
पावसाळ्यात साप अनेकदा घरांमध्ये आणि बागेत प्रवेश करतात कारण त्यांना थंड, ओलसर आणि सुरक्षित ठिकाणांची आवश्यकता असते. पावसाळ्यात तसे अनेक किटक येतात, पण कधी कधी साप निघण्याचाही धोका असतो. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुमची बागेत आणि घरात साप येऊ नये म्हणून काय करता येईल ते पाहुयात. हे अगदीच सोपे आणि घरगुती उपाय आहेत, ज्यामुळे तुमचे घर आणि अंगण सापमुक्त होईल. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला सापांना हाकलण्यासाठी रसायनांचा वापर करायचा नसेल, तर तुम्ही या 5 नैसर्गिक पद्धती नक्की वापरून पाहू शकता.
1. लसूण आणि कांद्याचा रस
लसूण आणि कांदा कुस्करून किंवा बारीक करून त्याचा रस काढा. हा रस पाण्यात मिसळा आणि स्प्रे बाटलीत भरा आणि बागेच्या झुडुपांवर, कडांवर आणि घराभोवती फवारणी करा.
लसूण आणि कांद्याचा वास सापांना असह्य असतो. ते त्या वासांमुळे घरात येणार नाहीत.
2. कडुलिंब आणि तुळस लावा
बागेत कडुलिंब आणि तुळशीची झाडे लावा . त्यांची पाने वाळवून, कुस्करून घराच्या कोपऱ्यात किंवा बागेच्या मातीत मिसळा. कडुलिंब आणि तुळशीचा वास सापांना दूर ठेवतो. याशिवाय ही रोपे हवा शुद्ध देखील करतात.
3.अडथळा निर्माण करा (तण काढून टाका)
बाग आणि घराभोवती असलेले गवत, झुडपे काढून टाका.नको असलेले लाकूडही काढून टाका किंवा स्वच्छ करून ठेवत चला. वारंवार तपासत जा. माती कोरडी ठेवा.
साप ओलसर, अंधारलेल्या आणि झाकलेल्या ठिकाणी लपतात. स्वच्छ जागा त्यांना आकर्षित करत नाहीत.
4. मोहरीचे तेल + लाल तिखट मिश्रण
2 चमचे लाल तिखट आणि 3 चमचे मोहरीचे तेल मिसळा आणि ते बागेच्या कोपऱ्यात आणि घराच्या दारांजवळ ओता.
त्याचा तीव्र वास सापांसाठी त्रासदायक असतो. त्यामुळे साप घराजवळ येणार नाही.
5 नारळाची साल
घराच्या मुख्य दरवाजावर आणि बागेच्या रस्त्यांवर जळलेल्या नारळाची साल जाळून त्याची राख शिंपडा.
साप या नैसर्गिक राख आणि तंतूंपासून दूर राहतात कारण ते त्यांच्या त्वचेला हानी पोहोचवू शकतात.
6 अतिरिक्त खबरदारी
जमिनीवर अन्न किंवा मांस फेकू नका, यामुळे सापांव्यतिरिक्त उंदीर आणि इतर प्राणी आकर्षित होऊ शकतात.
7 रात्री बागेत किंवा कुठेही बाहेर जाताना टॉर्च वापरा
8 मुलांना बागेत एकटे जाऊ देऊ नका, विशेषतः पावसाळ्यात