Video : लेकीच्या शिक्षणासाठी अपंग बापाचा संघर्ष, ट्राय सायकलवरून सोडलं शाळेत, डोळ्यात पाणी आणणारा एक मिनिटाचा व्हीडिओ…

| Updated on: May 29, 2022 | 6:56 PM

हा व्हीडिओ आयएएस सोनल गोयल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. याला पिता असं कॅप्शन दिलंय. याला दीड लाखांहून अधिक लोकांनी पाहिलंय. तर सोळा हजारांहून अधिक लोकांनी लाईल केलंय.

Video : लेकीच्या शिक्षणासाठी अपंग बापाचा संघर्ष, ट्राय सायकलवरून सोडलं शाळेत, डोळ्यात पाणी आणणारा एक मिनिटाचा व्हीडिओ...
Follow us on

मुंबई : बाप आणि मुलीचं विशेष नातं असतं. त्यांच्यातील प्रेम शब्दात व्यक्त करता येत नाही. मुलीच्या शिक्षणासाठी तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी वडील तत्पर असतात. अशीच लेकीच्या वडिलांच्या प्रेमाची गोष्ट सांगणारा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. यात अपंग बाप आपल्या मुलांना शाळेत सोडायला जाता दिसत आहे. पण ही कोणतीही गाडी नाहीये. तर ही आहे ट्रायसायकल. ज्यावरून ही व्यक्ती आपल्या मुलांना शाळेत घेऊन जातेय. लहान मुलगा आपल्या वडिलांच्या मांडीवर बसलाय तर मोठी मुलगी ट्रायसायकलच्या (Tricycle) मागच्या बाजूला बसली आहे.

लेकीची वडिलांच्या प्रेमाची गोष्ट सांगणारा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात अपंग बाप आपल्या मुलांना शाळेत सोडायला जाता दिसत आहे. पण ही कोणतीही गाडी नाहीये. तर ही आहे ट्रायसायकल. ज्यावरून ही व्यक्ती आपल्या मुलांना शाळेत घेऊन जातेय. लहान मुलगा आपल्या वडिलांच्या मांडीवर बसलाय तर मोठी मुलगी ट्रायसायकलच्या मागच्या बाजूला बसली आहे.

हे सुद्धा वाचा

व्हायरल व्हीडीओमध्ये एक व्यक्ती ट्राय सायकल रस्त्यावरून जाताना दिसत आहे. त्याच्या मागे एक सीट आहे, ज्यावर शाळेचा गणवेश घातलेली एक मुलगी बसलेली दिसतेय. हा व्हीडिओ मागच्या बाजूने सुरू होतो. नंतर तो पुढे-पुढे जातो. ही व्यक्ती ट्राय सायकल चालवत आहे आणि त्याच्या मांडीवर एक मुलगाही दिसतोय. या दोन चिमुकल्यांना घेऊन ही व्यक्ती हाताने ही ट्रायसायकलवरून जाताना दिसतेय. एका अपंग बापाचा संघर्ष यामध्ये स्पष्टपणे दिसतोय.

हा व्हीडिओ आयएएस सोनल गोयल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. याला पिता असं कॅप्शन दिलंय. याला दीड लाखांहून अधिक लोकांनी पाहिलंय. तर सोळा हजारांहून अधिक लोकांनी लाईल केलंय. हा व्हीडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे पाहून लोक खूप भावूक होत आहेत. एका नेटकऱ्याने यावर ‘हृदयाला स्पर्श करणारा व्हीडिओ’, अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्याने’बापच आपल्या मुलीचा खरा हिरो असतो’, असं म्हटलंय.