AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्यूजपासून ते इनकमपर्यंत! ध्रुव राठी की एलविश यादव? यूट्यूबवर कोण मारतंय बाजी?

आजच्या डिजिटल युगात यूट्यूब ही केवळ मनोरंजनाची नव्हे तर जनतेवर प्रभाव टाकणारी एक जबरदस्त माध्यम बनली आहे. याच मंचावर दोन नावं सतत चर्चेत असतात. ध्रुव राठी आणि एलविश यादव. एक जिथे माहितीपूर्ण आणि राजकीय विश्लेषणासाठी प्रसिद्ध आहे, तर दुसरा त्याच्या विनोदी शैलीसाठी आणि व्लॉग्ससाठी ओळखला जातो. पण प्रश्न असा निर्माण होतो या दोघांमध्ये यूट्यूबवर खरी बाजी कोण मारतोय?

व्यूजपासून ते इनकमपर्यंत! ध्रुव राठी की एलविश यादव? यूट्यूबवर कोण मारतंय बाजी?
कोणी मारली बाजीImage Credit source: गुगल
| Edited By: | Updated on: May 31, 2025 | 1:45 PM
Share

भारतात यूट्यूब हे मनोरंजन आणि माहितीचं मोठं व्यासपीठ आहे. अनेकांनी आपल्या खास शैलीने लोकांची मनं जिंकली आहेत. यातली दोन मोठी नावं आहेत ध्रुव राठी आणि एलविश यादव. ध्रुव राठी सामाजिक आणि राजकीय विषयांवर संशोधनावर आधारित व्हिडीओ बनवतो तर एलविश यादव विनोदी स्किट्स, रोस्ट आणि व्हीलॉग्ससाठी प्रसिद्ध आहे. पण सब्सक्रायबर्स, व्ह्यूज आणि कमाईच्या बाबतीत कोण आहे पुढे? चला पाहू.

ध्रुव राठी हा सिव्हिल इंजिनीअर असून त्याने यूट्यूबच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा विडा उचलला. त्याचे व्हिडिओ प्रामुख्याने राजकीय विश्लेषण, पर्यावरण, अर्थव्यवस्था आणि समाजाच्या प्रश्नांवर आधारित असतात. त्याची सामग्री तथ्याधारित, संशोधनावर आधारित आणि मांडणी परखड असते. इंग्रजी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये त्याने मोठा प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे. त्याचे व्हिडिओ शिक्षित, विचारशील आणि जबाबदार प्रेक्षकांना आकर्षित करतात.

त्याच्या यूट्यूब चॅनेलवर 15 दशलक्षांहून अधिक सदस्य आहेत आणि त्याच्या अनेक व्हिडिओंना कोट्यवधी व्ह्यूज मिळाले आहेत. विशेष म्हणजे, त्याने कोणत्याही मोठ्या कंट्रोव्हर्सीशिवाय विश्वासार्हता टिकवून ठेवली आहे, जे एक मोठं यश मानलं जातं.

दुसरीकडे, एलविश यादव हा एक हरियाणवी युट्युबर आहे ज्याने कॉलेज जीवन, ग्रामीण भारत, प्रेमप्रकरणं, समाजातील हलक्याफुलक्या प्रसंगांवर आधारित मजेशीर व्हिडिओ तयार करून प्रेक्षकांची मनं जिंकली. त्याचा हसवणारा अंदाज, स्थानिक बोलीभाषेचा वापर आणि रिलेटेबल स्किट्समुळे त्याला तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे.

एलविशने Bigg Boss OTT 2 जिंकून आपली लोकप्रियता आणखी वाढवली. त्याच्या यूट्यूब चॅनेलवर सध्या 15 दशलक्षांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत आणि त्याचे अनेक व्हिडिओ 20-30 दशलक्ष व्ह्यूज पार करतात. शिवाय, एलविश विविध ब्रँड्ससाठी जाहिरात करत असल्याने त्याच्या उत्पन्नातही मोठी वाढ झाली आहे.

कोण आहे यूट्यूबचा खरा चॅम्पियन?

जर दर्जेदार माहिती, सामाजिक भान आणि विचारांचे नेतृत्व या कसोट्यांवर यूट्यूबवर कोण बाजी मारतो, असा प्रश्न असेल तर ध्रुव राठी निश्चितच पुढे आहे. पण जर यूट्यूबवर प्रेक्षकांची संख्या, व्हायरल कंटेंट, ब्रँडिंग आणि जनतेची मजा हवी असेल तर एलविश यादव आघाडीवर आहे. दोघांच्या यशाचा मार्ग वेगळा असला, तरी दोघांनीही आपल्या पद्धतीने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.