हरी मॅनचे समर्थन करत लिहिले की, “मला असे म्हणावे लागेल की या डिलिव्हरी करणाऱ्या लोकांना कमी लेखले जाते आणि त्यांना सर्वात कमी पगार मिळतो. ते हा भार उचलतात आणि स्वयंपाकघर चालू ठेवण्यासाठी अनेकजण दररोज शेकडो मैल चालतात. ते प्रत्येक परिस्थितीत लोकांच्या घरापर्यंत गॅस पोहोचवतात. त्यांच्या वेतनाचा आढावा घेऊन त्यात सुधारणा करण्याची वेळ आली आहे. तसेच कार्यक्षम डिलिव्हरीसाठी त्यांना चांगल्या वाहनांची गरज आहे.”