
डॉली चायवालाची लोकप्रियता इतकी वाढली आहे की, लोकं आता त्याला फॉलो करु लागले आहेत. भारताबाहेरही त्याचा जलवा कायम आहे. त्याच्या फॉलोअर्सची संख्या वाढतच चालली आहे. सोशल मीडियावरही डॉली चायवाला चांगलाच चर्चेत असतो. पण तुम्हाला माहित आहे का की अनोख्या स्टाईलमध्ये चहा सर्व्ह करणाऱ्यांना डॉलीला कॉफी प्यायला आवडते. डॉलीने जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा येथे कॉफीचा आस्वाद घेतला. तो अनेकदा कुठेतरी टूरवर जातो पण त्याच्या दुबई टूरचा व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ त्याने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे.
व्हिडिओमध्ये डॉली चहावाला एका आलिशान कारमधून खाली उतरताना दिसत आहे. त्याच्या स्वागतासाठी दोन जणं आधीच उभे आहेत. सर्वजण नंतर बुर्ज खलिफाच्या शिखरावर जातात आणि एकत्र बसतात आणि कॉफी पितात. हा व्हिडिओ शेअर करताना डॉलीने लिहिले की – ‘कॉफी प्यायला बुर्ज खलिफाच्या शिखरावर गेलो होतो.’
डॉली चायवालाच्या या व्हिडिओला 10 लाखांहून अधिक लाईक्स आणि 13 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. त्याच्या या व्हिडिओवर अनेक युजर्सनी कमेंटही केल्या आहेत. उद्योगपती बिल गेट्स यांनी त्याच्या टपरीवर चहा पिल्यानंतर तो आणखी प्रसिद्ध झाला. या वर्षी फेब्रुवारीमध्ये बिल गेट्स यांनी भारत भेटीदरम्यान त्यांच्या स्टॉलला भेट दिली होती.
डॉलीच्या दुबई दौऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. एका रात्रीत प्रसिद्ध होतात तशी या डॉली चहावाल्याची स्टोरी आहे.