
Torn Notes Exchange Rules: जर तुमच्याकडे जुन्या, फाटलेल्या नोटा असतील, तर अनेकांना बँकेत त्या कशा बदलायच्या असा प्रश्न पडतो. अशा नोटा बाजारात किंवा इतरत्र अनेकदा निरुपयोगी ठरतात. पण, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि इतर बँका या नोटा बदलण्याची सुविधा देतात. फाटलेल्या नोटा बदलण्याची प्रक्रिया सोपी आहे. तुम्हाला फक्त काही महत्त्वाचे नियम आणि पायऱ्या पाळायच्या आहेत.
बँकेत नोटा कशा बदलायच्या: जर तुमच्याकडे खूप फाटलेल्या नोटा असतील तर काळजी करण्याची गरज नाही. फाटलेल्या नोटा बदलण्यासाठी, तुम्हाला प्रथम तुमच्या जवळच्या बँकेच्या शाखेत जावे लागेल. नंतर नोटा मोजा आणि बँक अधिकाऱ्यांना एक फॉर्म अचून भरुन द्या. अधिकारी नोटांची स्थिती तपासतील आणि स्थापित नियमांनुसार त्या स्वीकारतील.
जुन्या नोटा बदलण्यासाठी, तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र असे ओळखपत्र असणे आवश्यक आहे. बँका एका वेळी 5 हजार पर्यंतच्या मर्यादेपर्यंत रोख रक्कम बदलण्याची परवानगी देतात. पण, मोठ्या रकमेसाठी, तुम्हाला नोटा तुमच्या बँक खात्यात जमा कराव्या लागू शकतात. नोटा बदलण्याची वेळ बँक ठरवते.
जर बँक कोणत्याही कारणास्तव फाटलेल्या नोटा बदलण्यास नकार देत असेल तर काय करावे?
जर बँक कोणत्याही कारणास्तव फाटलेल्या नोटा बदलण्यास नकार देत असेल तर काळजी जाण्याची गरज नाही. प्रथम, नोटेची स्थिती आणि बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांची तपासणी करा. कधीकधी बँका एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच रोख नोटा बदलतात किंवा काही विशिष्ट नोटा स्वीकारत नाहीत. तुम्ही दुसरी शाखा देखील नोटा बदल्यासाठी प्रयत्न करू शकता.
वेगवेगळ्या शाखांचे नियम थोडे वेगळे असू शकतात, त्यामुळे कोणत्या नोटा बदलण्यासाठी योग्य आहेत आणि कोणत्या नाहीत हे जाणून घेण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या वेबसाइट किंवा हेल्पलाइनवर संपर्क साधा. जर नोट पूर्णपणे खराब झाली नसेल, तर ती बँकेत किंवा विशेष आरबीआय काउंटरवर जमा करून सहजपणे बदलता येते.