मुंबई : सध्या सोशल मीडियावर वेगवेगळे व्हीडिओ पाहायला मिळतात. त्यातही जर ते पाळीव कुत्र्यांचे असतील तर त्याला अधिक पसंती मिळते. ते व्हीडिओ अधिक शेअर केले जाताता. यातले काही व्हीडिओ तर इतके भारी असतात की त्यामुळे तुमचा मूड क्षणार्धात बदलून जातो. अश्या व्हीडिओंना लोकही चांगला प्रतिसाद देतात. सध्या असाच तुमचा मूड फ्रेश करणारा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला (Viral video) जात आहे. यात एक कुत्रा (Dog video) तुमच्या मनाला फ्रेश करेल.
गिटार अनेकांच्या आवडीचं वाद्य… अनेकांना ती वाजवण्याचही इच्छा असते. सध्या सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यात एक कुत्रा गिटार वाजवताना दिसत आहे. या व्हीडिओमध्ये या कुत्र्याची मालकिन जमिनीवर बसलेली दिसतेय. तिच्या हातात गिटार आहे. यासोबतच ती या कुत्र्याला खावूही घालतेय. कुत्रा तिच्या समोर उभा आहे. तो आपल्या पायाने गिटार वाजवतोय. त्यानंतर ही महिला त्याला खायला देतेय. ते खाल्ल्यानंतर डॉगी पुन्हा गिटार वाजवतो आणि ती महिला त्याला पुन्हा खायला देते, असा हा व्हीडिओ सध्या खूप जास्त व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
हा व्हीडिओ Emily Anderson या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हीडिओला 70 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलंय. तर साडे तीन हजारांहून अधिकांनी लाईक केलंय. याला “माझा डॉगी किती चांगल्या पद्धतीने त्याचं खाद्य खातोय. त्याचं गिटार वाजवणं तर कमाल आहे…” असं कॅप्शन देण्यात आलं आहे.
या व्हीडिओला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळताना दिसतेय. हा केवळ 19 सेकंदाचा व्हीडिओ सध्या अनेकांनी शेअर केलाय. हा व्हीडिओ अनेकांचा मूड चेंजर ठरतोय.