
Online Shopping: आता पाठोपाठ सण येणार आहेत. सण येणार म्हणल्यावर शॉपिंग देखील करावी लागतेच. शॉपिंगशिवाय सर्वच सण अधूरे आहेत. दागिन्यांसोबतच अनेक गोष्टींची खरेदी करावी लागते. दिवाळी म्हणटलं तर, इलेक्ट्रॉनिक वस्तू देखील खरेदी कराव्या लागतात. ज्यासाठी पैसे देखील मोठ्या प्रमाणात खर्च होतात. अनेकदा खरेदी करताना किती खर्च झाला हे कळतंच नाही. त्यामुळे अनेकदा महिन्याचं गणित देखील बिघडतं. अशात कुठे वस्तू कमी दरात मिळतील याचा शोध सुरु होतो. म्हणून ऑनलाईन शॉपिंग उत्तम पर्याय आहे. पण ऑनलाईन शॉपिंग करताना काही गोष्टी नक्की लक्षात घ्या आणि शॉपिंग करा…
यादी तयार करुन करा शॉपिंग : शॉपिंगसाठी गेल्यानंतर वायफळ खर्च मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे शॉपिंग करताना सर्वात आधी यादी तयार करा. यादीत अशा वस्तू असल्या पाहिजे ज्यांची खरंच आपल्याला गरज आहे. नकोत्या वस्तू न घेता तुम्ही पैसे वाचवू शकता…
शॉपिंगसाठी कॅश वापरा : आजच्या डिजिटल विश्वात ऑनलाईन पेमेंटवर लोकं भर देत आहे. पण शॉपिंग करताना केव्हाही पैसे घेवून शॉपिंग करा. ज्यामुळे खर्चाचा हिशोब राहतो. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन शॉपिंग करताना कॅश ऑन डिलिव्हरीचा वापर करा. कारण ऑनलाईन ऑर्डर केलेली वस्तू वेळेत किंवा आलीच नाही तर, नुकसान होणार नाही. त्यामुळे डिजिटल नाही तर, पैशांचा वापर शॉपिंग करताना करा.
ऑनलाईन शॉपिंग : फेस्टिव्ह सीझनमध्ये तुम्ही शॉपिंग करत असाल तर, ऑनलाईन शॉपिंग उत्तम पर्याय आहे. फेस्टिव्ह सीझनमध्ये ऑनलाईन शॉपिंगवर विविध प्रकारचे ऑफर असतात. ज्यामुळे तुम्हाला कमी किंमतीत चांगल्या वस्तू मिळतील. ऑनलाईन शॉपिंग केल्यास तुम्हाला कमी दरात चांगल्या वस्तू मिळतील.
वेगवेगळ्या ठिकाणचे दर जाणून घ्या : शॉपिंग करताना वेगवेगळ्या प्लॉटफॉर्म वस्तूंचे दर जाणून घ्या. जिथे कमी दर पण वस्तू चांगली असेल तर लगेच विकत घ्या. वेगवेगळ्या ब्रँडचे देखील प्रॉडक्ट असतात. त्यामुळे कोणतीही वस्तू खरेदी करताना ब्रँड देखील तपासून घ्य…
ऑनलाइन शॉपिंगचा ट्रेंड : आयर्लंड, स्वीडन, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, स्पेन, डेन्मार्क, पोलंड, अर्जेंटिना, ऑस्ट्रिया, फिनलंड, झेक प्रजासत्ताक, सिंगापूर, थायलंड, स्वित्झर्लंड हे देश ऑनलाईन शॉपिंगमध्ये भारताच्या पुढे आहेत. गेल्या काही वर्षांत भारतात ऑनलाइन शॉपिंगचा ट्रेंड झपाट्याने वाढला आहे.