मुख्यमंत्र्यांनी शेअर केलेली अवघ्या 35 सेकंदांची ही क्लिप, बस देखते रह जाओगे!

एक असं सौंदर्य ज्याबद्दल भारतातील इतर राज्यातील लोकांना काहीच कल्पना नाही.

मुख्यमंत्र्यांनी शेअर केलेली अवघ्या 35 सेकंदांची ही क्लिप, बस देखते रह जाओगे!
dibang valley waterfall
Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 29, 2022 | 5:44 PM

अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू अनेकदा ट्विटरवर जबरदस्त पोस्ट शेअर करत असतात, ज्यात त्यांच्या राज्याचे अविश्वसनीय नैसर्गिक सौंदर्य दिसून येते. ते लोकांपर्यंत अद्भुत सौंदर्य आणतात. एक असं सौंदर्य ज्याबद्दल भारतातील इतर राज्यातील लोकांना काहीच कल्पना नाही. मुख्यमंत्री खांडू यांनी आता दिबांग व्हॅलीमध्ये असलेल्या एका धबधब्याचा एक जबरदस्त व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामुळे नेटिझन्स मंत्रमुग्ध झालेत.

अरुणाचल प्रदेशच्या पर्यटन अर्थव्यवस्थेच्या पुनरुज्जीवनाच्या उद्देशाने गेल्या वर्षी सुरू करण्यात आलेल्या #DekhoApnaPradesh मोहिमेचा एक भाग म्हणून पेमा खांडू यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

व्हायरल क्लिपमध्ये डोंगरावरून वाहणाऱ्या दुधाळ-पांढऱ्या धबधब्याचं विलोभनीय दृश्य पाहायला मिळतं. अवघ्या 35 सेकंदांची ही क्लिप इतकी अप्रतिम आहे की, तुम्ही फक्त धबधब्याकडे पाहतच राहाल.

मुख्यमंत्री खांडू यांनी हा व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे की, ‘जर तुम्ही अनिणीला गेला नसाल तर तुम्ही नववर्षाचं स्वागत नक्कीच दिबांग व्हॅलीत निसर्गाच्या कुशीत राहून करायला हवं” व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक सतत आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत.

एकाने लिहिले, “अरुणाचल प्रदेशचे सौंदर्य विलक्षण आहे.” तर दुसरा म्हणतो, “जर तुम्ही अनिणी पाहिले नाही, तर काय पाहिले?”

#DekhoApnaPradesh मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री खांडू राज्यातील अशा सुंदर ठिकाणांचे व्हिडिओ शेअर करत असतात.

याआधी मुख्यमंत्र्यांनी यामेंग धबधब्याचा एक मंत्रमुग्ध करणारा व्हिडिओ शेअर केला होता. त्याआधी त्यांनी तवांग जिल्ह्यातील बेघर गावाचा व्हिडिओ शेअर केला होता, जो चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेला होता. त्याच्यावर ढग तरंगत होते.