Video | खेळण्यासोबत कुत्र्याच्या गोडगोड गप्पा, भन्नाट व्हिडीओ व्हायरल

सध्या हा आगळावेगळा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये प्राण्यांची निरागसता तसेच त्यांची निखळ मैत्री दाखवण्यात आलीय.

Video | खेळण्यासोबत कुत्र्याच्या गोडगोड गप्पा, भन्नाट व्हिडीओ व्हायरल
DOG VIRAL VIDEO

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ हे प्राणी पक्ष्यांचे असतात. नेटकऱ्यांना प्राण्यांची करामत पाहायला आवडते. कदाचित याच कारणामुळे सध्या हा आगळावेगळा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये प्राण्यांची निरागसता तसेच त्यांची निखळ मैत्री दाखवण्यात आलीय.

कुत्र्याच्या खेळण्यासोबत भन्नाट गप्पा

असं म्हटलं जातं की प्राणी हे निस्वार्थपणे मैत्री करतात. त्यांची माणसांशी एकदा गट्टी जमली की हा बंध ते शेवटपर्यंत जपतात. कुत्रा हा प्राणी तर जीव पणाला लावून आपली मैत्री जपतो.   व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र या व्हिडीओमध्ये कुत्र्याने केलेली करामत लोकांना चांगलीच आवडली आहे. हा कुत्रा एका खेळण्यासोबत मस्ती करत आहेत. तो खेळण्यासोबत भन्नाट गप्पा करत आहेत. विशेष म्हणजे खेळणेसुद्धा कुत्र्याशी बोलत आहे.

व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे ?

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये कुत्रा एका खेळण्यासमोर बसलेला आहे. खेळण्यासमोर बसून हा कुत्रा वेगवेगळ्या लयीत आवाज काढतोय. त्याचे भुंकणे निटपणे ऐकून घेत व्हिडीओतील खेळणंसुद्धा अकदी तसाच आवाज काढत आहे. आवाजाची हुबेहूब केलेली कॉपी पाहून खरा कुत्रासुद्धा चक्रावला आहे. विशेष म्हणजे हा खेळ कुत्र्याला आवडल्याचं दिसतंय.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया 

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर dogadvisory या अकाऊंटवर शेअर करण्यात आला असून त्याला नेटकऱ्यांनी त्यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. कुत्र्याने खेळण्याला सर्वात आधी हाय म्हटले असेल अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिलीय. तर प्राण्यांची मैत्री खरंच निस्वार्थ आणि खरीखुरी असते असे दुसऱ्या नेटकऱ्यांना सांगितलंय. तसेच हा कुत्रा मला खूप आवडल्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया दुसऱ्या एका नेटकऱ्याने दिलीय. सध्या हा व्हिडीओ लोकांना खूप आपडला आहे.

इतर बातम्या :Video: मगरींनी भरलेल्या हौदात माकडाचं पिल्लू पडलं, मगरी पिल्लाला खाणार, तितक्यात…पाहा धक्कादायक व्हिडीओ!

Video: 9 वर्षाच्या चिमुरड्याचं पराठे बनवण्याचं कौशल्य पाहा, लोक म्हणाले, याच्यापुढे 5 स्टारचे शेफही पाणी भरतील!

Video: भल्यामोठ्या झोपाळ्यावर तरुणाचे स्टंट, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, याला जीव जास्त झालाय वाटतं!


Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI