Video: विटा इमारतीवर नेण्यासाठी देसी जुगाड, स्कुटरचा वापर करुन भन्नाट आयडिया!

| Updated on: Nov 04, 2021 | 1:33 PM

सध्या असाच जुगाडचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल, 'व्हॉट एन आयडिया, सरजी'

Video: विटा इमारतीवर नेण्यासाठी देसी जुगाड, स्कुटरचा वापर करुन भन्नाट आयडिया!
देसी जुगाड
Follow us on

कोणतेही अवघड काम कसं करायचं हे भारतीयांना सांगण्याची गरज नाही, त्याचे सगळे जुगाड भारतीयांना चांगले माहीत आहे. यामुळेच अनेकवेळा आपण जुगाडाच्या अशा गोष्टी पाहतो, ज्या पाहिल्यानंतर डोळ्यावर विश्वास बसत नाही. सोशल मीडियावर रोज जुगाडचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. अलीकडच्या काळात असाच जुगाडचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल, ‘व्हॉट एन आयडिया, सरजी’ ( Desi Jugaad Man using desi jugaad to put bricks on the building people were shocked Viral Video)

बांधकामाच्या ठिकाणी विटा लावण्याचे काम कामगार करत असल्याचे तुम्ही अनेकदा पाहिले असेल. ज्यासाठी त्यांना खूप कष्ट करावे लागतात, हे लोक डोक्यावर विटा ठेवून पायऱ्या चढतात. ज्यासाठी त्यांना खूप प्रयत्न करावे लागतात. यात वेळही जास्त लागतो आणि मेहनतही जास्त असते आणि हे काम जोखिमीचेही असते. पण ही सगळी दगदग टाळण्यासाठी एका काकांनी असा देसी जुगाड केला

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, खाली जमिनीवर अनेक विटा ठेवल्या आहेत आणि त्यांना वर नेण्यासाठी एक लांब दोरीचा वापर केला आहे. प्रथम बॅटच्या मदतीने दोरी स्कूटरला जोडली जाते. स्कूटर स्टार्ट करून रेस दिली की, तळाशी ठेवलेल्या विटा दोरीच्या साहाय्याने आपोआप वर जातात. हा जुगाड पाहिल्यानंतर अनेकांना आश्चर्य वाटले. कारण या जुगाडच्या माध्यमातून हे अवघड कामही सोपं झालं आणि मेहनतही कमी झाली.

हा व्हिडीओ पाहा:

हा जुगाड पाहून सोशल मीडिया युजर्स खूपच आश्चर्यचकीत झाले आहेत. याच कारणामुळे अनेक युजर्सने त्यावर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘हा जुगाड खरोखरच एक कौतुक करण्याजोगा आहे, कारण यातून हे जड काम सोपं झाले आहे.’ तर दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘या जुगाडासमोर सर्व आधुनिक तंत्रज्ञान अपयशी आहे.’

हेही पाहा:

Video: अॅमेझॉनच्या डिलीव्हरी व्हॅनमधून तरुणी बाहेर पडली, व्हायरल व्हिडीओनंतर ड्रायव्हर सस्पेंड

दिवाळीसाठी सोनपापडी भाड्याने मिळेल, सोनपापडीचे मिम्स सोशल मीडियावर व्हायरल