AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बँड बाजा साठी नव्हते पैसे तरीही मुलीच्या जन्माचा असा केला उत्सव

त्याला मुलगी झाल्याचा इतका आनंद झाला की तो आपल्या मुलीसाठी ऑर्केस्ट्रा आणायला गेला, पण ऑर्केस्ट्राने 20 हजारांची मागणी केली. त्याच्याकडे फक्त 10 हजार होते.

बँड बाजा साठी नव्हते पैसे तरीही मुलीच्या जन्माचा असा केला उत्सव
e rikshawImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Jan 26, 2023 | 4:27 PM
Share

बेगूसरायमध्ये बेटी बचाओ-बेटी पढाओच्या घोषणा देत कुटुंबाने मुलीच्या जन्माचा आनंद तर साजरा केलाच, पण वडिलांनी हॉस्पिटलमधून एखाद्या वधूप्रमाणे ई-रिक्षा सजवून मुलगी आणि पत्नीला घरी आणले. बेगूसराय नगर मधील टुनटुन कुमार सोनू की पत्नी जूली कुमारी ने 23 जानेवारीला मुलीला जन्म दिला. ज्यामुळे सगळ्या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. टुनटुन कुमार यांना आधीच दोन मुले होती मुलगी व्हावी यासाठी त्यांनी देवाकडे साकडं घातलं होतं. आता मुलगी झाल्यानंतर कुटुंबात खूप आनंदाचे वातावरण आहे. टुनटुन, विशेषत: वडील खूप आनंदी आहेत.

टुनटुन हा ई-रिक्षा चालक असून त्याला मुलगी झाल्याचा इतका आनंद झाला की तो आपल्या मुलीसाठी ऑर्केस्ट्रा आणायला गेला, पण ऑर्केस्ट्राने 20 हजारांची मागणी केली. त्याच्याकडे फक्त 10 हजार होते. यामुळे त्यांना ऑर्केस्ट्रा आणता आला नाही.

पण त्याने ई-रिक्षा फुग्याने सजवून आपल्या मुलीला हॉस्पिटलमधून आणले. जे आता चर्चेचा विषय बनले आहे. त्याला आधीच 2 मुले होती. पण त्याला मुलगी व्हावी म्हणून तो देवाकडे प्रार्थना करत होता. टुनटुन म्हणाले की देवाने त्याची पत्नी, मित्र आणि कुटुंबियांची प्रार्थना ऐकली आणि त्याला एक मुलगी मिळाली.

आई ज्युली कुमारी म्हणाली की, ती देखील खूप खुश आहे. देवाने तिला मुलगी दिली आहे आणि तिने मन्नतदेखील मागितली होती. 24 जानेवारीच्या संध्याकाळी टुनटुन कुमार यांनी ई-रिक्षा हॉस्पिटलमध्ये कशी सजवली आणि आपली मुलगी आणि पत्नीला घरी कसे आणले हे तुम्ही फोटोंमध्ये पाहू शकता.

मुलीला लक्ष्मी म्हटले जाते, लग्नानंतर तिला जल्लोषात निरोप दिला जातो, त्यामुळे जन्मानंतर तिने हॉस्पिटलला दिमाखात सजवून ई-रिक्षाने घरी आणले आहे. यामुळे संपूर्ण कुटुंब आनंदी असून घराबरोबरच परिसरात मिठाईचे वाटप करण्यात आले.

Follow Us
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर! मित्रपक्षांविरोधात आमदार...
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर? मित्रपक्षांविरोधात आमदारांच्या तक्रारी, बैठकीत नेमकं काय घडलं?
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा शिवाजी पार्कचा दीपोत्सव रद्द
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत आक्रमक
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ...
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ थट्टा-मस्करीचा भाग, नेमकी भानगड काय?
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; वाहतुक कोंडी
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; मोठी वाहतुक कोंडी
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज आता प्रकृती स्थिर, डॉक्टरांनी...
शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणा
Shivsena Hearing : शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणार युक्तीवाद?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची अत्यंत महत्त्वाची बैठक, नेमकं कारण...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बडा नेता शिंदे गटात...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बड्या नेत्याचा समर्थकांसह शिंदे गटात प्रवेशाचा निर्णय
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक कलांमध्ये ट्रम्प यांना मोठा धक्का